व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

बिबट्याचा मृत्यू अंतर्गत रक्‍तस्रावानेशवविच्छेदन अहवाल

फुफ्फुसात संसर्गही झाल्याचे निष्पन्न
अंतर्गत रक्तस्राव आणि फुफ्फुसातील संसर्गामुळे बिबट्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनात आढळून आले आहे, असे राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नवनाथ निघोट यांनी आज सांगितले. दरम्यान, बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सात जणांपैकी सहा जणांना घरी सोडून देण्यात आले आहे. बिबट्याला पकडणारे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्पोद्यानातील कर्मचारी गोरख नेवाळे यांच्यावर उपचार सुरू आहेत.

आकुर्डी येथील गंगानगर परिसरात काल आलेल्या बिबट्याला पकडून कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात पाठविण्यात आले होते; परंतु, तेथे पोचताच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर लगेचच डॉ. निघोट आणि डॉ. गौरव परदेशी यांनी त्याचे शवविच्छेदन केले. त्याचा अहवाल जिल्हा वनसंरक्षक अधिकारी अशोक खडसे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त दिलीप बंड यांना पाठविण्यात आला आहे. बिबट्याच्या मृत्यूच्या कारणाबद्दल नागरिकांमध्ये संशय व्यक्त करण्यात येत होता.

श्री. निघोट म्हणाले, ""शवविच्छेदनात बिबट्याच्या हृदयाच्या वरच्या बाजूला रक्तस्राव झाल्याचे दिसून आले. तेथे त्याला मार बसला होता. फुफ्फुसाच्या संसर्गामुळे तो आजारी होता. त्याच्या पोटात अन्नाचा एकही कण आढळला नाही. मात्र, थोडेसे गवत आढळले. आजारपण आणि भक्ष्य न मिळाल्यामुळे तो भुकेला होता. त्याचे फुफ्फुस आदी अवयव तपासणीसाठी पुण्यातील औंध येथील राज्य रोग अन्वेषण केंद्राकडे पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल दहा दिवसांनी मिळेल. त्यावरून त्याला कोणता आजार होता, हे स्पष्ट होईल.''


प्रभाकर कुकडोलकर
""आकुर्डीच्या भरवस्तीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्याची गोरख नेवाळे यांची धाडसी वृत्ती निश्‍चितच कौतुकास्पद आहे. मात्र, अशाप्रकारे बिबट्याला सामोरे जाण्याचे धाडस हे खरोखरीच वेडे धाडस ठरू शकले असते. यापुढे अशी परिस्थिती हाताळताना कोणीही वेडे धाडस करू नये,'' असे आवाहन वन परिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव विभाग) प्रभाकर कुकडोलकर यांनी केले.

ते म्हणाले, ""बिबट्याला सामोरे जाण्याचे धाडस दाखवू नये आणि तसे केल्यास संबंधितास जबाबदार धरण्यात येईल, असे आवाहन वनखात्याने वारंवार केले आहे. असे असतानाही काल त्याचीच पुनरावृत्ती झाली. बिबट्याला पाहण्यासाठी झालेली गर्दी आवरण्याचा प्रयत्नही या वेळी झाला नाही. परिणामी परिस्थितीवर नियंत्रण येण्याऐवजी ती अधिकच चिघळली. वास्तविक पाहता महापालिका, वनखाते- वन्यजीव, अग्निशामक दल आणि प्राणिसंग्रहालय यांपैकी जी यंत्रणा प्रथम घटनास्थळी पोचते, त्या यंत्रणेने परिस्थितीचा ताबा घेणे महत्त्वाचे असते. परिस्थिती आटोक्‍यात आणण्यासाठी केवळ वनखात्यावर अवलंबून राहाणे अपेक्षित नाही.''

कालच्या परिस्थितीचे विश्‍लेषण करताना कुकडोलकर म्हणाले, ""बिबट्या गेला एक आठवडा उपाशी होता. इमारतीच्या गच्चीवर अडकून पडल्याने त्याने थेट इमारतीच्या गच्चीवरून चाळीस फूट उंचीवरून खाली उडी मारली. त्यात त्याच्या छातीला जबरदस्त मार लागून अंतर्गत रक्तस्राव झाला होता. त्याच्या फुफ्फुसामध्ये गाठी असल्याचेही शवविच्छेदनादरम्यान आढळून आले. याचाच अर्थ तो शारीरिकदृष्ट्या क्षीण झाला होता. त्यामुळेच त्याला पकडणे सहज शक्‍य झाले. अन्यथा दाखविलेले धाडस अंगलट येण्याची शक्‍यता अधिक होती. किंबहुना अनेकांचा जीव धोक्‍यात आला असता. त्यामुळे नागरिकांनी घटनास्थळी गर्दी न करता, पोलिसांच्या सूचना ध्यानात घेणे आत्यंतिक गरजेचे आहे.''

4 comments:

 1. sagar said...
   

  Congratulations to All intelligent citizens of Pune and PMC staff and other agencies involved in this so called rescue and hats off to those brave people who shade their blood to exterminate this alien and saved the human race. Applause for them!!

  One question, was it really a rescue or a mass murder? It was like terrorist encroached in city and people retaliate bravely like 1857 Mutiny.
  I don’t understand why people feel that the leopard has done an unforgivable blunder by getting into human settlement? Why should we perceive such stray animal lost from his home, as our shear enemy? Some people capitalized this incident to show off their insane bravery. This horrible incident reminds me a terrible incident happened in 2006 at Phulwama district where one Himalayan black bear had been allegedly killed by local people by stones and set to fire alive and they have celebrated the victory.
  Coming leopard in city is not new to Punites as correctly said by Mr. AshokKumar Khadase.
  The situation was not so out of control initially and could have been dealt more systematically and peacefully but the people and agencies has created it as a filmy scene and spoils the whole intension of the rescue.
  Why the PMC and Fire brigade intervene in the wildlife rescue when they are not trained enough? Rather than they should have kept the local people under control and wait till the experts arrive.
  Situation was very simple
  Leopard was hungry and weak due to some illness,
  It was very well in position to Tranquilize with proper dosage and by experts which we have in Pune.
  After tranquilizing forest wild life department can take necessary action.
  Irreasonably the issue has been hyped by media and people.
  It is the limitation in availability of proper resources with forest dept. or PMC.
  No proper communication and rescue team at place. If forest department has limitation sick the help from private experts or NGOs.
  Lack of trained staff and animal protecting attitude.
  I am very sure that the death is due to improper dosage and mishandling during the rescue? Who are those people who we see in the pictures holding leopards head, mouth its body? Are they trained, authorized or knowledgble?
  From the pics it can easily be perceived that they are not professionals and just for the hake of publicity and to show the bravery (?) they came into the scene.
  This whole episode was lasting for 6 hours since 6 pm. In this time was it so difficult o arrange the tranquilizing guns from Pune, to call experts?
  Why it has not been done?
  It was not a monster or fierce killer to put at death.

  Everyone including animal lovers or common people strongly regret for the poor animal death. And it has been raveled that it was all due to the irresponsible handling by untrained staff and local people cruel in human attitude.

  Solutions on this have been discussed since many years. Everyone knows what to do about it. What we need to have to rescue the distressed animal like this. But it’s just about the discussion. Nothing is true.
  If a forest department can not protect the wild animal why the departments itself exist?
  What our honorable Ministers are doing sitting in Mumbai in AC cabin and trying to save wildlife.
  Why they have been paid? If they are useless and not willing to work sack them and close the forest department and exterminate idescriminatly whatever little wildlife left in India.
  Once you kill all animals there is nothing to worry about such situations in future. SO I request if they don’t want to save the cause remove the cause itself so there will not be anything left to save and protect and evade our responsilities.
  I strongly condemn this whole episode and I urge to authorities to penalized the defaulters and create the arrangements to evade such incidences in future.

  I hope all sensible common people feel the way I feel and agree.

  Sagar Jadhav
  Pune

 2. ganesh said...
   

  What a shame!!!!! on those people who are responsible for the death of glorious treasury of forest...
  & really its very bad News..They wasted six hours & its not joke.
  Actually it happened improper Communication,lack of knowledge& facilities,lack presence of mind & Some stupid & foolish peoples.
  & one thing i want to mention It happened in PCMT,near Pune,which those cities are very rich but once again they can not control that type of situations,It was totally shameful incident.then whats condition of other cities,& villages, please think seriously on it,many animal lovers & forest friends those are living in pune,but they can't save the forest life,I think May be they don't have moral support,rights & well guidance or they musthave to take more efforts & Its need now,Its already late.
  "SAVE ANIMALS & SAVE FOREST"

  Regards,

  Ganesh Kshirsagar.

 3. Gouri said...
   

  Since there is no punishment to any person when you kill animal, these things are known as act of bravery.
  What next?
  How to avoid it in future?
  What should be the role of all animal lovers to avoid such things in future?

 4. captsubh said...
   

  १]मारून टाकलेल्या बिबट्याच्या शवविच्छेदन अहवालातून आता काय अपेक्षित आहे?संबंधी खात्याच्या आधिका-यांनी केलेली परस्परविरोधी वक्तव्ये यातूनच कांहीतरी गौडबंगाल आहे हे स्पष्ट झाले होते.त्याला फ़ुफ़ुसाचा रोग झाला नसला तरी तसे अहवालात लिहिले म्हणजे त्याच्या मरण्याचे उत्तरदायित्व माणसांऐवजी नैसर्गिक कारणामुळे झाले असे नमूद झाले!
  २]मानवाच्या वस्ती अक्राळविक्राळ तर्हेने जंगलतोड करून वाढतच आहेत.श्वापदांच्या natural habitat वर अतिक्रमणे होउ लागल्यामुळे सैरावैरा पळणारे प्राणी शहरांत शिरतात व त्यामुळे झालेल्या पळापळीमुळे व त्यांना सहज पकडण्याची कार्यक्षम यंत्रणा नसल्यामुळे लोकपण त्या उत्साहात त्यांच्यावर दगड फ़ेकतात व या सर्वात त्यांचा जीव घेतला जातो!
  ३]कांही वर्षापूर्वी नळस्टोपजवळपण असाच बिबट्या दिसला होता,पण त्याला गुंगीच्या डार्टने घायाळ केल्य़ावर सहीसलामत पकडण्यात आले होते!
  ४]शहरांची अमर्याद वाढ थांबविण्याचा कुठलाहि प्रयास दृष्टीपथात दिसत नाही.
  हजारो वृक्ष तोडून,प्रत्येक इंचन इंच जमीन बळकावून तिला बिगरशेती परवाने देवून ती विकसित करायला बिल्डर लोबीला परवानग्या देवून व तयार झालेल्या अजस्त्र इमारतीतल्या सदनिकांवर प्रचंड stamp duty लावून सरकार तसेच बिल्डर कोट्यावधी रुपयांची माया जमा करत आहेत!
  ५]इंद्रायणी नदीपात्रात हजारो ट्रक राडारोडा टाकल्याबद्दल इतका आरडाओरडा झाल्यावरसुद्धा महाराष्ट्राचे महसुलमंत्रीच म्हणतात की अतिक्रमणे झाली नाहीत!यांचा या प्रकरणाशी काय संबंध?
  हे मुख्यमंत्रीपदाचे इच्छुक कधी मुख्यमंत्री झाले तर राज्याच्या इंचन इंच जमीनीचे हरण करतील!
  यांच्या राज्यात काय संरक्षण मिळणार निरपराध पशुपक्षांना किंवा नैसर्गिक संपत्तीला!
  येवू द्या आणखी परप्रांतीयांच्या लोंढ्यांना!सध्या वाढवा पुण्याच्या हद्दी लोणावळ्यापर्यंत व कांही वर्षानी पुणेमुंबई एकच करून टाका!

Post a Comment