व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

चालायचे कोठून?



पुण्यातील वाहतुकीचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होतो आहे. नागरी वाहतूक अपुरी असल्याने दिवसेंदिवस दुचाकी चारचाकी वाहनांची संख्या तर वेगाने वाढतेच आहे; पण त्यांना लागणारे रस्ते मात्र मर्यादितच राहिले आहेत. रस्त्यांचे रुंदीकरण करण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली असली, तरी पादचारी मार्गाकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. रस्त्याचे काम सुरू झाले, की वाहतुकीची कोंडी होते, पर्यायी मार्ग शोधावे लागतात, त्यामुळे रस्त्याचे काम लवकरात लवकर संपवावे, असा दबाव नागरिक महापालिकेवर आणतात. याचा परिणाम म्हणजे रस्त्याचे काम वेगाने पूर्ण होते आणि पादचारी मार्गांचे काम रखडते. कर्वे रस्ता याला अपवाद नाही. रस्ते हे वाहनचालकांसाठी असतात; पण पादचारी मार्ग कोणासाठी, हे अद्याप लक्षातच येत नाही.
एक तर पादचारी मार्गांचा वापर काही मंडळी वाहनतळ म्हणून करतात, तर पथारीवाले आपला माल विकण्यासाठी चांगली जागा मिळाली असे मानून बस्तान मांडतात. अशा वेळी नागरिकांनी चालायचे कुठून? कर्वे रस्त्यावरील पादचारी मार्गांचे कामच अनेक महिन्यांपासून रखडले आहे. हा रस्ता रहदारीचा असल्याने भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांना चुकवत चालायचे कुठून, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. चालायच्याच मार्गावर खोदून ठेवल्यामुळे तर काही ठिकाणी नुसती खडी टाकून काम अर्धवट ठेवल्याने चालताना नागरिकांची गैरसोय होते आहे. महापालिकेने पादचाऱ्यांचे प्रश्‍नही लवकरात लवकर सोडवावेत, अशी त्यांची अपेक्षा आहे.

5 comments:

  1. RJ said...
     

    बाइक चा कधी तरी चांगला वापर करा !
    अशा उप~या विक्रेत्यांच्या सामानावर चालवायला !!
    नंतर वेगाने दामटली की झालं !!!

  2. Unknown said...
     

    सर्व मंत्र्यांना [पालकमंत्री धरून],खासदाराला,आमदारांना अशा फ़ुटपाथ नसलेल्या रस्त्यांवर जीव मुठीत घेवून व पोलिसचे संरक्षण न घेता तासंतास चालायला लावा कारण ते फ़क्त निवडणुकांपूर्वी मतांची भिक मागायला पक्षाच्या कार्यकर्त्यांचा लवाजमा घेवून गाजतवाजत पदयात्रा काढत आश्वासनांची खैरात करतात व निवडून आल्यावर सोइस्करपणे सर्व विसरतात मग नागरिक किंवा त्यांची वाहने खड्ड्यात पडोत!
    विक्रेत्यांचा पण तो जन्मसिद्ध हक्कच आहे की पदपथांवर आपली पथारी पसरण्याचा,पण त्यासाठी त्यांना हप्ते द्यावेच लागतात!तसेच त्यांच्याकडून विकत घेण्याचे कृत्य बहुतेक नागरिक करतातच परिस्थितीमुळे कारण कोण जाणार दूरदूरच्या दुकानात वा मार्केटात अशा मोडलेल्या किंवा व्यापलेल्या पदपथांवरून?
    आलिया भोगाशी असावे सादर!फ़क्त एकच सुख आहे की आपण एका अक्राळविक्राळ महासत्तेच्या महान शहरात वास्तव्य करून वास्तवाला विसरायला उद्युक्त केले जात आहोत राजकारण्यांच्या व महापालिकेच्या सौजन्याने!

  3. Anonymous said...
     

    hahahah,
    before putting these comments, please look into urself. what u do for the nation? if ur behabiour is completely legal? have never given bribe to trafic police? have u never voted for these polotitians? why dont u get into politics? first do something... then say

  4. Anonymous said...
     

    coming soon: (hey anonymous please note)
    After spending 4 years in india - that too trying to live like a common man (and fearing death like Socretis)
    Here comes some hope - www.suraajya.com

    Soon there will be a campaign to ask you similar questions that the anonymous has asked -
    something like - in last 10 decisions you made
    how many were related to your financial welfare
    how many were for society
    how many were for the family
    etc.

    Let the moment begin...

  5. Anonymous said...
     

    read that as:

    www.surajya.com

Post a Comment