93 वर्षांचा काळ जाऊनही बदल नाहीच?
पुणे शहरातल्या विविध भागांमध्ये लोक सकाळी व्यायामासाठी चालत किंवा पळत निघालेले दिसतात. वाटेत त्यांना कचऱ्याचे ढीग दिसतात. काही ठिकाणी दुर्गंधीमुळे नाकावर रुमाल ठेवून जावे लागते. 93 वर्षांपूर्वी (1914 साली) मात्र काही जागरूक पुणेकरांनी स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी प्रभातफेऱ्यांची मोहीम सुरू केली होती. याबद्दल "ज्ञानप्रकाश'मध्ये पुष्कळ विस्ताराने तेव्हा बातम्या प्रकाशित होत होत्या.
1914 मध्ये पुण्यात "आरोग्य मंडळ' ही खासगी संस्था स्थापन झाली। तिच्या कामाबद्दल "ज्ञानप्रकाश'मध्ये माहिती प्रकाशित झाली होती. त्यात असे म्हटले होते, की या संस्थेचे काही चालक दररोज सकाळी बाहेर पडत. त्या वेळी त्यांना नागरिकांच्या एका घाणेरड्या सवयीचे दर्शन घडे. अनेक जण घरातला कचरा वरच्या मजल्यावरून खाली फेकून देत. तो कचरा अंघोळ करून देवळात निघालेल्या कोणा भक्तांच्या डोक्यावरही पडे. घराबाहेर कचरा फेकायच्या या सवयीमुळे शहर मलिन व अस्वच्छ दिसे...
विधायक बदल आता जरूर दिसताहेत...पण इतक्या दीर्घ कालावधीत व्यापक पातळीवर सार्वजनिक स्वच्छतेच्या मुलभूत सवयींमध्ये इतकी उदासिनता का टिकून राहिलीय?

0 comments:
Post a Comment