व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

सिंहगड रस्त्यावर बीआरटीचे पडघम...



(पर्याय नवा; पण सावधपणा हवा)

सातारा रस्त्यावरील "बीआरटी' आता सिंहगड रस्त्याच्या तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यावर बाजूने आणि विरोधी अशा दोन्ही प्रतिक्रिया उमटत आहेत; मात्र वाहतुकीच्या प्रश्‍नातून तोडगा हा काढलाच पाहिजे, यावर दोन्ही बाजूंचे एकमत आहे. हाच विधायक दृष्टिकोन ठेवून "बीआरटी'च्या प्रश्‍नावर सर्वंकष चर्चा होणे आणि त्यात नागरिकांनीही सहभागी होणे, ही काळाची गरज आहे. सातारा रस्त्यावर हा प्रकल्प राबविताना काय उणिवा राहिल्या आणि त्यातून काय बोध घेणार, हासुद्धा महत्त्वाचा विषय आहे.

शहरातील रस्ते कितीही वाढले, रुंद झाले, तरी वाढत्या खासगी वाहनांमुळे ते अंतिमत: अपुरेच ठरतात. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक बळकट करणे, हाच त्यावरील पर्याय आहे, यावर अनेक तज्ज्ञांचे एकमत झाले आहे. स्वस्त आणि वेगवान सार्वजनिक वाहतूक उपलब्ध असेल, तर स्वत: वाहन घेऊन त्या कोंडीत जाण्याचा विचार नागरिक आपोआपच सोडून देतील, हा विचार मान्य झाल्याने त्यावर विविध प्रयोग सुरू आहेत. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीस (पुण्याचा विचार करता पीएमटी) विनाअडथळा मार्ग उपलब्ध करून देणे, हे "बीआरटी'चे मुख्य सूत्र आहे. यासाठी केंद्र सरकारने सुमारे पाचशे कोटींचे अनुदानही मंजूर केले आहे.
सिंहगड रस्त्याचा प्राधान्याने विचार
सिंहगड रस्ता अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. शहराच्या आसपास वेगाने विकसित होत असलेल्या भागांपैकी हा प्रभाग आहे. सर्वच भागात घरांच्या किमती आकाशाला भिडलेल्या असताना सिंहगड रस्ता परिसरात किंचित का होईना त्या तुलनेत आवाक्‍यात असल्यामुळे हा भाग आपलासा वाटत आला आहे. त्यामुळे या भागात साहजिकच संमिश्र वस्ती आहे. स्वत:च्या मोटारी आणि दुचाकी वाहनांबरोबरच सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणाऱ्या नागरिकांचे प्रमाण या भागात मोठे आहे. भरून वाहणाऱ्या पीएमटी बसबरोबरच पूर्वी सहा आसनी रिक्षा आणि आता "पिऍजिओ' (पॅगो) यासुद्धा नागरिकांसाठी अपुऱ्या ठरत आहेत. या मार्गावर पीएमटीची संख्या भरपूर आहे, तशीच प्रवाशांचीही. त्यामुळे पीएमटीने ज्या 60 मार्गांचे खासगीकरण करण्याचे ठरविले आहे, त्यामध्ये सिंहगड रस्त्याचाही समावेश होतो.
"बीआरटी'साठी आवश्‍यक त्या पायाभूत सुविधासुद्धा या रस्त्यावर उपलब्ध असल्याचे प्रशासनाचे निरीक्षण सांगते. एक तर सलग काही किलोमीटर अंतराचा सरळ रस्ता ही यासाठी मोठी उपलब्धी आहे; तसेच दांडेकर पुलापासून वडगावपर्यंत या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण झालेले आहे आणि पुरेसे रुंदीकरणसुद्धा; मात्र पर्यायी रस्ता नसल्याने आणि सक्षम सार्वजनिक वाहतूक नसल्याने काही ठराविक वेळात हजारो खासगी वाहने रस्त्यावर येतात आणि वाहतुकीच्या कोंडीचा अनुभव नित्याचा बनला आहे. त्यामुळेच येथे "बीआरटी'ची व्यवस्था नागरिकांना उपयुक्त ठरू शकते, असा विश्‍वास प्रशासनाला आहे.
सावधपणा आवश्‍यक
ंमात्र, ही वैशिष्ट्ये असली, तरी सातारा रस्त्यावर "बीआरटी' राबविताना जे अनुभव आले, त्यामधून काही शिकणे आवश्‍यक ठरणार आहे. सातारा रस्त्यावर बीआरटी राबविताना त्यात काही उणिवा राहिल्याचे सांगण्यात येते. त्यामध्ये सर्वांत मोठी उणीव म्हणजे तो राबविताची चुकलेली वेळ. निवडणुकीच्या तोंडावर बीआरटी लागू करण्याची घाई करण्यात आल्याचे अनेक जण आता उघडपणे सांगत आहेत. त्यामुळेच रस्त्याचे पुरेसे रुंदीकरण आणि अन्य पायाभूत कसोट्या पूर्ण न करताच ती लागू केल्याने प्रारंभी फटका बसला. दुसरी आणि सर्वांत महत्त्वाची उणीव ठरली, ती म्हणजे लोकशिक्षणाकडे झालेले दुर्लक्ष. या परिसरातील लोकप्रतिनिधी आणि अन्य विरोधी पक्षांचे नेते, प्रशासन यांनी नागरिकांना पूर्वी विश्‍वासात घेऊन बीआरटी मार्गावर जाण्यास प्रतिबंध करण्याबाबत किंवा एकूणच वाहतुकीच्या शिस्तपालनाबाबत प्रशिक्षण देण्याची गरज होती; परंतु ते पुरेशा प्रमाणात झाले नाही, असे लक्षात येत आहे.
सद्यस्थती काय?
जुन्या चुका होऊ नयेत, म्हणून स्वारगेट ते सिंहगड रस्ता या नियोजित बीआरटी मार्गाचा तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) करण्याचे काम सध्या सुरू आहे; मात्र यासाठी या परिसरातील लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांना विश्‍वासात घेण्याची गरज निर्माण झाली आहे. या परिसरात सुशिक्षित नागरिकांचे प्रमाण मोठे आहे; तसेच नागरिक कृती मंच, विविध सहकारी गृहरचना संस्था अशा व्यासपीठांवरून या प्रश्‍नाची सांगोपांग चर्चा होणे आवश्‍यक आहे. या प्रश्‍नाला पक्षीय स्वरूप न देता सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या अडचणी प्रशासनापुढे मांडाव्यात आणि प्रशासनानेही त्याकडे दुर्लक्ष न करता त्यातून तोडगा काढण्यासाठी पावले उचलावीत, हेच शहाणपणाचे ठरणार आहे. काही झाले, तरी वाहतुकीच्या प्रश्‍नातून कायमस्वरूपी मार्ग काढणे, हे आव्हान प्रशासन, सत्ताधारी, विरोधक आणि नागरिकांनाही पेलावे लागणार आहे. सुरक्षित, सुलभ आणि विश्‍वासार्ह अशी वाहतूक व्यवस्था असलेले शहर आपल्याच घरातील पुढच्या पिढीच्या हाती सोपविण्याची जबाबदारी शेवटी आपलीच नाही का?

जितेंद्र अष्टेकर

4 comments:

  1. Anonymous said...
     

    I am totally agreed with the views of Mr.Jitendra Ashtekar.
    I want to add few more things to it.

    Now a days everybody thinks that breaking rules is a ststus symbol, or it is impressive. But while breaking rules they put their life as well as other's life in danger.

    I think First of all we should me self deciplined.

  2. rahulavachat said...
     

    I am totally against BRT. It is a foolish concept atleast for pune.

    I have few questions, if answers are "YES" according to you then BRT is good, else not....

    1. Do you think, the kind of polititians, corporation and police system we have will be able to empower public transport in Pune?
    2. Consider, there are 1000 PMT buses in Pune. You all know the number of privately owned vehicles in oune. If you look at the % then PMT is just 1 %. Consider 55 people travel by one bus and throughout the day each PMT bus does 12 trips.(Assuming figures) This comes to 12000 trips X by 55 people. 660000 people travel by PMT. There are 3500000+ daily commuters in pune commuting using various modes. Looking at this ratio, just 15% - 16% people are using PMT as a primary mode of transport. And do you feel appropriate, for 15% travellers you are occupying 50% to 60% width of road? Look at the mess happened at satara road. Normal road is always stuffed with vehicles and BRT track is empty.
    3. Now it is more than 1 year that BRT exists in pune. PMT should declare (the facts) how much % they have grown as far as quality of service is concered. PMT should publish statistics of Before & After BRT. considering population growth rate, results should be evaluated. Am I right?
    4. Now coming to practical problem. The fools (polititians), they are just copying BRT for sake of troubling people (Janata=jantoo). All our buses has doors at left side. So it will be ideal to keep the BRT track on road banks not in the middle. This is causing wasting space, becasue two different bus stops are necessary. Secondly, crossing BRT track and road is troublesome for people and vehicles as well. Wherever there is a bus stop, it occupies 4 lanes of road. 2 lanes for bus track and 2 lanes for stops. In other countries where buses are left side driven and doors are at right side, they utilise a single but dual sided bustom in the middle of the road.
    5. Are pune roads wide enough to accomodate this 3-4 lane affair?

    The same way there are many more questions about BRT's effectiveness, but punekars are "Mendhara" konihi haaka, kashihi haaka. Swatah vichar karnaar nahit. Hyacha rajkaranyana faayada hoto.

    Aaj BRT peksha effective upaay aahet, pan tya upayane kharech prashna suttil mhanoon te kelew jaat nahit. thodasa vichar kaara...shakya aahe he...
    1. If During day time, goods carrier and heavy vehicles are banned on each and every road. light commercial vehicle also. Only vehicle which carry people will be allowed.
    2. if signal system is fine tuned
    3. if policemen are real strict
    4. if people are strictly forced to follow the rules and if caught badly fined
    5. if we encourage "vehicle pooling"
    6. if one-ways are properly planned and strictly observed
    7. if every driver observes lane disipline (Punekars dont even know what is lane system, each and every vehicle shuffles accross the lanes as if they own the road)

    On top of everything, now pune needs to be planned in futuristic way. aaltoo faltoo solutions and trial and errors wont make pune survive. the plans like having a huge flyover on complete mutha river needs to be thought over (From sinhagad road till Kharadi).

    Huge thoughtful flyovers need to be constructed (not like univercity).

    I should stop now otherwise my comment will be bigger than main article. But I want punekars to think practically before supporting any plan proposed by polititians. We dont need politically correct solutions, we need practically correct solutions.

  3. Anonymous said...
     

    No Tunnels, No Fly-owvers , No BRT required.

    Look at following facts from Bangalore.

    http://www.bmtcinfo.com/english/index.htm

    http://www.bmtcinfo.com/english/atpresent.htm

    Deploy a fleet of 4859 buses
    Carry 37.00 Lakhs Passengers /per day
    Perform 10.49 Lakhs Service Kilometres /per day

    Earn around Rs.227.94 lakhs /per day

    http://www.bmtcinfo.com/english/mission.htm

    To provide
    Efficient, Economic, Safe, Reliable and Punctual services to the commuters of City
    and Sub-urban areas of Bangalore.

    Today, we are the ONLY PROFIT MAKING PUBLIC SECTOR URBAN TRANSPORT CORPORATION IN THE COUNTRY. (More than Rs.150 crore is their profit in last 1 year).

    Profit Making Bangalore City bus is required for Pune.
    No Tunnels, No Fly-owvers , No BRT required.
    These all infrastructure projects are wastage of public money.(And people know how much percent goes in the pockets of the politicians and officials)

    Use all that money to buy the new PMT buses.

    Bangalore MTC has only 4.3 employees per bus. Pune has 7.3 employess per bus.
    In PMT : These extra 2700 extra emplyees are hte reason for "loss-making" PMT.

    Bring the 03 or 04 expert officers from BMTC to PMT for 03 years.
    And PMT can become profit-making.

  4. 24b87531829388d15cd35fa3b4733000053b8acd said...
     

    सातारा रस्त्यावरील पहिली चूक म्हणजे बीआरटीचा मार्ग रस्त्याच्या मधून आहे. ज्यांच्यासाठी ही योजना करायची त्यांना रस्ता ओलांडण्यासाठी कसरत करावी लागते.

    दुसरी चूक म्हणजे चौकात बसथांबे केले आहेत, त्यामुळे वाहतूकीचा खोळंबा होतो. दोन चौकांच्यामधे थांबे केले तर हे टाळता येईल.

    एसटी व खाजगी बसेसना सुद्धा बीआरटीच्या मार्गावरून जाऊ द्यावे, फक्त त्याना स्थानीक प्रवासी वाहतूक केल्यास दंड करावा.

    वाहतूकीत खरा अडथळा राजकारणी आहेत, तो कसा दूर करणार?

Post a Comment