व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

झोपडपट्टी पुनर्वसन आणि प्रश्‍नांची मालिका

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्याबाबतीत काही प्रश्‍न उभे राहात आहेत. झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन करायला हवे, याबाबत कोणाचाही आक्षेप नाही. आक्षेप आहे, तो त्या पद्धतीला, बिल्डर्सना देण्यात येणाऱ्या टी.डी.आर.ला. आणि वाढीव टी.डी.आर.मुळे शहरावर येणाऱ्या प्रचंड ताणाला. दहा कोटी चौरस फुट बांधकाम म्हणजे दुसरे शहरच! दोन शहरांचा भार एका शहरावर देणे योग्य आहे का? आणि मुळात पहिल्या शहराला तो ताण करणे शक्‍य होणार आहे का?


या योजनेमुळे शहरावर नक्की काय परिणाम होणार आहे, झोपडवासीयांना दाखविण्यात येणारी स्वप्ने खरोखरच पूर्ण होणार आहेत का? तुमचे काय मत आहे? शहरावर ताण न देता पुनर्वसन झाल्याची उदाहरणे तुम्हाला माहीत आहेत का?

सविस्तर बातम्या वाचण्यासाठी खालील लिंकवर क्‍लिक करा

फायदा भलत्यांचा, पुणेकर मात्र वेठीला
पाहिजेत किमान 2500 कोटी रुपये, पाणी आणि जागाही...

2 comments:

 1. Arvind said...
   

  The basic necessities will collapse. Few rich builders will be benifitted but what about the common man? Is there no one who can think of them?
  The city is already facing many problems. What would happen to Fresh water supply, drainage system, the dream of clean and green city.
  The development is inevitable, but it should not be at the cost of common man.
  Remember what happened after the slums of Mumbai were developed. The rich builders

 2. Arvind said...
   

  पुणे शहर जागतिक नकाशावर आले, परंतु शहराच्या चेहऱ्यामोहऱ्यात फारसा बदल झालेला दिसत नाही. कॉंक्रीटचे जंगल, वाहनांची बेसुमार वर्दळ आणि वाहतूक व्यवस्थेला न जुमानणारे वाहनचालक, अफाट वृक्षतोड, गगनाला भिडू पाहणारी महागाई या सर्वांमुळे सर्वसामान्य पुणेकर त्रस्त झाला आहे. त्यातच झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. पुण्यातील झोपडपट्ट्यांनी बराच मोठा भूभाग व्यापला आहे. या जमिनीचा विकास करण्याची महापालिकेची योजना आहे. त्यातूनच बिल्डर्सना वाढीव टी. डी. आर. देण्यावर विचार चालू झाला आहे.
  त्यामुळे नागरी सुविधांबाबत अनेक प्रश्‍न निर्माण होणार आहेत. शहरांतर्गत शहर असे त्याचे वर्णन करण्यात येत आहे. सुमारे दहा लाख नव्या लोकांना सामावून घेणाऱ्या या नव्या शहराला कराव्या लागणाऱ्या पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण यंत्रणेवर पडणारा ताण, आधीच अरुंद असलेल्या रस्त्यांवर नव्याने येणारी वाहने, नव्याने येणारे लोक प्रामुख्याने परराज्यांतील असतील, असे गृहित धरल्यास शहराच्या सुव्यवस्थेबाबत त्यांना आत्मियता वाटेल काय?
  या सर्व खटाटोपातून केवळ काही बड्या बिल्डर्सनाच त्याचा लाभ देण्याचा हेतू असावा, असा संशय येण्यास बराच वाव आहे. शहराचा विकास करताना मूळ पुणेकरांच्या हिताचाही विचार झालाच पाहिजे.

Post a Comment