एखादा बळी गेल्यावरच काम होणार का?
वाढती वाहतूक आणि पादचाऱ्यांची सुरक्षितता, या गोष्टींचा विचार करून विविध ठिकाणी भुयारी मार्ग किंवा फ्लायओव्हर बांधण्यात येतात. आपण मागे याच ब्लॉगवर अशा सुविधांचा कितीसा वापर होतो, याविषयावर चर्चा केली होती. असे असले, तरी ज्या ठिकाणी त्यांचा वापर निश्चित होईल, नव्हे या सुविधा आवश्यकच आहेत, तेथे मात्र ही कामे रखडलेली दिसतात. उदाहरणच द्यायचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) येथील रस्त्याचे देता येईल. प्रचंड ट्रॅफिकमधून जीव मुठीत घेऊन हा रस्ता क्रॉस करावा लागतो. त्या रस्त्यावर भुयारी मार्ग मंजूर झाला आहे. नुसता मंजूरच नाही, तर तिथले भूमिपूजनही झाले आहे. तरीही रस्ता रखडला तो रखडलाच.
काय करावं अशा वेळी? ही फिल्म पाहिली, की तिथला धोका जाणवतो. तो जसा आपल्याला जाणवतो, तसाच प्रशासनालाही जाणवत असेल. तरीही ही मंडळी गप्प का? एखादा बळी गेल्यावरच हे काम पूर्ण होणार आहे का?
aho bharat ahe... maharashtra ahe.. PMC ahe...
kase honar kaam?
ya political kutryaannnaa ani PMC madhlya mad buddhi lokana swatache sodun janatechi kame karayla vel kuthe ahe?
Lok bharat desh sodun ka jaat ahet he sadharan kalate ahe mala..
Aplya ithe jeevachi kimmat nahich..