व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

कृपया.. आमचा वापर करा!

महापालिकेने आम्हाला कचरापेट्या द्याव्यात, रस्ता ओलांडायला पूल, पादचारी मार्गांची गरज आहे, रस्त्यावरच्या दिव्यांचे काय झाले, अशा अनेक मागण्या सतत होत असतात. प्राथमिक सुविधांसाठी सतत टीकाही केली जाते; पण ज्यांना या सुविधा मिळाल्या आहेत, ती मंडळी खरंच त्यांचा वापर करतात का?शहराच्या विकास आराखड्यात महापालिका सर्वांत प्रथम नागरिकांना मूलभूत सुविधा कशा मिळतील, याचा विचार करीत असते. दर वर्षी यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूदही केली जाते; पण नियोजनानुसार कित्येक वेळा अंमलबजावणी होत नाही. अनेक कामे वर्षानुवर्षे अर्धवट राहिलेली आढळून येतात. वाहनतळ, पादचारी मार्ग, बसथांबे, कचरापेट्या, रस्त्यावरील दिवे, पोलिस चौक्‍यांना सर्वाधिक मागणी असते. त्यानुसार महापालिका टप्प्याटप्प्याने या सुविधा पुरविण्याचे कामही करीत आहे; मात्र ज्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत, ते नागरिक त्यांचा उपभोग घेतात का, हा खरा प्रश्‍न आहे.
पुण्यात अशा अनेक सुविधा आढळून येतात, ज्या खास नागरिकांच्या मागणीमुळे उपलब्ध करण्यात आल्या आहेत आणि त्यांचा वापर केला जात नाही. अलीकडचेच उदाहरण घ्यायचे झाले, तर जिल्हा परिषद आणि शासकीय मध्यवर्ती इमारत यांच्या मधील रस्त्यावरून नागरिकांना रस्ता ओलांडता येणे अवघड असल्याने "पादचारी पूल' बांधण्यात आला होता; पण नागरिक त्याचा वापरच करीत नसल्याने तो पूल काढण्यात आला.
कोथरूड, शिवाजीनगर आणि पाषाण या भागातील अशा काही सेवा "सकाळ'ने शोधल्या आहेत.
नळस्टॉप :
नागरिक आणि सायकलस्वारांसाठी "पादचारी मार्ग' बांधण्यात आले आहेत; पण नागरिक त्यावरून न जाता रस्त्यावरून चालतात. त्यामुळे मोकळी जागा दिसली, की लगेचच त्याचा वापर "पार्किंग'साठी करायची सवय असलेले गाडीस्वार या पादचारी मार्गांचा वापर "वाहनतळा'साठी करीत आहेत.
एसएनडीटी "पादचारी पूल' :
कोथरूड डेपो, स्टॅंड, वारजे माळवाडीकडे जाण्यासाठी एसएनडीटी चौक हा अतिशय रहदारीचा रस्ता आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या गाड्यांमुळे पादचाऱ्यांना रस्ता सहजासहजी रस्ता ओलांडता येत नाही. म्हणून येथे पादचारी पूल उभारण्यात आला; मात्र "शॉर्टकट' बघणारे नागरिक याचा वापर न करता जीव मुठीत धरून हा रस्ता ओलांडताना दिसतात.
भोसले भुयारी मार्ग :
जंगली महाराज रस्त्यावरील भोसले भुयारी मार्गाचीही स्थिती काही वेगळी नाही. पादचारी जमिनी खालून नव्हे, तर रहदारीच्या रस्त्यावरून जात असल्याने भुयारी मार्गाचा वापरच होत नाही. पाऊस, ऊन आणि थंडीपासून संरक्षण मिळण्यासाठी योग्य जागा आहे म्हणून भिकारी मात्र भुयारी मार्गामध्ये राहायला येतात.
भुजबळ बाग :
नागरिकांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय म्हणजे कचरा पेट्या! रोजचा कचरा कोठे टाकायचा? सोसायटी, कॉलनीजवळ कचरापेटी नाही, रस्त्यावर टाकणे योग्य नसते, अशी टीका ते करतात; पण कित्येक नागरिकांना कचरापेट्या उपलब्ध करून दिल्या असल्या, तरी ते वापरत नाहीत. कचरापेटीच्या बाजूला कचरा टाकतात. याशिवाय झेब्रा क्रॉसिंगवरून रस्ता न ओलांडणे, बसथांब्यावर न थांबता रस्त्यावर उभे राहणे, निर्माल्याच्या पेट्यांचा वापर न करणे अशी अनेक उदाहरणे या भागांत आढळून येत आहेत.

- चैत्राली चांदोरकर

5 comments:

 1. Sheetal said...
   

  सकाळ ने हा खूपच चांगला उपक्रम सुरू केला आहे. खरे तर अश्या सुविधांचा उपयोग करून घेतला तर कितीतरी समस्या दूर व्हायला मदत होईल. थोडेदीवस पादचार्याना ही काही दंड अकारण्यात आला तर ह्या सोयी सक्तीने वापरल्या जातील आणि हळूहळू सगळ्याना सवय लागेल.

 2. Anonymous said...
   

  Although few facilities are created like sub-way, foot-pathor pedesterian over bridge, by PMC; it is rightly noted that we learned citizens are not using. Not only that we create or add to the traffic problems. If untoward incident took place it always bigger vehicle is blamed.STOP THIS.In case of accident punish pedesterian who is crossing at unmarked ares. Traffic police can appoint more wardens for this duty.

 3. Suhas said...
   

  hmmm... here you are talking about footpaths, subways, etc., etc. i have not seen any footpath between mhasoba gate to agriculture college... especially on university road the presence of footpath is absolutely none. the authorities have built up 3-4 flyovers, but not a single footpath.. the quality of roads right below the flyover is poor... and above all, the signals on this road do not work... e.g. agriculture college signal is not working for last 3 months... how can people walk on the road? or should they take rickshaw to cross the road??

 4. Anonymous said...
   

  Agreed that the facilities where provided not many people are using it and they should be punished.
  The people should be punished based on the age or disability I would say. An 80 year old person cannot crossover the footover bridge because it is very difficult for him to climb so many steps.
  A disable person cannot walk over the foot over bridge.
  Heart patient cannot clib the bridge.
  I agree with the punsishment but it should not be in monetory terms but the person should go to prison serve in prison for some days and also pay to the government for being in prison. He should not be allowed to use tax payers money.
  What say?

 5. Anonymous said...
   

  Encroachment in Pune
  (August 25, 2007)
  Refer to same article in "Esakal.com".
  It said that one "nagarsevak" (Dr. dhende) is against this "drive of encroachment removal"

  Also the union is asking to stop this drive. They are demanding the "re-habilitation before this action". Their demand is 101% illegal. They have no right to do any business on the roads or footpaths. The roads are for vehicles and footpaths are for pedestrians only.

  Also refer the news in esakal.com about encroachment in "Tulshibag". Judgment given by the Hon. Hight Court is significant. The same rule / judgment should be use and the 25000 encroachments should be removed permanently.

Post a Comment