व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

अपघात होतात, पण कोणीच "पाहत' नाही!

पुण्यातील रस्त्यांवर वाहनचालक बेदरकारपणे वाहन चालवत नागरिकांना उडवत आहेत. दिवसा ढवळ्या अपघात घडवणारे निघून जातात. चार बघेही जमतात. काही जण अपघातग्रस्तांना मदतही करतात. मात्र; अपघाताची माहिती देण्यास कोणी पुढे येत नाही. खूप संतापजनक गोष्ट आहे ही. या साऱ्यामुळे अपघात करणारे खुलेआम फिरत आहेत. त्यांना शिक्षाच झाली नाही, तर अशा प्रकारे बेदरकारपणे गाड्या चालविणाऱ्यांची संख्याही वाढण्याची शक्‍यता आहे. मुळात आज दुसरे जात्यात आहेत. आताची परिस्थिती कायम राहिली, तर आपल्यासारखे सुपातले जात्यात येण्यास कितीसा वेळ लागणार आहे?
नुकत्याच शहरात असा दोन घटना घडल्या. होळकर पुलाजवळ झालेल्या अपघातामध्ये डॉक्‍टर महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. "बीएमसीसी'जवळ झालेल्या अपघातातील तरुण रुग्णालयात गंभीर अवस्थेमध्ये आहे. मात्र, हे दोन्ही अपघात कसे घडले, कोणी घडवले, हे सांगणारे अजून कोणी पुढे आलेले नाही.

बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेने एक मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला. तो कोमात असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दत्तात्रेय शांताराम पवळे गेल्या बुधवारी सकाळी मोटारसायकलवरून कामावर जात असताना फिरोदिया हॉस्टेलनजीक त्याला अज्ञात वाहनाची धडक बसली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला बेशुद्धावस्थेत जोशी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर आहे. अपघातासंदर्भात कोणाला माहिती असल्यास विलास पवळे (मोबाईल 9226937144) अथवा महेश पवळे (9850607088) यांच्याशी संपर्क साधावा.

बंडगार्डन पुलावर नुकत्याच झालेल्या एका अपघातातील जखमी महिलेचा उपचार चालू असताना मृत्यू झाला. मात्र, प्रत्यक्ष अपघात पाहिलेले साक्षीदार नसल्यामुळे अद्याप गुन्हा दाखल होऊ शकलेला नाही. 17 जुलैला दुपारी दीड वाजता एका अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे डॉ. गीतांजली अमित स्वामी गंभीर जखमी झाल्या. काही महिलांनी उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान डॉ. स्वामी यांचा सायंकाळी मृत्यू झाला. हा अपघात पाहिलेल्या अथवा रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या महिलांनी येरवडा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संपर्क येरवडा पोलिस ठाणे- 26684456.

6 comments:

  1. Unknown said...
     

    कोण पाहणार? आणि पाहुन तरी काय करणार? पॊलिस त्रास देणारच नाहीत, याची खात्री कोण देणार? देताय तुम्ही? आणि त्रास देणार नाहीत याची ख़ात्री असेल तर लोकाना दिसायला लागेल आपोआप!
    -अमित

  2. Anonymous said...
     

    अमीत सी सहमत

  3. Unknown said...
     

    Kharokhar polisanchi itaki dhasti apalya deshat khup aahe. Polisanach jasta ghabarale jate itar konahi peksha. Polis are for Help! he patel ase kahi kele pahije adhi haluhalu sagale badalel.

  4. Unknown said...
     

    पोलिसी खाक्या व दरारा सर्वात जास्ती पोलिस स्टेशनवर दिसून येतो.तो गुन्हा करणा-या व्यक्तिंच्या बाबतीत ठीक व जरूर असतो.
    तसेच काही कारणाकरता पोलिसांची मदत मागायला गेले तर समोरची व्यक्ती पाहून ते बरेचदा आपुलकीने व सहानुभूतीने उत्स्फ़ुर्त मदत करतात.
    परंतु रस्त्यावर झालेल्या/पाहिलेल्या अपघाताबद्दल जर कोणी काही सांगायला धजाविलेच तर पहिल्यांदा हा कोण महामुर्ख स्वतःच्या फ़ावल्या वेळात त्यांना कष्ट देण्यास व स्वतःची मान पण अड्कविण्यास आला अशी वागणूक देतात व तक्रार नोंदविण्यास कांकू करतात.
    येवढे झाल्यावरहि तक्रार नोंदवा असा आग्रह धरल्यास रीतसर नोंद करतात व त्या दिवसापासून सामान्य माणसाच्या पोलिस स्टेशन व नंतर कोर्टाच्या फ़े-या कायमच्या सुरू होतात जेणेकरून त्या व्यक्तीला व त्याच्या जवळच्या नातेवाईकांना कुठून ही ब्याद/आफ़त स्वतः ओढवून घेतली याचा पस्चात्ताप होउ लागतो.
    आम जनतेला याची चांगली जाणीव असल्यामुळे ते या भानगडीत कधीच पडायला तयार नसतात.
    त्यात hit & run गुन्हा करणारी व्यक्ती गुन्हेगारी स्वभावाची असली तर वेळप्रसंगी तीपण नांव व पत्ता काढून दम द्यायला पुढेमागे बघत नाही.
    अपघातांच्या समस्येचे मूळ आपली बेसुमार वाढती लोकसंख्या,चंगळवाद,काही तरूणांची दारू पिउन मोठ्या अश्वशक्तीच्या गाड्या बेफ़ाम चालविण्याची प्रवृत्ती इत्यादि कारणातच आहे व याला कोणीच आळा घालू शकत नाही!
    गेले ते सानेगुरुजींचे भूतदयेचे दिवस जेव्हा रस्यावर पडलेल्या घायाळ चिमणीलासुद्धा बाजूला नेउन पाणी व मलमपट्टी केली जायची.
    रस्त्यांवर सांभाळून व दक्षतेने चाला/वाहन चालवा व स्वतःची कातडी सुरक्षीत ठेवा एवढच आजकालच्या जमान्यात शक्य व रास्त आहे.
    फ़क्त वरिष्ठ पोलिसांनी जर लेखी आश्वासने दिली व त्यानंतर सतत पाळली व हे जर जनतेला कळले तरच थोडेफ़ार साक्षीदार तक्रार करण्यास कदाचित धजावतील.
    सुभाष भाटे

  5. rahulavachat said...
     

    Ekdum, Sahamat.

    Policancha sasemira ekhadya saral manasachyach mage lagato. Eravi hech police gundanchya pudhe laalghote pana kartat. Aajkaal policana MANAGE kele aahe ha vakprachar faar common zala aahe.

    Ekhadya vyaktine jar aapanhoon pudhe yevoon madat karayache mhanale tar tyala hya polican kadun kiti manasik tras hoto, and at the end of everything, accidentla kaaranibhoot aaslelya manasakadoon paise miltat aani sagali settlement hote aani toch gunhegaar nantar , vinakaaran, saksha denarya manasas traas deto. SO BEING A WELL EDUCATED PERSON I SAY, DONT HELP ! BE HAPPY !

  6. Unknown said...
     

    Nahi, Nahi, saglyanni, kashya aaplya polis dadachya virodhat aapli mat sangitale pan he kahi barobar nahi h!


    Karan aapan he visarata kama naye ki aapan je kahi nivantpane jagto te fakta ani fakta polisachya var vishwas theunach.

    Tumhala jar bagaych asel tar kalpana kara ki Polis nastil tar!!!!!!!!!

    Kalpana karunach aaplyala kalel ki kay mahavta aahe polis dadach aapalya jivnat.


    Police nastil tar.............?



    Pradip Patil
    Karve Nagar, Pune

Post a Comment