पॉटरमॅनिया...
पॉटरमॅनिया सध्या पुणेकरांवरही जादू करून आहे. "हॅरी पॉटर अँड द ऑर्डर ऑफ द फिनिक्स' या पॉटर मालिकेतला आणखी एक चित्रपट आज प्रदर्शित झालाय. पुस्तक मालिकेतील अखेरचा भाग, असे भाकीत वर्तवल्या जाणाऱ्या "हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज'च्या जवळपास सगळ्या प्रती बाजारात येण्यापूर्वीच "आरक्षित' झाल्याहेत..
पुण्यात विविध दुकानांत मिळून या पुस्तकाच्या जवळपास दहा हजार प्रती येतील. २१ जुलैला हे पुस्तक बाजारात येतंय. विशेष म्हणजे पुस्तकाची किंमत ९७५ रुपये असूनही ९० टक्के प्रती आरक्षित झाल्याहेत. त्यामुळे २१ जुलैला पहाटेपासूनच दुकानांबाहेर रांगा लागतील, असे चित्र आहे. हॅरी पॉटरचं पुस्तक म्हणजे यशाची खात्री, हे समीकरण डोळ्यांसमोर ठेवून पुस्तक विक्रेत्यांनी नवनवी "मार्केटिंग गिमिक्स'ही सुरू केली आहेत.
हॅरी पॉटरचं यश खरंच अद्भूत आहे...या यशापासून शिकण्यासारखं खूप काही आहे. पुस्तकाचं मार्केटिंग कसं करावं, खपवावं कसं इथंपासून ते लहान मुलांना वाचायची सवय पुन्हा लावण्यापर्यंत अनेक गोष्टी हॅरी पॉटरनं दिल्या. तुम्हाला काय शिकता आले...? आणि समजा आपण ठरवंल, मराठीत हॅरी पॉटर तयार करायचा, तर...?
"Faster Phene" ha marathi madhil Harry Potter hovu shakto.
As per my Friends (Potter Lover) views and Mine 2 - Movie bakwas ahe, ani specially jyani pustak wachale asel tyani tar bilkul tras gheu naye movie baghanyacha...