व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

गुड न्यूज....

आज चार चांगल्या बातम्या आहेत. आपल्या सगळ्यांच्या उत्तम प्रतिसादामुळे आपल्या ब्लॉगने 100 कॉमेंट्‌सचा आकडा पार केला आहे. हिट्‌स 5900च्या वर कधीच गेल्या आहेत.
आपल्या विविध कॉमेंट्‌स आणि त्याला मिळालेली सकाळ प्रतिबिंब पुरवणीची जोड यामुळे काही कामेही होताना दिसत आहेत.
काल आपण कर्वे रस्त्यावर लावलेल्या गाडीविषयी बोलत होतो. आज ती गाडी हलविण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी नळस्टॉप चौकात पाडळे पॅलेसच्या बाजूला असलेल्या खड्ड्याबाबत चर्चा केली होती. तो खड्डाही बुजविण्यात आला आहे.
आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पौड रस्त्यावर चाललेले कॉंक्रीटीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. आज जवळपास निम्म्या रस्त्यावर कॉंक्रीट घालण्याचे काम झाले आहे.
आपल्या चर्चांचा आणि त्याविषयी सकाळ प्रतिबिंब पुरवणीमध्ये येणाऱ्या बातम्यांचा उपयोग होतो आहे, हे नक्की!

5 comments:

  1. Unknown said...
     

    Thats grt

  2. Unknown said...
     

    Though the battle has recently begun "Well begun is already half done!"
    All credit to Sakal to air such topics & the opportunity given to its avid,interested & concerned readers not just to know,but also to comment & suggest solutions!
    Information technology being put to very good use!

  3. Anonymous said...
     

    well said captsubh, I also knew that such blog would have some impact esp via sakal since its probably most popular esp in Pune...look into even the success of veerdhaval's case which makes me even more happier....we should hope that we get a medal in olympics this time..so this internet war in some form(against inefficiencies and all) is definitely taking some shape...
    Koustubh

  4. Anonymous said...
     

    Great Work.....! Keep the track.

  5. HAREKRISHNAJI said...
     

    अभिनंदन. पण या सुरवातीच्या यशाने हुरळुन जाउ नये. या सर्व लहानसहान बाबी आहेत. युध्यापुर्वीच्या चकमकी सारख्या. कॉमेंट्‌स व हिटस किती आहेत हे मोजण्यापेक्षा, महत्वाचे आहे ते, आपले पुणे एक आदर्शवत शहर करण्या साठी समविवारी सर्वांनी एकत्र येणे. खर म्हणजे २१ व्या शतकात देखिल आपण अजुनही या मुलभुत समस्याच सोडवत बसलो आहोत. हे तस बघायला गेले तर लाजीरवाणी गोष्ट आहे.

    सकाळ नी काळाची पावले ओळखत internet,बॉग, या माध्यमातुन एक चागला उपक्रम सुरु केला आहे, याचा लाभ घेत आता नागरीकांनी आपापल्या विभागात A.L.M किंवा रहिवासी संघ स्थापन करुन , एकत्र येत, Pune Pratibimb मार्फत आपल्या समस्या सोडवाव्यात.
    हा बॉग फक्त नागरी समस्या, पुणे शहरात सर्व सामन्य नागरीकांना येणाऱ्या अडचणी, त्रास या साठीच असावा. त्याच बरोबर लोकसहभागातुन ज्यांनी ज्यांनी आपल्या विभागातील समस्येचे कायम स्वरुपी निवारण केले ,त्यांच्या अनुभवावरील लेख या बॉग वर असावे, जेणे करुन ईतरांना ते मार्गदर्शक ठरतील,

    पैसा शीवाय एक दिवस सारख्या वैयक्क्तीक लेख पुण्याचे प्रतीबिंब दाखवत नाहीत, ते सकाळ बॉग वर असावेत.

Post a Comment