व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

नो पार्किंग? पाच हजार रुपये दंड भरा...



पुण्यातील वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी रस्त्यावर नको त्या ठिकाणी उभी राहणारी वाहने हे अतिक्रमण ठरवून वाहनचालकांना पाच हजार रुपये दंड करण्याची योजना महापालिकेच्या मदतीने आखली जात असल्याचे, पोलिस आयुक्त जयंत उमराणीकर यांनी सांगितले आहे.
चुकीच्या ठिकाणी वाहन लावणाऱ्याला जास्तीतजास्त 100 रुपये दंड करण्याचा अधिकार पोलिसांना आहे.
मात्र, महापालिकेला यापेक्षा जास्त अधिकार आहेत. त्यामुळेच चुकीच्या जागी वाहन लावणे, हे अतिक्रमण ठरवून त्याला महापालिका कायद्यानुसार पाच हजार रुपये दंड करण्याबाबत चर्चा सुरू आहे.
पुण्यातल्या 1477 चौकांसाठी केवळ 450 पोलिस उपलब्ध आहेत. पोलिसांची संख्या वाढविण्याची मागणी आम्ही शासनाकडे केली असली, तरीही स्वयंशिस्त असल्याशिवाय वाहतुकीची स्थिती सुधारणार नाही, असेही उमराणीकर यांनी सांगितले आहे.
काय वाटतं तुम्हाला? वाहतूक सुधारण्यासाठी दंडाची रक्कम वाढवणे, लायसन्स जप्त करणे अशासारखे कडक उपाय उपयोगी ठरतील, की आयुक्त सांगतात त्याप्रमाणे स्वयंशिस्त आवश्‍यक आहे?
स्वयंशिस्त आवश्‍यक असेल, तर त्यासाठी आपण काय करायला हवे?

19 comments:

  1. राफा said...
     

    नमस्कार,
    हा माझा अतिशय आवडता मुद्दा आहे. let the market forces take care of it ! :)
    १. सध्या निम्मे लोक (कदाचित जास्तच) नियम तोडण्याकडे कल असणारे आहेत. (विविध कारणांमुळे.. ह्यात बाकिच्यांचे बघून मेंढ्यांसारखे त्याच चुकीच्या मार्गाने जाणारेही आहेत.)
    २. पाच हजार रुपये दंड ही रक्कम जास्त वाटत असली तरी 'शक्याशक्यते'नुसार कधीतरी शंभर रुपये(च) भरायला लागणे (त्यातही बरेचदा अजून कमी पैशाची 'दक्षिणा' देऊन सुटण्याची शक्यता) ह्यामुळे नियम तोडणार्याना सध्या जबर जरब बसणे जरुरीचे आहे.
    २. त्यामुळे दंड आणि तोही जबर दंड, त्याची काटेकोर अंमलबजावणी आवश्यक आहे. (अगदी दक्षिणेची शक्यता धरली तरी चार आकडी रक्कम. एव्हढे गणवेषधारी 'पुरोहित' सूज्ञ असावेत की पाच हजारा ऐवजी १०० रुपये घेऊन सोडणार नाहीत ! हाच तो market 'force' ! हजार रुपयाचा दणका बसला की शाळेतले नागरिकशास्त्र आठवू लागेल !)
    ३. एकदा नियम पाळण्याची वृत्ती अंगात भिनली की मग काही करावे लागत नाही. मग पोलिस असला नसला तरी नियम पाळलेच जातात. त्याचे फायदेही तोपर्यंत लक्षात आलेले असतात. (हे अमेरिकेत मी पाहिलेले आहे. मग आपण ३००० सालापर्यत वाट पहायची का ?)
    ४. स्वयंशिस्त तर हवीच. पण ती पाळणारे मोजके लोक, बाकीच्या नियम न पाळणाऱ्या उद्दाम आणि मुजोर लोकांमुळे उदास होतात.. कधी चांगला मार्ग सोडूही शकतात.. एकगठ्ठा एव्हढ्या लोकानी एका दिवसात स्वयंशिस्तीचा मार्ग अवलंबणे अशक्य आहे. दंड हा न्याय्य आणि झटपट मार्ग आहे.
    ५.हायवे वरून उदा. पुणे सातारा.. रॊंग साईडने येणाऱ्या बस, ट्रॅक्टर, चारचाकी वगैरेच्या वाहनचालकाना फाशी आणि तिथल्या पोलिसाना कडक शिक्षा देण्याची सूचना आली तर मी आगाऊ पाठींबा कळवत आहे :)
    ६. नवे पोलिस आयुक्त श्री. उमराणीकर ह्याना माझ्या अनेक शुभेच्छा आणि धन्यवाद :).

  2. Anonymous said...
     

    Rs5000/- is quite high and unjustifiable as fine for wrong parking. Also Will it be same for 4-wheelers and 2-wheelers? Temporary parking space is a necessity for everybody.

    And what about the autorikshas and hawkers who flout the parking rules and are tolerated by police.
    What about the shopkeepers and their staff who occupy the parking spaces on roadside for whole day.
    Or only the private citizens will suffer.

    What about the No-Parking signs placed illogically, probably to suit somebody with enough pull.

    And of course how the PMC will utilise the collected money or it will simply go down the drain as usual.

  3. Unknown said...
     

    बरेचसे लोक हल्ली वाहतूकीत अत्यंत बेशिस्तपणे वर्तन करत व बेजबाबदारीने सर्व नियम धाब्यावर बसवून सर्रास गाड्या चालवत असल्यामूळेच आजची लाजिरवाणी परिस्थिती उद्भवलेली आहे.यांत सर्व स्तरांवरचे लोक कळत नकळत भाग घेत असतात.
    १)कित्येकदा नियम पाळून लाल सिग्नलला थांबल्यावर मागच्या वाहनांचे कर्णकर्कश्य होर्न व शिवीगाळ किंवा कधीकधी धक्केपण सहन करावे लागतात.
    २)चूकीच्या दिशेने येणारी वाहने टाळण्यासाठी कसरत करावी लागते व रस्ता पायी ओलांडणा-या पादचा-यांना आपल्या डोक्याच्या मागेपण डोळे असते तर बरे व सोपे झाले असते अस वाटू लागते.
    ३)नुसते फ़टके देउनसुध्धा किंवा दंड करूनपण या नियमभंग करणा-या महाभागांना अक्कल येइल असे मला वाटत नाही.यांचे licences जप्त करून त्यांच्या रेको्र्डमध्ये नोंद केली तर थोडाफ़ार फ़रक होउ शकेल.रस्त्यांच्या कडेला उभे असलेल्या पोलिसांशी हुज्जत घालत किंवा दयायाचना करून चिरीमिरी देणा-या व ती हळूच घेणा-या पोलिसांना पण जबर शिक्षा झाली पाहिजे.पोलिस पैसे घेतांनाचे हे द्रुश्य आज ता.१५ मे रोजी संध्याकाळी ७ वाजता मी गरवारे कोलेजजवळच्या सिग्नलला स्वतःच्या डोळ्यानी पाहिले!walkie talkie धारक Inspector हे बघत जवळच्या दुकानांत आरामात बसलेला होता!!खरेच धन्य आहे आपला देश!
    ४) बंगळूरचे पोलिस कसे उत्तम वाहतूक नियंत्रण करतात ते पहावे.त्या सर्वांकडे walkie talkie असतो व कोणी नियम मोडून पळालाच तर पुढच्या चौकांत त्याला धरले जाते.
    ५)अमेरिका व इतर पा्श्चात्य देशांत सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते.मध्यरात्री सिग्नलला दूसरी कुठलीहि गाडी नसली तरी तो तोडला जात नाही हे कित्येकांनी पाहिले असेलच.
    ६) येथे तावून सुलाखून निघतो!'Every cloud has a silver lining!पुणे शहरात गाडी चालवण्याचा "अनुभव" असल्यास खरच जगाच्या कुठल्याहि कोप-यांत वाहन चालवायला अतिशय सोपे जाते.
    ७)लेन शिस्त हा प्रकार 'आपल्या' प्रिय पुण्यांत नाही कारण पुण्यनगरी 'आपलीच' आहे!बिनधास्त बेफ़िकिर वाहने चालविण्याचे सुख फ़क्त इथेच आहे.
    ८)No entry रस्त्यांवरून उलट्या दिशेने वाहन चालविणा-यांच्या चेह-यावर एक आसूरी आनंद दिसतो!त्यांना अडवायचे धाडस केले तर आपलाच जीव धोक्यात पडतो आणि अर्वाच्च शिवीगाळ पण कधीकधी ऐकण्याचे "भाग्य" लाभू शकते!
    ९)कोणीहि कुठल्याहि लेनमध्ये वाहने हाकावीत,हिरवा दिवा लागल्यावर बरेचदा सर्वात डावीकडच्या लेनमधले वाहन सर्व पुढे जाणा-या वाहनांना ओलांडून उजवीकडे वळून जाते हे आपण नेहमीच पाहतो!गणवेश घातलेल्या 'मामा'ला हे दृश्य रोजच दिसत असल्यामूळे तो शिट्टी वाजवून जाब विचारत नाही व वाजवलीच कधी तर त्याच्या आधी तो लेन breaker पसार झालेला असतो!यामूळे येथे कायम alert रहावे लागते!त्यामूळे आपण येथे तावून सुलाखून निघतो!
    १०)जास्त म्हाता-या मंडळीची मात्र येथे फ़ारच पंचाईत व कुचंबणा होते कारण ते पायी रस्ते ओलांडत असले तर बहुतांशी वाहने वेग कमी करून त्यांना सुखरूप जाउ देण्याऐवजी त्यांच्यावर जास्तच जोराने "आक्रमण" करतात!३ वर्षापूर्वी एक म्हातारीला उडवून मृत्यूमुखी पोचविणा-या वाहनचालकाने पळून जाताना शिवी तर दिलीच, पण शिवाय उद्गार काढले की "एक म्हातारी कमी झाली तर काय फ़रक पडतो?"
    त्यामूळे आजकाळ बरेचसे वृद्ध लोक एके काळच्या "पेन्शनरां"च्या पुण्यांत रस्त्यांवर यायचे "धाडस" करत नाहीत व लोपलेल्या जून्या काळाच्या रम्य आठवणीत रमून आपापल्या खिडक्यांमधून बाहेरच्या धावत्या व गतीमान युगाच्या "गतीशील" व स्वैर चाललेल्या वाहनांचे अचंब्याने अवलोकन करतात!
    ११) श्री.जयंत उम्राणीकरांची मोठा दंड करण्याची सुचना आवडली फ़क्त त्यात पोलिसांनी चिरीमिरी घेणे थांबविले पाहिजे जे मी आज ७ वाजता पाहिले!

  4. Anonymous said...
     

    Sorry I don't have a marathi font.

    No parking madhe gadya park karnaryana dand karnya adhi ek goshta jasta mahatvachi ahe ti mhanje traffic la shista lavane. Jar signal todanaryana hajarat dand, gaadi japta karne ashasarkhe kadak niyam lagu kele tar koni signal todaychi himmat karnar nahi. Punyacha main problem mhanje beshista traffic hach ahe. Pan tyahipeksha mahatvacha mhanje rastyanchi avastha.

    Apan PMC la taxes kashasathi bharto??? Apan taxes bharunhi aplyala tyache returns kahich milat nahit in the form of infrastructure. Africa madhalya chotya deshatahi rastyanchi avastha punyapeksha changli ahe(Jar koni documentaries, discovery etc varche prog baghat asel tar tyala he kalel).

    Rastyanbarobarch lokana swatala traffic sense asane hesuddha mahatwache ahe. Apan nustech mhanto ki US, Europe madhe kiti wyavasthit asta sagla traffic, konihi niyam modat nahi etc, pan tithalya schools madhe traffic education asta. Kuthalehi niyam he modanyasathi nasun palnyasathi ahet he mulana lahanpanapasun kalalele aste. Lokana law chi jar kahi bhitich watat nasel tar laws modle janarch. Jar vahatukiche niyam todanaryala jabardasta danda, vahanjapti ase kahi amalat anale tar lok niyam todayala janar nahit. US madhe eka highway war litering sathi $25000 fine cha board me pahila ahe. Jar laws itke kadak asatil tar lok te nailajastav ka hoina follow kartil. Of course je niyam kele ahet ti strictly implement karayla havet govt ni.

    Signal follow karne hi kiti sadhi goshta ahe. Aplya pudhe vahane disat ahet pratyekala jayala thoda wel lagnarch he kalat asunhi jorjorat horn vajavane hyala kahich artha nahiye. Hya sarva goshtinbarobarch lane chi shista hi atyanta avashyak ahe.

    Govt contractors che kaam atishay sumar darjache aste. Tyana kahitari accountability asayalach havi. Jase ki tharavik mudatit kaam nitpane purna karne (hi mudat kam vyavasthitpane karta yeil evadhi havi) ani tyatun jar lagechach raste kharab zale kinwa kahi damage zale tar ti tyanchi jabadari asel ani tyana swakharchane te kam karave lagel. Ashasarkhe kahi kele tar te lokahi vyavasthit kam karayla bhaag padtil. Hyachbarobar regular maintenance hasuddha garjecha ahe. Wegvegalya kamansathi sadiva raste khodun thevale tar kasa honar? Ekda raste khanlyawar sarva kame ekdum nahi ka karta yenar? Raste kami ani khadde jasta ashich punyachya rastyanchi avastha ahe geli kityek varsha. Hyabaddal mahapalikene sarvat pratham paule uchalayala havit.

    Mahapalikeni no parking sathi Rs. 5000 danda karnyaaaivaji itar jasta mahatvachya goshtinkade laksha puravale tar te jasta changle.

  5. Heramb said...
     

    No-parking sathi dand mhanun Rs. 5000/- hi rakkam jast aahe. Sadhya Punya madhe parking la pureshi jaga upalabdha nahi. Tyamule mahanagarpalikene sarva mukhya rastyanvar under-ground parking suvidheche "project" hati ghyave (aani te poorn pan karave ! )

    Baaki punyatalya vahatuki baddal (kahre tar be-shista vahatuki baddal) kay bolave? Zebra Crossing he padacharyana tyavarun rasta olandanya sathi asate he Samudayik Jeevana madhe shikavalele visarun vahanchalak tyachyavar (barech vela tyachya pudhech) gadya thambavatat. Mala swatahala kityek vela me niyam palalyamule itar beshista lokankadun manasik tras patkarava lagala aaahe. Itakyalech udaharan dyache tar - Modern Highschool chowka madhe Lal Signal hota mhanun mi niyama pramane thambun rahilo. Pan eka rikashwa valyala te maanya nasave, tyane mothyne Horn vajavayala suruvat keli. Tari hi me Hirava Signal pade paryant jagevarun halalo nahi. He tayla khup apmanaspad vatale asave. Mala overtake karun jatana to mage valun barech kahi (xxx) putputat nighun gela.

    He aani ase anek anubhav mala ya aadhi aale aahet, pan me dagamagnar nahi. Nusate swataha pasun sudharanene suruvaat kara asa danka pitanyapeksha me swayamashisti la suruvat keli aahe. Mazya family madhe pan me sarvana yache palan karanyche velo-veli sangat asato (aani te sudha niyam palatat hi samadhanachi bab!)

    Chala tar mag tumhi pan divasatun ekada tari swayamshistiche, vahatuk niyamanche palan karanyacha prayog karun paaha aani paha tumhala swatavishayi kiti aadar vatel te!

  6. Anonymous said...
     

    5000 hadand jast aahe.

    parkingche pandhare patte spashta disale pahijet mhanje lokana parking karne soppe hoil

    signal todnaryana jagevar phatake maravet (chabakache)

    A G Kulkarni

  7. Anonymous said...
     

    Prevention is better cure. This must be learnt by Mr. Police Commisioner of Pune. He should direct his all traffice police force to prevent all the traffic related problems , rather than asking for more fine. The constable should be present in the middle of the crossing not hiding behind the wall. There is a best example of "ideal" traffice police force in Bangalore city. Mr. commissioner please study this model and implement the same in Pune.
    Also he should make all the "parking lots" free from the menance of the encorachment. In front of Dagdausheth Ganapati tample , encroachment people occupy the sapce of at least 20 bikes.
    All the footpaths in Pune are blocke by the encroachment people, the basic purpose of footpath is for the pedestrians. Mr. Commissioner will you please make any effort to make the foot-paths available for pedestrians? Will you evacuate all the encroachments in foot-paths.

  8. Anonymous said...
     

    Mi fakta tatpurati parking chi garaj asanaryanchya vatine lihit ahe. eg. kharedi sathi agar kahi kama sathi baher padlelya va thodya vela sathi parking chi garaj aslelye nagrik.

    Ya loka sathi parking apure padnyache karan PMC ch ahe. ani ata yanchya kadun yevdhala dand ghenar mag nagrikani karayche kay? PMT chi seva mhanje anandch ahe va scooter kahi khishat va pishvit thevata yet nahi.

    chor to chor ani var shirjor asech mhanave lagel.

  9. Anonymous said...
     

    sorry no marathi font.
    ho,jabar dand tar havach pan to vasul houn police mamachya khishat na jata sarkari tijorit pohochel he hone jaruri.
    parking space vareel atikramanala aapan sarvach jababdar nahi ka?asha bhaji kinva phala viknarya kirkol vikretyankadun jara swasta ani javal milata mhanun aapan vikat gheun tyanna pathimba deto.
    footpath he padchari chalnyasathi asatat.tyavar lavleli khoki - xerox,laundry,snacksstalls,
    bread-andi viknare,koprya-kopryavarche bhel panipurivale -he sarva udyog dhande aapanch chalu deto aaplya soeesathi.mag prateyk babteet police ani jayant umranikarsahebanich sudharna karavi hi apeksha balagne chukch aahe.
    sadharan 2 varshanpurve tevachya police commissioner che sakal madhe aavahan aale hote traffic wardans sathi.teva mee fone karun mazi ase kam karnyachi tayari dakhavli hoti pan tyala "aamhi 50 varshanvareel lokana ase kam det nahi "ase uttar milale.hi fuktchi faujdari karayla 50chya aatli,nokri dhanda karnari,mulanchya shala-collegechya vela sambhalnari kon ani kiti jana tayar hou shakteel asa vatata?
    i think senior citizens would be the right choice to carry out these duties if given proper authority.

  10. Anonymous said...
     

    umaranikarana traffic sudharawayala fakt dand hach marg disato watate. tar pahilyanda policelach dand karawa je paise khawun swargate , pune station, shiwajinagar ya thikani aslelya khajagi busesna mokat firu detat.
    nantar riksha , feriwalya war laksh thewa.
    WISHESH MHANAJE DAND KARANYA AIWAJI LISENCE JAPT KARA WA EK 5 TASACHE TRAFFIC WARACHE LECTURE ATTEND KARAYALA LAWA NANTAR LICENCE PARAT DYA. WA TYAWAR ENTRY KARA. KARAN LOKANA PAISHYAPEKSHA WEL MAHATWACHA AHE.KARAN YAT BHRASHTACHARALA CHANCE KAMI AHE.
    HARISH

  11. Anonymous said...
     

    umaranikarana traffic sudharawayala fakt dand hach marg disato watate. tar pahilyanda policelach dand karawa je paise khawun swargate , pune station, shiwajinagar ya thikani aslelya khajagi busesna mokat firu detat.
    nantar riksha , feriwalya war laksh thewa.
    WISHESH MHANAJE DAND KARANYA AIWAJI LISENCE JAPT KARA WA EK 5 TASACHE TRAFFIC WARACHE LECTURE ATTEND KARAYALA LAWA NANTAR LICENCE PARAT DYA. WA TYAWAR ENTRY KARA. KARAN LOKANA PAISHYAPEKSHA WEL MAHATWACHA AHE.KARAN YAT BHRASHTACHARALA CHANCE KAMI AHE.
    HARISH

  12. Anonymous said...
     

    I dont think fine wadhavun kunacha faayada aahe. Zallach tar parat paise khanaryacha aahe. Paalikeche income wadhale tar tyaat parat citizens na kaay? Madhale khanare asanarach.

    Kaahi social service type shiksha kelya paahijet. Jar kaahi fault kela tar ashya shikshya haavyaat:

    1. Ekhada rasta zaadun kaadh.
    2. 2-3 taas police barobar traffic manage karayala thhamb.
    3. Shaala sutanyachya vagaire weli mulana rasta cross karnyasathi madat kar.
    4. Blind -school la jaun tithalya mulana 2 taas kaahi entertainment-educational program kar.
    5. Gultekadi, mandaii ithe safaii kar.
    6. Pratek thikani garbage cans thevun te 2 diwas or week ni clean kara.
    7. Mahapalikeche garbage collect karyala yetaat. Te baadshaha sarkhe gaadit basun rahaat and aaplyala tyana haatat ker neun dyava lagato. Tumachya kadewra mul asel kaahi tari they dont give a damn. So ashya weli tyana Helper mhanun aathavadhabhar kaam kar.


    I can go on with this list.
    Ofcourse then we need infrastructure to make sure these things are being followed/obeyed.

    So shewati pratek thikani pramanikpaana, chuckichi jaaniv, chuk keli tar shiskha honyachi bhiti hya basic gosthi lagaataatach.

    Pan shiskha jar hya type chya asatil tar phaayad saglyanach hoil.
    Kunaache khise na bharale jaata.

  13. Anonymous said...
     

    Firstly 5000 is too much, I would guess around 500-1000 should be max figure...Most of what exist today of towing the wrongly parked vehicles is also pretty good practise...
    1. I would say one of major reason for such issues in parking is just simply AVAILABILITY OF PARKING SPACE...this is one of contributor which tempts common people to sort of park incorrectly...
    2. Proper SIGN BOARDS, THE ONES which are "VISIBLE" and not hidden behind some bushes are other issues.

    And about bad driving habbits..well i totally agree with most comments made...To list them systematically:
    1. Number of traffic police could be easily dealt with again PROPER SIGN BOARDS and SIGNALS whereever required..This would avoid people TAKEN BY SURPRISE FOR requirement of actual direction to go to and hence to make (1) wrong turn into one way, (2) sudden turns and others
    2. One of main reason for traffic caos is sheer numbers of TWO WHEELERS against most of Four wheelers driven in some developed (in reference to good roads)countries. HOW? Well its easy to draw LANES on roads for 4wheelers against caotic mesh which would have to drawn for two wheelers...
    3. Turning indicators should be COMPULSORY in all vehicles
    4. Lanes following also should be made "compulsory" with NOT MORE THAN 2 TWO WHEELERS in one lane and not more than 1 FOUR wheeler.
    And for that cameras should be placed at every corners of city and police should be dedicated looking at them...
    5. Proper footpaths or overbridges for people to WALK along ROADSIDE..REQUIRED esp like somebody mentioned, during "school hours"
    6. No potholes which kinda tempts driver to follow CURVES AROUND them leading to further caos
    So in all my point is ofcourse we need rules, yet even in their presence there are many other temptations for people to not follow proper rules, which need to be taken into account....MOST importantly this is all fairly EASILY ACHIEVABLE...REQUIREMENTS OF flyovers and all..entirely different topic...

    Koustubh

  14. Unknown said...
     

    मोठा दंड वाहतुकीचे नियम मोडणा-यांना करावा.पार्किंगमध्ये चूक का होते त्याचे कारण पार्किंगला अतिशय कमी जागा उपलब्ध आहे,त्या व्यवस्थीत mark केलेल्या नसतात व वाहनांची संख्या कित्येक पट वाढली आहे.महानगरपालिकेकडे याबाबतीत कधीच दूरद्रुष्टीचे स्पष्ट धोरण व कृती आराखडा नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे.
    नवीन वसाहती बसविताना पार्किंगसाठी अनेक ठिकाणी भरपूर जागा कधीच सोडत नाहीत व रस्ते रूंद असले वा केले तर त्यावर विक्रेत्यांचे आक्रमण लगेचच होते व "येरे माझ्या मागल्या" अशी परिस्थिती होते.
    USA व इतर प्रगत देशांमध्ये पार्किंगसाठी PYC किंवा DG ground पेक्षा प्रचंड मोठ्या जागा सोडलेल्या असतात त्यामुळे तेथील बहुंतांशी वाहने चारचाकी असूनहि सहज जागा मिळते.इथे मात्र इंचाइंचासाठी वाहनांना झगडावे लागते.
    चूकीच्या पार्किंगचा मोठा दंड मात्र लक्ष्मी रस्त्यासारख्या रस्त्यांवर बंदी असून खुशाल चारचाकी वाहने ड्रायव्हरच्या ताब्यात सोडून खरेदी करणा-या लोकांना करावा व यात लाल दिव्याच्या सरकारी वा लष्करी गाड्यांनासुद्धा अपवाद करू नये.Misuse of authority ला पण हद्द आहे व अशा गाड्यांच्या भाडोत्री वा सरकारी ड्रायव्हरना हटकल्यास ते निर्लज्जपणे लक्ष देत नाहीत किंवा काय करायचे ते करा पण आम्ही हलणार नाही असे स्पष्ट सांगतात.सामान्य माणसांच्या तळपायातली आग मस्तकात जाउनही तेथे पोलिस नसल्यामुळे तो हतबुद्धपणे काहीच करू शकत नाही.पोलिस आयुक्त याची नोंद घेउन कारवाई करतील कां?
    सु्भाष भाटे

  15. राफा said...
     

    एक स्पष्ट करायचे राहिले. नो पार्किंग मधे गाडी लावणे ह्या आधी ( अर्थातच ) अनेक मुद्दे महत्वाचे आहेत वाहतूक विषयक नियम पाळण्यासंबंधी. पण ह्यात priority ठरवून झाल्यावर प्रत्येक 'गुन्ह्या'साठी जबर दंड (आणि इतर शिक्षा)असायलाच हव्यात !
    priority ठरवायला हवी कारण :
    १. नियम तोडण्यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीची गंभीरता (दुसऱयाचा जीव धोक्यात येणे, वाहनांचे नुकसान होणे, वाहतूकीची कोंडी होणे इत्यादी) वेगवेगळी आहे.
    २. सर्वात महत्वाच्या एकदोन गोष्टींवर आधी लक्ष केंद्रीत करुन जोरदार कारवाई (एक दोन दिवस नाही) केल्याने ते गैरप्रकार (उदा. बिनदिक्कत सिग्नल तोडणे) समूळ नष्ट केले जातील (१००% बंद नाही झाले तरी उदाहरणार्थ सध्याच्या ५०% वरून अर्ध्या टक्यावर येतील हे प्रकार)

    अवाजवी वाटणारा दंड (नो पार्किंग बाबत नाही तर आधी बाकीच्या असह्य आणि अक्षम्य मुख्य गोष्टींबद्दल जसे की सिग्नल तोडणे, अकारण हाय बीम मारणे वगैरे) हा कसा परिणामकारक होईल ह्याचे logic पहिल्या पोस्टमधे दिले आहे वर.

  16. Unknown said...
     

    Rastyaavar vahanaanchi sankhya jo paryant kami hot naahi, to paryant kuthalahi upay karane avaghadach jaeel. Vahan sankhya kami karayala "Even date-even number/Odd date-odd number" ase karave. Mhanaje, even date la phakta jya gadyaanchya number platecha shevatcha digit even ahe tyannach rastyavar yenyaas paravangi ani tasech odd tarakhela. He jar policanni paise vagaire na khata neet rabavla tar rastyaavarchya gadyaanchi sankya nidaan 20% tari kami hoeel.

    Experimental basis war 2/3 mahine karoon baghayala kaya harkat ahe? niyam modnaara sahaj sapdel, tyaala jabar shiksha karavi. Ekda rastyaavarchi vahane kami zali ki bakiche kadak upay karoon shista lavane sope jaeel.

  17. Anonymous said...
     

    police 100 rupayanpeksha jaasta dand karu shakat nahit. mhanoon mahanagarplikechya sahyyane 5000 rupaye dand karava ase sri. umaranikar sahebani suchavile aahe.
    mulat parking cha prashna vadhala kasa? vahanachi sankhya vadhali he kharech. pan navin imarat bandhatana plan madhe asleli parking chi jaga, bandhkam pass zalya nantar vyapari jaga mhanoon vikali jate. ani rastyavar vahan lavale jate. hya gunhyala mahaplika hi titakich jababdar aahe. mag mahaplikela kiti dand aakarnar?

    kuwait madhe loaksankhyepeksha char chaki vahananchi snkhya jaast aahe. tithe ministry for parking mhanoon ek sarakari khate aahe. imaraticha plan ministry for parking kadun hi pass karun ghyava lagato. ani building bandhun zali ki tyache passing suddha ministry for parking kadun kele jate. jase audit karatat tyapramane adhun madhun building chi tapasani hote. mhanaje parking chi jaga parking sathich vaparali jate ki nahi he baghitale jate.

    sarvat mahatwachi goshta mhanaje kayadyachi kadak ammalbajvani. mhanoon he sarva shkya hote.

    aapalya kade he ka shakya hoat nahi?

  18. vikram from pune. said...
     

    New York and Hong kong, cities are same as Pune, small streets, congested, parking problem. They are faster than Pune. Mr Umranikar fully agree with you on Rs. 5,000 fine. Provided, you give us the best A.C. Buses, metro, trams, when you have all this, only few will bring vehicles to road. Also we need paid-multi level parking places.

  19. Unknown said...
     

    There is a very good news for traffic law abiders that the new computerised ticketing system of Pune traffic police sends notices to all traffic violators asking to pay fines as well as keeps record of all traffic violations.
    As per news item in Sakal dated 20th May,about 250 t0 350 such notices are being posted daily & the system has already noted names of repeated traffic offenders,which will soon be shown on the cable TV.
    This initiative has been started by the new Pune police commissioner Shri.Umranikar & is bound to bring some order & discipline to the present chaos over a period of time.
    Congratulations & best wishes to Shri.Umranikar for using IT techonolgy!

Post a Comment