
झळा ज्या लागल्या जीवा...

पारा वर चढतोय, अंगाची काहिली होती आहे... काल थोडा पाऊस पडून गेला असला तरी तापमान खाली यायचं नाव घेत नाहीये... मार्केटिंगवाल्यांना दुपारी बाहेर पडावंच लागतं. मग त्यांनी काय करावं? प्रत्येकाच्या काही ना काही युक्त्या असतात, जागा असतात. कोणी प्रभात रस्त्यावरील झाडांच्या सावलीतून जातं, तर कोणी पाताळेश्वर लेण्यांचा आश्रय घेतं, काहीजण चक्क एसी असलेल्या सायबर कॅफेचा तर काहीजण छानशा हॉटेलचा आश्रय घेतात.
तुम्ही काय करता? तुमच्याही काही युक्त्या असतील ना? चला तर मग "शेअर' करूया... त्यानं इतरांचाही उन्हाळा थोडासा सुसह्य होईल.
पुण्याबाहेरच्या पुणेकरांसाठी....
तुम्ही पुण्यात असताना काय करत होता, हे कळवाल आम्हा सर्वांना? आम्हाला तुमच्या आठवणी वाचायला नक्की आवडतील...
ता.क. : हा विषय प्रेमी जीवांना लागू नाही... त्यांना उन्हाळा काय आणि हिवाळा काय...