
सिंहगडावर सफाई : महापालिकेबरोबरच विविध संस्थांचा सहभाग

गोळा झाला 8 टन कचरा
महापालिका व विविध संस्थांनी रविवारी सिंहगडावर महास्वच्छता अभियान राबविले. आतकरवाडीपासून सुरू झालेल्या या मोहिमेत सुमारे 8 टन कचरा गोळा करण्यात आला.
सकाळी साडेसहाच्या सुमारास आतकरवाडी येथे स्वच्छता मोहिमेला सुरवात झाली. पायवाटेवरील सर्व कचरा, तसेच गडावरील पुणे दरवाजा परिसर, घोड्याची पागा, दारूखाना, होळी चौक, कल्याण दरवाजा, राजसदर, नरवीर तानाजी मालुसरे यांचे समाधिस्थळ, छत्रपती राजाराम महाराज मंदिर, अमृतेश्वर मंदिर, कोंढाणेश्वर मंदिर, देवटाके, हत्ती तळे, तानाजी कडा, वाहनतळ, विंड पॉईंट, खांदकडा, टिळक बंगला, पर्यटन बंगला, जिल्हा परिषद विश्रामगृह, दूरदर्शन, दूरसंचार, प्रक्षेपण केंद्र, आकाशवाणी, पोलिस दूरसंचार परिसरातील स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर ध्येयमंत्र, प्रेरणामंत्र म्हणून स्वच्छता मोहिमेची सांगता करण्यात आली.
विविध संघटना आणि महापालिकेने एकत्र येऊन सिंहगड परिसराची स्वच्छता केली असली, तरी देशात अशा अनेक ऐतिहासिक वास्तू दुर्लक्षित आहे. किंबहुना नागरिकांनी या वास्तूंचा चेहरा कुरुप करण्याचा प्रयत्नच अधिक केला आहे. ऐतिहासिक वास्तूंना इजा पोचविणाऱ्यांना शिक्षा आणि त्याचे पावित्र्य, सौंदर्य जपणाऱ्यांना बक्षिस दिले गेल्यास अधिकाअधिक नागरिक पुढे येतील. आणि त्यातून ऐतिहासिक ठेव्याचे जतन होईल.