व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

"आता आम्हाला वाचवायला राज ठाकरे येणार का?'

राज ठाकरेंनी छेडलेल्या आंदोलनाची झळ आता इतर प्रांतात राहणाऱ्या महाराष्ट्रीयन लोकांनाही बसू लागली आहे.

हरियाणातील करनाल येथे राहणाऱ्या विजय सुर्यवंशी यांच्या घरी बुधवारी रात्री काही सशस्त्र गुंड घुसले आणि त्यांना "महाराष्ट्रात परत जा अन्यथा तुम्हाला संपवून टाकू' अशी धमकी दिली. या प्रसंगानंतर विजय सुर्यवंशी आणि त्यांच्या कुटुंबाल प्रचंड धक्का बसला आहे. गेली १५ वर्षे करनाल मध्ये राहत असलेल्या सुर्यवंशी कुटुंबियांना हा प्रकार अतिशय अनपेक्षित असाच होता.

हा राज ठाकरे यांनी परप्रांतीयांविरुद्ध घेतलेल्या भूमिकेचाच परिणाम असल्याने "आता आम्हाला वाचवायला राज ठाकरे येणार आहेत का', असा प्रश्‍न सुर्यवंशी यांच्या पत्नी कल्पना यांनी केला आहे.

केवळ आम्ही महाराष्ट्रीयन असल्यामुळे आमच्यावर असा प्रसंग पहिल्यांदाच आला आहे, असे कल्पना सूर्यवंशी यांनी म्हटले आहे. तसेच आम्ही येथून कुठेही जाणार नाही कारण हा "आमचा देश' आहे. आणि देशात कोठेही राहण्याचा आणि काम करण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. राज ठाकरेंची भूमिका पूर्णपणे चुकीची आहे, असे मतही कल्पना यांनी व्यक्त केले.

करनालमध्ये सुमारे ५०० मराठी कुटुंबं आहेत. या घटनेचा धसका या सर्वांनीच घेतला आहे.

केवळ करनाल किंवा हरियाणाच नाही तर झारखंड, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांतील मराठी लोकांनाही आता आपल्यावरही असाच प्रसंग येणार नाही ना, अशी भीती वाटत आहे.

सूर्यवंशी कुटुंबीयांना मराठी असण्याचा झालेला तोटा इतर प्रांतात राहणाऱ्या आणखी किती कुटुंबीयांना बसणार हे आता तरी सांगता येणार नाही. पण, हे लोण असेच पसरत राहिले तर मराठीजनांना पळता भुई थोडी होईल, यात शंका नाही. एवढंच नाही, तर प्रांतीय वाद उफाळून येऊन सर्वच परप्रांतीय एकमेकांविरुद्ध बंड पुकारतील. अशा अवस्थेत राजकारण्यांची सामंज्यस्याची भूमिका घेणे, केव्हाही चांगले. आपल्याला काय वाटते?

13 comments:

  1. Anonymous said...
     

    mr suryavanshi,u r not totally right.we r with u,but the role of RAJ THAKEREY is totally RIGHT.u r in karnal,means u r doing good for karnal.but UP BIHAR k bhikari by coming here r not doing any good for maharashtra.and also no any maharashtra leader comes in karnal and doing politics there ,like LALOO does in mumbai.this is basic difference.RAJ never says to go for good people,like gujrathi,marwadi,shikhs.TAKE CARE

  2. Unknown said...
     

    india is one and not divided in different parts.like our body has different part if brain is telling i wont work for heart? will body survive? eligible people should get work anywhere.shall US tell why indians are coming here and working here?Raj started very bad things Why he is not telling make maharashtra separate country.He is sowing seeds of hating each other to gain some votes very bad poiltics

  3. Unknown said...
     

    "ATHITI DEO BHAV" HI SAVAY MATATHI MANSANCHYA ANGI BHINLYA MULE TO AATA MUMBAIT ALPSANKHYANK ZALA AAHE. NOKARI,ANNA, PANI HYA JIVANAVSHYAK GHOSHTICHA BHAR DEKHIL MARATHI MANSANVAR PADU LAGALA AAHE.KITI PARPRATIYA LONDHY SAHAN KARAYACHE HYALA DEKHIL MARYADA AAHYE. MAHARASHTRIY MANTRI MANDLAT PARPRANTIY MATRI TAR AAHETCH. PAN TO DIVAS DUR NAHI KI YTHIL MUKHYAMANTRI DEKHIL PARPRANTIY ASEL. ITAR RAJYANSARKHE MARATHI MANSANI DEKHIL MAHARASHTRAT MARATHILA PRADHANYA DELECH PAHIJE.

  4. Anonymous said...
     

    To be frank, these two situations cant be compared.
    Mr. Suryavanshi may be right in venting out his frustration, but neither MNS nor Mr. Raj have asked good people to leave Maharashtra for the sake of leaving.
    If his statement is to be supported now, why not at least 5 MPs resign here ? As it is the LS is going to be over and elections are due...

    - SA

  5. Anonymous said...
     

    विजय सूर्यवंशी यांची तक्रार अगदी रास्त आहे. पण ते बरीच वर्षे महाराष्ट्रापासून दूर आसल्यामुळे उत्तर भारतीयांच्या मुंबई व महाराष्ट्रातील इतर शहरात बेकायदेशिररित्या होत असलेल्या अनिर्बंध लोंढ्यामुळे महाराष्ट्राचे सारे जीवनच किती बदलू लादले आहे याची त्याना कल्पना नसणार. लोकशाहीत संख्याबळ हे सत्तेचे एकमेव साधन असल्यामुळे काही वर्षानी महाराष्ट्रातील बर्‍याच शहरात. नगरपालिका उत्तरभारतीयांच्या ताब्यात जातील. शांतताप्रिय महाराष्ट्रात हळूहळू हिंसा वाढू लागली आहे. व या हिंसाचाराला कारणीभूत असणार्‍यामध्ये बिगरमहाराष्ट्रीय भरणा जास्त आहे. सर्वसाधारणपणे पाहता महाराष्ट्रीय माणुस कायद्याच्या चौकटीत राहून आपला चरितार्थ चालवितो. पण कायद्यांचे उल्लंधन करणे हाच उत्तरभारतीयांचा नैसर्गिक कल आहे. राज्यातील सर्व राजकीय नेत्यानी मतदान पेटीकडे लक्ष ठेवुन या अनिर्बंध लोंढ्याकढे जाणूनबुजून आजपर्यंत दुर्लक्ष केले आहे. व म्हणूनच राज ठाकरे याना अशा थोड्यापार तीव्र शब्दात आपली प्रतिक्रीया व्यक्त करणायाची जरूरी वाटली असेल. य़ानंतर तरी आपल्या राजकीय नेत्याना जाग य़ेइल अशी आशा आहे.
    मोहन दड्डीकर
    पुणे

  6. Unknown said...
     

    श्री.सुर्यवंशींचा अनुभव कुणाहि मराठी माणसाच्या नशिबी येउ नये.पोटापाण्यासाठी महाराष्ट्राबाहेर स्थायिक झालेल्या मराठी माणसांना त्यांच्यावर हल्ल्यांची परिस्थिती कशामुळे निर्माण झाली हे सांगून त्यांना कांहिही दिलासा मिळत नाहीं! गरज आहे त्यांच्याबद्दल सहानुभुती दाखविण्याची व आपल्या सरकारने त्यांना वा-यावर सोडून न देता त्यांच्या संरक्षणासाठी तेथिल सरकारशी संपर्क साधण्याची!पण स्वार्थी नेते यांना यासाठी वेळ किंवा स्वारस्य कुठे आहे? माझा श्री.सुर्यवंशी व त्यांच्यासारख्या अनेक व्यक्तींना पाठिंबा आहे व त्यां मनोबळ कायम ठेवून एकत्रितपणे परिस्थितीचा सामना करतील अशी आशा करतो.
    आम्ही महाराष्ट्राबाहेर कोलकत्याला २१ वर्षे राहिलो जेव्हा तेथे नक्षलवादी,कम्युनिस्ट नेते वगैरे अतिशय जहाल होते,पण महाराष्ट्रात तेव्हाहि कित्येक बंगाली गुण्यागोविंदाने रहात असल्यामुळे व दोन्ही राज्यांच्या सर्व नेत्यानी समंजसपणा दाखविल्यामुळे जिवाला किंवा नोकरीला तसा धोका निर्माण झाला नाही! "The wearer knows where [& how]the shoe pinches.There is every need to show solidarity & sympathy with those marathi manus staying/working outside Maharashtra in stead of arguing about pros & cons of Raj Thakare's agitation.

    महाराष्ट्रात राज ठाकरे यांना आंदोलन सुरू करण्याची पाळी येणे व त्यानंतर पहिले कांही दिवस बघ्याची भुमिका घेवून हे लोण इतर प्रांतात पसरायला महाराष्ट्रातले सरकारच सर्वस्वी जबाबदार आहे! पहिल्यापासून राज्यकर्ते नेते खंबीर वागले असते व बोलले असते तर इतर राज्यातल्या नेत्यांना वचक बसला असता व ही आग वणव्यासारखी पसरली नसती! परंतु राज ठाकरे यांचा "स्वपक्षांच्या" फ़ायद्याकरता "वापर" करण्याचे ठरविल्यावर व दिल्लीवर अवलंबून राहिल्यामुळे सर्वच हाताबाहेर गेले म्ह्णून अशी परिस्थिती उद्भभवली आहे!

    त्याउलट आजची परिस्थिती आहे! प्रत्येक गोष्टीत फ़क्त राजकारण करायचे व मतांसाठी आप्तेष्टांनासुद्धा सुळीवर चढवायचे व येथिल नेत्यांनी परकरात असल्यासारखे वागायचे[आबा पाटिल सोडून!]म्हणून ही आक्रमणे करायला परप्रांतीय धजायला लागले आहेत!

    The ruling Congress & NCP leaders of M'tra also must act aggressively & swiftly through their counterparts in other states to defuse the situation & safeguard the lives,property & jobs of all such Maharashtrians,otherwise history will not forgive them for their cowardice so far.

    And stop awaiting instructions of Sonia for everything, if you wish to lay any claim to being descedants of Chhtrapati Shivaji!
    She hardly has any fellow feelings for Maharashtrians & just prefers to fish in troubled waters to derive undeserved political mileage!
    So far,you have been the biggest cowards & allowed the situation to deteriorate to this pass!!!

    The buck stops with you!!! So ACT & stop giving lameduck speeches in patrakar parishads!
    Subhash Bhate

  7. Anonymous said...
     

    Sakal chee aajachee yach vishayavarachee batamee ani tyatalee kolantee udee wachun dhakka basala.

  8. Anonymous said...
     

    Mr SURYANVANSHI, You have goen there in lure of MONEY/JOB.

    You have goen there before the revolution. WHY DID YOU NOT START THE MARATHI REVOLUTION?

    PLEASE COME BACK, BECAUSE OF PEOPLE LIKE YOU LEAVING HOME TOWN, BIHARI/UP PEOPLE ARE MIGRATING TO MAHARASHTRA.

    TAKE YOUR OWN RISK, OR COME BACK.

  9. Anonymous said...
     

    I really pleased to see all these replies from my fellow marathis.Majha ajun hi vishwas basat nahi ahe ki he sagle marathich ahet ani ase bolat ahet.India is undivided and nobody can divide it now on basis of language.Already it has been screwed by cast and corruption.If raj thakare really want to something for marathi people then he should make reform and not fighting amongst ourselves.When in 70's and 80's northindians came to Mumbai,then we did not say anyting. bhayya doodh lao,bhayya kapde dhoke do,bhayya sabji,bhayya ye,bhayya woh. they were doing things which normal maharashrian was ashamed of or put into different words...marathi ke shan ke khilaf......tevha tumala problem nhavata aani ata tyani jevha lobby keli tevha tumhala problem suru jhala....are use ur head..this is all political stunt..Poloticians are safe in their houses and common man like Mr.suryawashi is getting affected.open ur eyes and see this world.He jeevan kitu sundar ahe ani hya ashya moorkhanchya nadi lagun apan te vaya ghalawato ahe....asa majha pramanik mat ahe...

  10. Anonymous said...
     

    Dear Amrut,

    You are unnecessarily worried about this issue. People like you never understand real problem and keep spreading hatred among Indians.

    The real problem is of administration due to huge influx of people from other states in your own state. The resources are limited and you can not accomodate more people now. By 'resources' I mean things right from land, water, air to jobs for feeding your family and culture of your own. It is inclination of most living species on earth to feed themselves first and then their guests.

    This applies not only to Maharashtra but to all states. Give resources to localites first and then entertain your guests. There should not be any controversy about this.

    This is now happening with Maharashtra; soon it will happen to other states. Solution is not to hate Raj Thakare but to understand and thank him for bringing forward the issue that shows how critical it is to balance growth in other states of India.

    Those who have seen Raj's past and listened to his speeches have no doubt in their mind about his commitment to creating new Maharashtra. Those who say this is for political gain are biggest fools on earth and lack analytical brain.

  11. Anonymous said...
     

    Dear Anonymous,
    Thanks for letting me know that I am fool and lack analytical brain.for ur kind information,I am not spreading any hatred amongst indians.I guess people like u are doing that job quite well.Because of few people like u,everybody has started hating marathis in india now.I do not want to force my opinion on you.If you think raj thakare is right and by doing such things you can progress,then please be with it.I was in Mumbai for a year and then 3 years in Bangalore and now 3 years in NewYork.I was not there not to trouble the local people but I was there for earning,learning etc etc.Living in a harmony is the best way to solve the problem and not to fight.When I was in B'lore,I saw all the boards on local buses were in kannada.local people there have reservation in all jobs.You implement that in maharashtra.Fighting and killing people will not solve problems but aggravate it.If u do not want to do it then why talk.....people like u who has blind faith in politician will never understand the reality and I really do not have time or inclination to do that.u njoy ur raj-hood in maharashtra while people keep abusing marathis all around world.
    thanks for being pain in the neck...

  12. Anonymous said...
     

    Hi again Amrut,

    Please update your knowledge about killing of people; no one has been killed by MNS activists. Rahul raj was rightfully killed by police, Pawan Kumar was killed by train accident and Dharmadev was killed by fellow passengers fighting for window seat.

    Government has put ban on Raj to give his opinion to press and Bihari leaders are making false allegations against him and Maharashtra, terming him deshdrohi. Lalu who himself has started this regionalism issue by not allowing Maharashtrian people for railway exams and only filling Biharis for railway posts is pressurising Indian govt to arrest Raj for practicing regionalism. All media wich are controlled by North Indians naturally support them.

    I and most of maharashrians hate all polititians. Raj is different polititian. FYI large number of people in Maharashtra support Raj. Majority of these people are from educated, upper layer of society.
    If you see opinion of marathi people on the net 99% people support Raj's stand.

  13. Anonymous said...
     

    या विषयावरच्या राज्यकर्त्यांच्या वर्तमानपत्रात येणा-या प्रतिक्रिया वाचून हसावे कां रडावे हेच समजेनासे झाले आहे.
    कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत सर्वात अनुभवी देशाचे कृषीमंत्री म्हणतात की परप्रांतीयांच्या संरक्षणासाठी आम्ही छातीचे कोट करू व कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते त्यासाठी गरज पडेल तर रस्त्यावर उतरतील!
    आता एरवी कोटी कोटी शुभेच्छांचे उत्सुक किंवा फ़क्त कोटीकोटी रुपयांची भाषा बोलणारे हेच नेते परप्रांतीयांच्या मतांसाठी छातीचा कोट करण्याची भाषा विनाकारण करून त्यांच्याच मराठी बांधवांबद्दल त्यांना किती कमी आपुलकी आहेत ते निदर्शित करत आहेत,तरी नंतर निवडणुका जाहिर झाल्या की हेच मराठी माणसांच्या मतांसाठीपण भिक मागतील!

    कांही म्हणा,कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते निर्लज्ज,निष्क्रीय आहेतच व सदा भ्रमात रहात आहेत हे स्पष्ट दिसून येते त्यामुळे त्यांच्याकडून आणखी काय अपेक्षा करता येणार?

    निदान राज ठाकरे तरूण असूनहि त्यांच्यात व शिवसेनेत थोडे "गटस" जरूर आहेत,जे या कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या "थोर" महाभागात काडीमात्र नाहीत!!!

    In recent issue of India Today,Raj Thakare is called a social terrorist by the editor!All these things are going too far just as castigating all Hindus due to a handful few having been interrogted by ATS for some blasts too is being made such a mountain of a molehill.

    Are we living in India under British rule?Is the congress thinking that congress/NCP men are sacrosanct to say/do whatever they feel like?

    It is for the janata to teach them a lesson in next elections!

Post a Comment