व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

पुन्हा एकदा "राज'कीय वादळ?

राहुल राज या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर राज ठाकरे यांनी मुंबई पोलिसांची विशेष परवानगी घेऊन वांद्रयात पत्रकार परिषद घेऊन शासन, पोलिस आणि राजकीय नेत्यांना टीकेचे लक्ष्य केले. सरकार बदलत असतात. आज तुमची वेळ आहे. उद्या माझी येईल, असा धमकीवजा इशारा त्यांनी अप्रत्यक्षरीत्या आर. आर. पाटील आणि विलासराव देशमुख यांना दिला. संवेदनशील परिस्थितीत नेत्यांनी सुरक्षा वाढविली जात असताना, माझी मात्र सुरक्षा का काढून घेण्यात आली, असा खडा सवालही त्यांनी या वेळी विचारला. त्याचबरोबर त्यांनी छट पूजा, लालू प्रसाद यादव यांबाबत बिनधास्त मतं नोंदविली.

भाषणावर बंदी असताना राज ठाकरे यांना पत्रकार परिषदेला परवानगी देण्यात आली. पत्रकार परिषदेत त्यांनी केलेल्या वक्तव्यावर काही कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवल्या. त्यावर राज यांनी, टाळ्या काय वाजवताय, ही पत्रकार परिषद आहे, जाहीर सभा नाही, अशी कानउघाडणी केली.

राज यांनी पत्रकार परिषदेत अनेक संवेदनशील मुद्‌द्‌याला हात घातला. सध्याची परिस्थिती लक्षात घेता राज यांना पत्रकार परिषद घेण्यास परवानगी देणे योग्य आहे का? या परिषदेमुळे वातावरण पुन्हा गढूळ होण्याची शक्‍यता पोलिसांना वाटली नाही का?

7 comments:

  1. Anonymous said...
     

    ENEMY WITHIN IS DANGEROUS. THIS IS SERIOUS. EVERYONE MUST CHECK THIS OUT AND BRING THIS TO PUBLIC EYES.

    CHECK DR ZAKIR NAIK OR www.irf.net IN MUMBAI FOR MAKING A CALL TO ALL MUSLIMS TO BECOME A TERRORIST.

    WATCH THE VIDEOS IN YOUTUBE OR ON HIS SITE.

  2. Anonymous said...
     

    राज्याच्या महालेखाकार विभागात अमराठी अधिकाऱ्यांचे वर्चस्व


    नागपूर- मराठी युवकांना शासकीय सेवांमध्ये डावलण्यात येत असल्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छेडलेले आंदोलन ताजे असतानाच केंद्र आणि राज्य शासनाच्या अखत्यारितील महालेखाकार विभागातही मोठ्या प्रमाणावर अमराठी उमेदवारांची वर्णी लागत असल्याचे दिसून आले आहे.

    माहितीच्या अधिकारांतर्गत एका नागरिकाने मिळविलेली ही माहिती अतिशय धक्‍कादायक आहे.

    महालेखाकार कार्यालयाद्वारे नुकत्याच विभागीय लेखापालपदावर ११० उमेदवारांची निवड केली गेली. स्टाफ सिलेक्‍शन कमिशनच्या मार्फत विभागीय लेखापाल नियुक्‍ती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. निवड केलेल्या अधिकाऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सिंचन विभागात लेखापाल अधिकारी म्हणून नियुक्‍त करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या अखत्यारितील विभागांमध्ये एकही मराठी लेखापाल अधिकारी नियुक्‍त होऊ नये, यावर आश्‍चर्य व्यक्‍त करण्यात येत आहे.

    सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सिंचन विभागात राज्य शासनाचा सर्वाधिक निधी खर्च होत आहे. सिंचन प्रकल्पाच्या तरतुदींवर आता अमराठी अधिकारी नियंत्रण ठेवणार आहेत. महालेखाकार कार्यालयाने माहितीच्या अधिकारात दिलेल्या लेखापाल अधिकाऱ्यांच्या यादीत एकही महाराष्ट्रातील उमेदवार नाही. सर्व ११० पदांवर अमराठी, विशेषत: उत्तरेकडील राज्यांतील अधिकाऱ्यांची निवड झाली आहे. सदर नियुक्‍ती स्टाफ सिलेक्‍शन कमिशनने केली असल्याने त्यावर महालेखाकार कार्यालयाचे नियंत्रण नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

    दरम्यान, स्थानिक वरिष्ठ लेखापाल यांना प्रतिनियुक्‍तीवर विभागीय लेखापाल पदावर पाठविण्यात येत होते. दोन्ही पदांची वेतनश्रेणी (५,५०० ते ९,००० रुपये) सारखीच असल्याने अशा प्रतिनियुक्‍तीवर जाताना फारसा विरोध होत नव्हता. परंतु, महालेखाकार कार्यालयात अधिकाऱ्यांची कमतरता असल्याचे कारण पुढे करीत अशा प्रतिनियुक्‍ती टाळून अमराठी अधिकाऱ्यांना महाराष्ट्रात पाठविण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

  3. Anonymous said...
     

    Hello all Marathis,

    This is all happening beacuse of all "Puchat" marathi leadership like Sharad Pawar, Vilasrao Deshmukh and other congressmen. They are more worried about them and their famillies future. They will talk on "maratha" community only during election to get elected but once they get elected they forget about their own bretherns and support those non marathi businessmen such as Prafull Patel because they will fund all their party expenses. however they will never think of developing hundreds of Marathi business of equal capability like Prafull Patel. This is because these guys (Pwars and Deshmukh's) wanted them only to be on that rank and they never want other marathis to come equally with the same rank. We marathis should change ourselves and extend our suppport to the new upcomimg marathi businessman and enterpreneurs. As well as suggested by Mr Rane government should take initiative for guding the people for all central government recruitments. This is really time to wake up and come forward to save marathi manoos and marathi culture. These coward leaders cannot do anything more than to prostrate infront of Delhites.

    Shubhangi Shinde (Scotland)

  4. Anonymous said...
     

    Maha. shoud does something like south state done,specially tamilnadu. Should support own peoples and develop.Forget useless central govt.Just think ourself marathi peoples

  5. Anonymous said...
     

    I only request to all Marathi leader (excluding some bull sheet)come together stand for the Maharashtra, Marathi manus and with Raj(somewhere his questions r right).
    You have different vision but for Maharashtra you must have one sole.

    Jai Hind , Jai Maharastra

  6. Anonymous said...
     

    महाराष्ट्रातील एकाही राजकीय पक्षाला महाराष्ट्राच्या अस्मितेची चिंता नाही. दोन्ही क़ॉंग्रेस नेत्यांचे मुख्य ध्येय म्हणजे साखर कारखाने, वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालये, सहकारी बॅंका वगैरे अत्यंत फायदेशीर संस्था आपल्या घराण्याच्या ताब्यात ठेवणे. शिवसेनेने सुरवातीस महाराष्ट्रीय अस्मिता जोपासली. पण गेल्या काही वर्षात त्या संघटनेस देखिल घराणेशाहीची कीड लागली आहे ही फार खेदाची गोष्ट आहे. अशा परिस्थितील राज ठाकरे म्हणजे आशेचा नवा किरण आहे असे सामान्य मराठी जनतेस वाटते. भविष्यात त्यांची वाटचाल कशी वळण घेईल हे आता सांगणे अशक्य आहे. पण राज ठाकरे सध्या तरी विश्र्वसनीय वाटतात हे खरे. संयुक्त महाराष्ट्राकरिता झालेल्या लढ्यात कॉंग्रेस नेत्यांचा काहीच सहभाग नव्हता हे विसरता कामा नये. नेहरू धराण्याची सेवा करून सत्तेवर य़ेणे व आपल्या वंशजासाठी अफाट संपत्ती कमावणे एवढेच त्याचे राजकारण आहे. संयुक्त महाराष्ट्राकरिता नेहरूंशी मतभेद झाल्याने केवळ सी.डी. देशमुख यानी आपल्या मंत्रीपदाचा त्याग केला होता. माननीय यशवंतराव चव्हाण याना महाराष्ट्र निष्टेपेक्षा नेहरु निष्ठा जास्त महत्वाची वाटली होती.
    मोहन दड्डीकर
    पुणे

  7. Anonymous said...
     

    I am extremely happy to read the comments of Shubhangi Shinde from Scotland giving a true and frank valuation of Sharad Pawar and Vilasrao Deshmukh (leading political leaders) and exposing their hypocracy. I appreciated it more because these comments are penned by a lady having sirname 'SHINDE", most probably a Maratha Lady. If such frank opnion is given by somebody belonging to to other caste. his house will be burnt and his face will be tarred
    Mohan Daddikar
    Pune.

Post a Comment