व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

खैरलांजी हत्याकांड प्रकरणी सहा जणांना फाशी, दोघांना जन्मठेप

संपूर्ण राज्यात खळबळ माजविणाऱ्या खैरलांजी हत्याकांड प्रकरणी बुधवारी न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावली. या प्रकरणी प्रथम तदर्थ जिल्हा व सत्र न्यायालयाने आठ आरोपींपैकी सहा जणांना फाशीची, तर दोन जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

आरोपींपैकी सक्रू महागू बिंजेवार (४९), शत्रुघ्न इशाराम धांडे (३०), विश्‍वनाथ हगरू धांडे (५७), रामू मंगरू धांडे (३४), जगदीश रतन मंडलेकर (४२), प्रभाकर जसवंत मंडलेकर (२५) यांना फाशीची, तर गोपाल सक्रू बिंजेवार (वय २५), , शिशुपाल विश्‍वनाथ धांडे (२२) यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. २९ सप्टेंबर २००६ रोजी खैरलांजीमधील भोतमांगे कुटुंबातील चार जणांची गावकऱ्यांनी निघृण हत्या केली होती.

या हत्याकांड प्रकरणी सुरवातीला ४७ जणांना अटक करण्यात आले होते. मात्र, त्यांतील ३६ जणांची "सीबीआय'ने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर उरलेल्या अकरा जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले. १५ सप्टेंबर २००८ ला ११ आरोपींपैकी तीन जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

महिपाल अंतू धांडे (वय ४०), धनराज इशाराम धांडे (२७) आणि पुरुषोत्तम तितिरमारे (४३) अशी त्यांची नावे आहेत. या खटल्यामध्ये बचाव पक्षातर्फे ऍड. सुबोध जयस्वाल आणि ऍड. नीरज खांदेवाले यांनी तर सरकारी पक्षातर्फे ऍड. उज्जवल निकम यांनी कामकाज पाहिले.

खैरलांजी प्रकरणात आरोपींना झालेली शिक्षा आपल्याला योग्य वाटते का? या शिक्षेमुळे दलितांवर होणारा अत्याचार थांबेल, असं आपल्याला वाटतं का? आपलं मत ब्लॉगवर नोंदवायला विसरू नका...

5 comments:

 1. Anonymous said...
   

  All people in that village are guilty
  Those People are doing this crime other were watching those.
  I think all people in that village should hang till death.
  Then only they can know the severity of doing crime against poor people.
  Everyday there happen crime against poor low cast people some of these are highlighted
  These people never change they are today’s Hitler
  Low cast people are not independent till date.

 2. Anonymous said...
   

  आजचा दिवस हा भारतीय लोकशाहीचा मृत्युदीन आहे. राजकारण्यांनी सर्वसामान्य लोकांचा शेवटचा आधार असलेल्या न्यायालयांनासुद्धा विकत घेतले आहे हे आता सिद्ध झाले आहे. आरोपींबद्दल जराही सहानुभुती दाखवायचा माझा इरादा नाही. पण हा न्याय निश्चीतच गुन्ह्याच्या प्रमाणात नाही. सात लोकांना (३ पोलिसांसहित) चिरडून ठार मारणार्या संजीव नंदा याला फक्त ५ वर्षे शिक्षा दिली गेली. त्यामानाने ही शिक्षा निश्चीतच जास्त आहे. पण कोणताही पक्ष याविरुद्ध आवाज उठवणार नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऍट्रॉसिटीचा आरोप न्यायालयाने फेटाळला आहे. याचा अर्थ दलित म्हणून अत्याचार झाला नाही. ही खरी तर चांगली गोष्ट आहे. पण राजकीय पक्ष "दलित म्हणूनच अत्याचार झाला" हे सिद्ध करण्याचा आटापिटा करत आहेत. हीच लोकशाहीची शोकांतिका आहे.

 3. Anonymous said...
   

  till how long are we going to cry over DALIT ???
  So was it OK if those killed were not dalits and they were from open category ???
  By the way I dont think these criminals will actually be hanged in our life time.. I guess this is just session court.. we still have district court, high court supreme ct..After that our great president of india..I guess they will get their natural deaths by the time their case will come in supreme ct.
  Also agreed with thoughts of 2nd comment. I guess these guys' crime is not what they have been accused of.. The real crime is that they do not have any political GOD FATHER !!!!!

 4. Anonymous said...
   

  If the victims were not dalits, neither the police nor the political leaders would have bothered to arrest, prosecute and punish the guilty. The nature of punishemnt depends upon the social status of the criminals and not on the gravity of crime. Judical sysstem in India is nothing but a farce, enjoyed only by the lawers, and advocates.
  Mohan Daddikar
  Pune

 5. Baliraja said...
   

  दलितांवार अत्याचार होतच असतात. किठेही दखल घेतली जात नाही. डोळे काढणे, जीव घेणे सर्रास होते. खैरलांजीचा हा प्रकार अत्यंत क्रूर होता. पाशवी अत्याचार होऊनही गावाने गुन्हेगारांना पाठीशी घातले. सरकारी यंत्रणेने इतका भयंकर गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केला. बरेचसे साक्षी पुरावे मिळू शकले नाहीत. गावाने तपासासाठी कोणतीही मदत केली नाही. इतका भयंकत गुन्हा ज्यात जीव गेलेला दिसत असूनही उदासीनतेने हाताळण्य़ात आला तर्बाकिच्या गुन्ह्यांचे काय होत असेल या भावनेने दलित जनतेमध्ये उद्रेक निर्माण झाला..इतर अनेक हिंसक आंदोलनामध्ये बघ्याची भूमिका घेणारे शासन या वेळी मात्र अतिसंवेदनशील झाले. घराघरात घुसून स्त्रियांनाही शिवीगाळ व मारहाण झाली..

  अशा परिस्थितीत लागलेला निकाल आहे हा. !
  अर्थातच असा निकाल लागला नसता तर दलित समाजात असंतोष वाढून एखादी न्याय मिळण्यासाठी हिंसक चळवळ सुरू होऊ शकली असती.

Post a Comment