व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

अखेर विजय मराठीचाच...

भारतातर्फे विदेशी कॅटेगरीत पाठविण्यात येणाऱ्या चित्रपटांमध्ये "तारे जमीं पर' या चित्रपटाची निवड झाली असली तरी हा एका मराठी माणसाचाच विजय आहे. कारण "तारे जमीं पर' या चित्रपटाचे क्रिएटिव्ह डायरेक्‍टर अमोल गुप्ते आहेत. तसेच त्यांनीच या चित्रपटाची कथा आणि पटकथा-संवाद लेखन केले आहे. त्यामुळे एका अर्थी मराठीचाच हा विजय आहे, अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष अजय सरपोतदार यांनी व्यक्त केली.

भारतातर्फे ऑस्करच्या शर्यतीत एकूण नऊ चित्रपट होते. त्यातील विशेष बाब म्हणजे या नऊ चित्रपटांपैकी निशिकांत कामत यांचा "मुंबई मेरी जान', आशुतोष गोवारीकरचा "जोधा अकबर', मंगेश हाडवळेचा "टिंग्या', उमेश कुलकर्णीचा "वळू' हे चित्रपट मराठी माणसांचेच होते. त्यामुळे या वेळच्या ऑस्करच्या शर्यतीत मराठी माणसांचेच वर्चस्व होते आणि एका मराठी माणसानेच यामध्ये बाजी मारली याचा आनंद होत आहे, असेही ते म्हणाले.


खरे तर "मामि' चित्रपट महोत्सवात "टिंग्या'ने अटीतटीची लढत "तारे जमीं पर'ला दिली होती. अनेक पुरस्कार या चित्रपटाने पटकाविले. त्यामुळे ऑस्करच्या शर्यतीत हा चित्रपट जरी मागे पडला असला तरी आता मी तो वेगळ्या पद्धतीने पाठविणार आहे. टिंग्या ऑस्करला जाणारच आहे, अशी प्रतिक्रिया "स्मॉल टाऊन प्रॉडक्‍शन'चे रवी राय यांनी व्यक्त केली. टिंग्या हा चित्रपट त्यांनी बनविला होता. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी परीक्षकांच्या निर्णयावर नापसंती दर्शविली नाही.


ऑस्करच्या स्पर्धेत बाजी मारणाऱ्या आपल्या मराठी बांधवांना या ब्लॉगवर शुभेच्छा द्यायला विसरू नका...मराठी माणसाविषयीच्या आपल्या भावनाही व्यक्त करा. अमोल गुप्तेनं ऑस्करपर्यंत धाव घेऊन बच्चन कुटुंबीयांना दाखवून दिलंय... की हम यहॉंकें शेहेनशा...

6 comments:

  1. Anonymous said...
     

    No its not...
    And it need not be!!
    Its a victory for entire tare jamee par team which may include few marathi people as part of team..
    I support all the Marathikaran of maharashtra. because its the right thing.
    But tomorrow if iindian cricket team wins a match.. its not marathi vijay because Sachin tendulkar is there.. its a team effort and team victory..
    Dont try to push Marathi where its not required..

  2. Unknown said...
     

    या विषयावर वादातीत वक्तव्य करण्याऐवजी मी श्री.अमोल गुप्ते तसेच या चित्रपटाला उच्च दर्जा देण्याचे काम केलेल्या सर्व कलाकारांचे व पडद्यामागिल सर्व कर्मचा-यांचे कौतुक व अभिनंदन करतो!
    मराठी माणसेपण आपला ठसा निरनिराळ्या ठिकाणी उठवित आहेत याबद्दल शंकाच नाही!

  3. Anonymous said...
     

    वरच्या(पहिल्या) प्रतिक्रियेशी मी सहमत आहे. आंधळे मराठीप्रेम काही कामाचे नाही. सच्चा मराठी माणूस हा गुणवत्तेलाच प्रथम क्रमांक देईल, मग ते कोणत्याही भाषेतील असो. हे मराठी रसिकांनी दाखवून दिले आहे. मराठी माणूस आघाडीवर आहे याबद्दल आनंद आहे पण जगातील सारी बुद्धिमत्ता मराठी लोकांकडेच आहे असा सूर जो लेखात जाणवतो तो अज्ञानमूलक आहे. अशा मन:स्थितीमुळे मराठीचे आणि मराठी लोकांचे नुकसानच होणार आहे. सर्व क्षेत्रात मराठीचा विस्तार करण्यासाठी प्रथम संकुचितपणा सोडून द्यायला पाहिजे आणि आणखी नवेनवे करण्याचा ध्यास घेतला पाहिजे.

    सर्व मराठी कलाकारांचे अभिनंदन!

  4. Anonymous said...
     

    Marathi for Maharshtra, Kaanadi for Karnataka, Tamil for Tamilnadu, Hindi for UP... Dont mix every thing everywhere. One thing is clear, we dont like ENGLISH!

    Raj Thakre should focus on Marathi in jobs, state jobs and private jobs. He want to improve and rediscover marathi, so he has to show a full path for marathi people.

    I mean, if our kids go to marathi school (we are proud of that), he/she should get marathi in college, he/she should get marathi at work and he/she should get marathi in everyday life.

    If he/she goes to marathi school and no marathi at jobs, higher eduaction, then he/she will trun to ENGLISH! Because he/she see others non-maharashtrain going to ENGLISH and go to USA/UK! (to pay taxes for west and forgets mahatashtra)

    So Raj Thakre and MNS should focus on a complete cycle for Marathi. Like the Chineese, Japaneese, French. They learn-teach-drink-work-die in chineese, Japaneese, and french. They dont want ENGLISH! So do we in maharashtra, need MARATHI. Only then Marathi will get International FAME!

  5. Anonymous said...
     

    The average pay in USA is US$ 39000.00

    That means you get US$ 3250/- PM before tax.

    Professional Tax US$ 30/- PM

    Then comes Federal Income Tax US$ 200/- PM

    Then comes Social Security Tax US$ 150/- PM

    Then comes Medicare Tax US$ 50/- PM

    Then comes Family of three health insurance US$ 150/- PM

    Then comes Auto LOAN US$ 200/- PM

    Then Comes Auto INSURANCE US$ 50/- PM

    THEN COMES RENT for HOME US$ 500/-PM

    THEN COMES UTILITIES for HOME US$ 40/- PM

    Then COMES LOCAL PHONE US$ 40/- PM

    THEN COMES INDIA PHONE CARDS $ 20/- PM

    THEN COMES GAS FOR CAR $ 60/- PM

    THEN COMES GROCERIES FOR HOME US$ 300/- PM

    THEN COMES DIAL UP INTERNET $ 10/- PM

    Entertainment/movies $ 100/- PM

    Clothes/Accessories $ 100/- PM

    STATE TAXES for CAR US$ 20/- PM
    Parking TAX for car US$ 20/- PM

    --------------------------
    Total balance = 3250-2220=1000/- $US PM
    -------------------------

    If you plan a trip to INDIA, all your saving is goen. Plus you have no leave, no relatives, YOU, YOUR CAR, YOUR FAMILY and YOUR TAXES.

    THE ROAD TO RICHES AFTER COMING TO AMERICA IS at least 20 years! AMERICA IS NOT A EASY DESTINATION.

    WITH ECONOMY GOING DOWN given rise to discrimination, lesser jobs and more risks for such a small saving. INDIA IS BETTER AND PEACEFUL!

  6. Anonymous said...
     

    No it is not,
    If it is so then why not movie was made in Marathi?
    It was really good team work & good acting by kid.
    उगाच त्यांच्या चांगल्या कामाचे अवमूल्यन करू नका.
    माला आता सकाळच्या (पुणे प्रतिबिंब) संपाद्कांन्ना एक सुचना कराविशी वाटते की उगाच मसालेदार विषय नका घेऊ चर्चे साठी.

Post a Comment