व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

25 कोटींना एक खासदार! - डाव्यांचा गौप्यस्फोट

लोकसभेत विश्‍वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी कॉंग्रेसने चालविलेल्या घोडेबाजारात एका खासदाराची किंमत 25 कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोचल्याचा गौप्यस्फोट डाव्या पक्षांच्या नेत्यांनी केला.

""देशाला बुश सरकारकडे गहाण टाकणाऱ्या अणुकरारावरून लोकसभेत मांडला जाणारा विश्‍वासदर्शक ठराव हे भारतीय राजकारणातील अत्यंत महत्त्वाचे वळण आहे. या वळणावर कॉंग्रेसबरोबर जाण्याची चूक केली, तर इतिहास आपल्याला माफ करणार नाही,'' असे आवाहन करून या नेत्यांनी अणुकराराविरोधातील जनआंदोलनाचे रणशिंग फुंकले. यासाठी हजारो समर्थक देशभरातून राजधानीत आले होते.

ते म्हणाले, ""एका खासदाराला 25 कोटी रुपयांत विकत घेण्याची आणि हा भाव वाढवत नेण्याची तयारी असलेल्या कॉंग्रेसला देशातील गरिबांचे कंबरडे मोडणारी महागाई दिसत नाही. खासदारांची सौदेबाजी करून कॉंग्रेस गुन्हा करीत असून, जनता त्यांना शिक्षा करेल.

एकीकडे महागाईचे संकट समोर उभे असताना कोट्यवधी रुपयांची खैरात वाटली जात आहे. विकास कामे तर दूर खूर्ची टिकविण्याच्या नादात नेत्यांनी अक्षरश: घोडेबाजार मांडलाय. अशा नेत्यांना जनता माफ करेल काय?

5 comments:

 1. Anonymous said...
   

  pan ya lokani support denya sathi sadechar warshe kiti rakkam ghetali?


  महाराष्ट्र माझा

 2. Management expert said...
   

  now a day everyone know the politics and polititions, what they do and did....done.

 3. Anonymous said...
   

  Investigate this, and if comes true, this RS Member should be jailed for life!

 4. Anonymous said...
   

  आपली सत्ता टिकवण्यासाठी लागणार्‍या बहुमतासाठी इतर पक्षातील खासदाराना रोख पैसे किंवा सत्तेत प्रचंड आर्थिक फायदा देणारे पद देवून त्यांची मते विकत घेणे ही कॉंग्रेस पक्षाची फार जुनी नीती आहे. काही वर्षापूर्वी तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यानी शिबु सोरेन या खासदाराला साठ-सत्तर लाख रुपये लाच देवून आपली सत्ता टिकवली होती हे सर्वाना माहित आहेच. ही बाब उच्चतम न्यायालयात दाखल झाल्यानंतर न्यायालयाने संबधिताना शिक्षा करण्याऐवजी खासदाराच्या सभागृहातील वर्तणुकीबद्दल कसलीही कारवाई करण्याचा अधिकार घटनेने न्यायसंस्थेस दिला नाही या सबबीखाली खासदाराना उघडपणे भ्रष्टाचार करण्यास संपूर्ण मोकळीक दिली आहे. यामुळेच आतादेखिल आपली सत्ता टिकवण्यासाठी खासदाराना विकत घेण्याचा कायदेशीर मार्ग कॉंग्रेस पक्षाने अवलंबिला आहे यात काहीच नवल नाही. गेल्या काही वर्षातील चलनवाढीमुळे लाच रकमेत वाढ होवून सध्या खासदाराचा भाव पंचवीस कोटी झाला आहे एवढेच.
  मोहन दड्डीकर
  पुणे

 5. Anonymous said...
   

  Without even the ruling politicians understanding anything about the elusive 1 2 3 wording or the Hyde act of the proposed nuclear agreement,the selfish & Gandhi familycentric congress is trying to shove the same down the throats of the janata as if it alone can save the sinking ship!
  The congress prince making silly immature statements still getting unnecessary publicity by the media!
  That is the SADDEST story of todays India caught helplessly in congress power!
  aadhi ghodabazar va nantar ghoda maidan javal aahe!!!

Post a Comment