व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

साहित्य महामंडळावर "ब्लॉगविश्‍वा'तून टीकास्त्र

"ई-सकाळ'वर प्रतिक्रिया ः परदेशात संमेलनास विरोधाची संख्या अधिक

"फुकटात परदेशवारीची हौस' ते "सातासमुद्रापार गेल्याचा आनंद' अशा प्रतिक्रियांचा हिंदोळा "ई-सकाळ'च्या ब्लॉग्जवर रविवारी आणि सोमवारी अनुभवास आला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमेरिकेत सॅनफ्रान्सिस्कोमध्ये घेण्याच्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या निर्णयावर "सकाळ ब्लॉग' आणि "पुणे प्रतिबिंब' ब्लॉगवर अशा दोन्ही टोकांच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. त्यातही साहित्य महामंडळाच्या निर्णयावर टीकेचा रोख असणाऱ्या प्रतिक्रियांची संख्या अधिक आहे, हे विशेष.

मराठी साहित्याचे बहुसंख्य रसिकजन महाराष्ट्रात असतील, तर हे साहित्य संमेलन अमेरिकेत भरविण्याची गरजच काय, असा प्रश्‍न काही साहित्यप्रेमींनी उपस्थित केला. संमेलनाच्या नावाखाली साहित्यिकांची परदेश वारी करण्याची हौस भागविली जात असल्याचा आरोपही अनेकांनी केला. याबाबत श्रीधर, योगेश, प्रसाद म्हणाले, ""अमेरिकेच्या तुलनेने महाराष्ट्रात साहित्य रसिकांची संख्या निश्‍चितच मोठी आहे. हे रसिक संमेलनाला मुकणार नाहीत, याचा विचार झाला पाहिजे. सर्वप्रथम अमेरिकेतील नव्या पिढीत मराठी विषयीची गोडी निर्माण केली पाहिजे; अन्यथा अमेरिकेतील हे संमेलन केवळ फार्स ठरेल.

''मागील संमेलनाचा दाखला देताना काही वाचक म्हणाले, ""मागील वर्षी संमेलनात ग्रामीण भागातील साहित्यिकही सहभागी झाले होते. त्यांना या वर्षी संमेलनापासून वंचित ठेवण्याचे काम साहित्य मंडळ करत आहे. केवळ 70 साहित्यिकांच्या परदेशवारीसाठी एक कोटी खर्च करण्याऐवजी त्या रकमेत विकासकामे करावीत आणि साहित्यिकांना स्वखर्चाने जाण्यास भाग पाडावे.''

रोहित कुलकर्णी यांनी हे संमेलन मराठी मातीत म्हणजे मुंबईत होण्याची गरज व्यक्त केली; तर ए. पी. जामखेडकर यांनी हे साहित्य संमेलन केवळ अनपेक्षित असल्याचे मत व्यक्त केले.

संमेलनाचा निर्णय स्वार्थापोटी होत असल्याचा खेद व्यक्त करताना शेफाली जोशी, बालाजी पवार, संदीप दळवी म्हणाले, ""केवळ मूठभर लोकांनी अशा प्रकारचा निर्णय घेणे मुळातच चुकीचा आहे. अशा निर्णयाने साहित्य मंडळ अप्रत्यक्षरीत्या येथील रसिकांचा सहभाग नाकारत आहे. अमेरिकेतील ज्या नागरिकांना मराठी साहित्याविषयी आत्मीयता आहे, त्यांनी महाराष्ट्रात येऊन संमेलनाला उपस्थित राहावे.''

""हे संमेलन एकाच वर्गाच्या हातात आहे, अशी शंका उपस्थित करणाऱ्यांच्या मनात त्यांच्याविषयी अधिकच कटुता वाढेल,'' अशी शक्‍यता एका वाचकाने व्यक्त केली. काही वाचकांनी या निर्णयाचे स्वागत केले. मराठीला जागतिक दर्जा प्राप्त करून देण्यासाठी हे संमेलन अमेरिकेत होणे आवश्‍यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्याबाबत सुभाष भाटे म्हणाले, ""आज महाराष्ट्रातील मोठा वर्ग अमेरिकेत स्थायिक आहे. तेथे हे मराठी बांधव मराठीचा झेंडा अभिमानाने फडकावीत आहे. त्यामध्ये अनेक साहित्यिकांचाही समावेश आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सॅनफ्रान्सिस्कोमध्ये होणाऱ्या संमेलनाचे स्वागत झालेच पाहिजे. त्याकडे संकुचित वृत्तीने बघणे सोडून दिले पाहिजे.''

आम्ही आपल्या प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत आहोत...आपली मते या ब्लॉगवर जरूर नोंदवा..

4 comments:

  1. Anonymous said...
     

    Shame on the committee who takes such decisions. The sole purpose of such event is at stake. This surely is a national event (based on the name of the event). If NRIs are so interested in attending this event they should come to India (once in a while).

    We need more and more participation from Marathi people in Maharashtra for this event. Marathi percentage in metros of Maharashtra and overall Maharashtra is decreasing. At the same time, Marathi people in Maharashtra are adopting non-Marathi culture, traditions. In such situation it is better to make such events happen in Maharashtra and encourage everyone to attend it.

    NRIs, as I know, are more interested in spending their weekend with some adventure. And so if this event happens in bay area, it is just going to be one "fun, exciting weekend" for those NRIs. Whereas true "sahitya premi" all over Maharashtra are going to miss this year's opportunity.

    Because of the sponsered trip the organizers seem to be so very exited. To grab this "once in a lifetime" opportunity to visit US they voted 16/18 for the bay area location. This shows how poor the composition of the overall committee is.

    Shame!

  2. Unknown said...
     

    कशाला हे मराठी संमेलन देशाच्या बाहेर नेत आहेत?

    अनिवासी मराठी मानसाचा पुळका आला आहे संमेलन अध्य्क्षांना असे म्हनायचे का?

    देशातुन जानारे तर सोडाच,मराठी मानुस सुद्धा दुसर्‍या देशात जावुन काय दिवे लावतोय,काय करतो तो मराठी मानसासाठी?

    कशाला त्यांच्या साठी हे संमेलन तिकडे?

    अनिवासी मराठी मानसाला खरच खूप प्रेम असेल मराठी चे तर भारतात येवुन उपस्थीत रहावे तसे आमंत्रन देन्याची पन इछहा नहिये कारन हे संमेलन भरुन काय उपयोग होतोय मराठी साठी?

    सगळा वेड्याचा बाज़ार झालाय.

  3. Atul Kumthekar said...
     

    आजकाल खाही पण निर्णय घेतला की टीका करायची फैशन जालिये.
    पण या निर्नायाबाबत माला फारसे गैर वाटत नाही. मंडलाचे अध्यक्ष, काई साहित्यिक आहेत का?
    मंदालात असलेले आत व बाहर छे राजकारण आणि राज्कार्न्यांची छुपी व उघड लुडबुड - सग्लिकद्चिच
    आज काल सर्वया मान्य करवून घेतली आहे. वर काही कोणी बोलले की ब्रह्मण विरुध रंग देऊन विषय भाल्तिकदेच न्याचा आणि मूल मुद्द्याला बगल द्यायची है थारेलेले. (कुमार केतकर हल्ला प्रकरण)

    मी भारतात पुण्यात यायचा निर्णय घेतला तेव्हा सन फ्रंसिको मधील एक मित्र हसून म्हणाला होता - इंडियन कल्तुरे तुला इथेच पहायला मिळेल. जाकिर हुसेन पासून तद्दन सगले कलाकार बी एरिया मधे सेटल जालेट. अता ४ वर्षानंतर पटते. इथे फक्त हेवे दावे आणि द्वेष चाललेत. राज्कर्न्यान्नी सग्लाच नासुं टाकले. जमीनी ज्याच्या ताब्यात, गुंडा ज्याच्या हातात टा सर्वग्न्य! मग क्रिकेट असो व साहित्य. पंचा नेसून लन्दन ला जाणारे गांधीजी कुठे आणि क्रिकेट टीम बरोबर कोट सुइट घालून फिर्नारे कृषिमंत्री कुठे! इतका सगळा विचित्र चालले मग सन फ्रंसिको मधे एक सम्मलेन घ्याला काई हरकत आहे. एकदा तरी एक्जुतिने राहू यात की! नाहीतरी इथे संग्लित सम्मलेन जाले तर किती पुणेकर आणि मुम्बैकर नाशिककर व कोल्हापुरकर सोलापूरकर रत्नागिरीकर तिथे मरठी प्रेमाने जातात?
    समजा है सम्मलेन संतांच्या फुगेवादित होअत आहे!!!

  4. Anonymous said...
     

    mala vatate ki farach uthal vichar zalela aahe sahitya sammelanachya karyakarinikadun.

    pardeshastha 2nd generation la marathi vishayi kitapat astha asate he mi swataha pardeshat rahatey mhanun kalale..kashala ugach ha attahas ? tya kahi first generation saathi jyani desh anek karanastav sodala...

    pardeshat rahun bhasheche godave ganaryani bharataat yave sammelanala..nahi kon mhanatey ?

    aani 2 marathi manase bharatabaher hamkhaas english madhe bolat asataat..laaj vatate ho tyana..mag kashala he sammelan tikade...?

    jagi ha khaas vedyancha pasara majala saara...hech khare...

    kirtimalini gadre
    Zurich

Post a Comment