व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

नदीप्रदूषणास नागरिकच जबाबदार

माणूस आणि जनावरांची प्रतिकारशक्ती निकामी करू शकणाऱ्या आणि कर्करोगासारख्या प्राणघातक रोगांना निमंत्रण ठरू शकणाऱ्या अत्यंत घातक द्रव्यांचे अंश मुळा-मुठेच्या पाण्यात आढळून आल्याचे वृत्त आम्ही नुकतेच "पुणे प्रतिबिंबच्या ब्लॉग'वर प्रसिद्ध केले होते. त्या वृत्तावरील प्रतिक्रियाही "ई- सकाळ'च्या वाचकांकडून मागविल्या होत्या. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद देत वाचकांनी आपली मते मांडली.

हर्षद खुस्पे प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले, ""की सर्वप्रथम नदीशी संलग्न असलेले ड्रेनेज पाइपलाइन बंद करून, नदीत सोडले जात असलेले सांडपाणी थांबविले पाहिजे. त्यावप्रमाणे नदीतील गाळ उपसण्यासाठी जेसीबीचा वापर केला पाहिजे. जेणेकरून नदीपात्र स्वच्छतेला वेग येईल. नदीमध्ये निर्माल्य आणि कचरा टाकणाऱ्यांकडून एक हजार रुपयांचा दंड आकारला पाहिजे.''

नदीप्रदूषणास सर्वसामान्य नागरिकच आणि शासकीय संस्था जबाबदार असल्याचे मत लंडन येथे स्थायिक असलेले सुनील वैद्य यांनी मांडले. ते म्हणाले, ""नदीप्रदूषणामुळे केवळ कॅंसरसारख्या रोगांनाच नव्हे, तर जंतूसंसर्ग आजारांनाही आमंत्रण मिळू शकते. दरमहिन्याला सर्वेक्षण करूनच या समस्येवर तोडगा काढता येईल. अन्यथा कळतनकळत नदीच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला आजाराचा धोका उद्‌भवू शकतो. '' नदीप्रदूषणाच्या बातम्या छापून आल्यानंतर थोडीफार मलमपट्टी करायची व मूळ मुद्दा दुर्लक्षित ठेवायचा, या धोरणामुळेच ही परिस्थिती उद्‌भवल्याचे कॅप्स्तूभ म्हणाले.

नदी म्हणजे राडारोड्यापासून सर्व प्रकारचा कचरा टाकण्याचा व ड्रेनेजचे पाणी सोडण्याचा सर्वसोपा मार्ग आहे, अशी सर्वांची धारणा झाली आहे. राज्यकर्त्यांमध्ये इच्छाशक्तीचा अभाव आणि नागरिकांनी कचरा नदीत फेकण्याची सवयही याला कारणीभूत आहे. शिवाय अशा नागरिकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. ही परिस्थिती अशीच राहिली, तर भविष्यात आणखी मोठा धोका निर्माण होण्याची शक्‍यताही त्यांनी व्यक्त केली आहे.

सचिन बांडभारे यांनीदेखील सकाळजवळ त्याबाबतचे आपले मत मांडले. ते म्हणाले, ""की पुणे आपले घरच आहे, या जाणिवेतून नागरिकांनी नदीच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले, तर हा प्रश्‍न काही प्रमाणात का होईना सुटण्यास मदत होईल.बऱ्याचदा कचरा कुंडीमध्ये अत्यंत घाईघाईने टाकला जातो. महापालिकेच्या गाड्याही कचरा भरताना अर्धा कचरा रस्त्‌ यावर सांडतात. त्यामुळे नागरिक जोपर्यंत स्वयंशिस्त जोपासत नाहीत, तोपर्यंत स्वच्छ पुणे, सुंदर पुणे होणार नाही. ''जपानमध्ये स्थायिक असलेले या श्री. बांडभारे यांनी तेथील काही अनुभव सांगितले. ते म्हणाले, ""जपान हा अतिशय स्वच्छ देश आहे. मात्र, त्यामध्ये तेथील नागरिकांचा वाटा मोठा आहे. रोजच्या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लाव ण्याबरोबरच साप्ताहिक सुटीच्या दिवशी आजूबाजूचा परिसर स्वच्छ करतात. यातील दहा टक्के काम आपल्याकडे झाले, तरी, "स्वच्छ पुणे- सुंदर पुणे' साकारायला वेळ लागणार नाही.''

2 comments:

  1. Unknown said...
     

    "नदीप्रदुषणास सर्वस्वी नागरिकच जबाबदार" या विधानाशी मी सहमत नाही.याआधीच्या याच विषयावर मी लिहिले होते की तात्पुरती मलमपट्टी करून वेळ मारून न्यायच्या महापालिकेच्या सवयीमुळेसुद्धा ही परिस्थिती निर्माण झाली आहे!
    बिल्डर लोक,कचरा फ़ेकणारे कांही नागरिक,नदीत सांडपाणी सोडू देणारे व तटस्थ रहाणारे महानगरपालिकेचे आरोग्यविभाग कर्मचारी,नदीच्या किना-यावर भर घालून अनधिकृत बांधकामांकडे सोयिस्करपणे डोळाझाक करणारे महानगरपालिकेचे अभियंते,नदीपात्रात रस्ते बांधून तिच्या
    क्रोस-सेक्शन क्षेत्रफ़ळाला आणखी कमी होउ देवून पावसाळ्यात पुराचे पाणी "ओव्हरफ़्लो" झाले तरी चालणारी महानगरपालिकेची व सरकारची झोपलेली यंत्रणा हे प्रामुख्याने या परिस्थितीला जबाबदार आहेत!
    नागरिक चांगल्या उद्देशाने व भावनेने उपाय सुचवितात,पण अंमलबजावणी कधीच होत नाही हे पुणेकरांचे दुर्दैव आहे!
    कशाला हवेत खासदार,पालकमंत्री,नगरसेवक ज्यांना वर्षनवर्षे नदीची दुरावस्था दिसूसुद्धा शकत नाही?
    प्राथमिक शाळेतला मुलगासुद्धा नाक मुरडतो नदी पाहून,पण हे महाभाग आपल्या ivory towers मध्ये वास्तवात असल्यामुळे त्यांना तेथून कांहीच दिसत नाही!
    मत मागायला व कोनशिलांच्या उद्घघाटनांना मात्र सरसावून हजर!
    सुभाष भाटे

  2. Anonymous said...
     

    If people are responsible for cleanliness, law and order etc. etc. Why even have the municipal corporation and police departments? just to collect bribes?

Post a Comment