व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

पुणेकरांनी रिचविले 3.67 कोटी लिटर

16 टक्‍क्‍यांनी वाढ ः उद्दिष्ट न गाठल्याची सरकारला

गेल्या वर्षभरात तीन कोटी 67 लाख लिटर देशी-विदेशी दारूची, तर दोन कोटी 57 लाख लिटर बिअरची विक्री झाली. देशी-विदेशी दारूच्या विक्रीत 30 लाख लिटरने, तर बिअरच्या विक्रीत 35 लाख लिटरने वाढ झाली आहे. विदेशी दारू व बिअरच्या विक्रीत 16 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त वेगाने वाढ होत आहे. दारूच्या व्यसनाची सुरवात बिअर व विदेशी दारूने होत असल्याने तरुणवर्गात व्यसनाचे प्रमाण वाढत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

मद्यविक्रीत झालेली वाढ सर्वसामान्यांसाठी, विशेषत: पालकवर्गासाठी धक्कादायक असली, तरी सरकारने दिलेले विक्रीचे उद्दिष्ट पूर्ण करता न आल्याची खंत राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या पुणे विभागाला आहे. विदेशी दारू व वाइन विक्रीचे उद्दिष्ट विभागाने शंभर टक्के पूर्ण केले. मात्र, देशी दारू व बिअर विक्रीचे उद्दिष्ट विभागाला पूर्ण करता आले नाही. त्यामुळे त्यावरील महसुलाचे उद्दिष्ट 99 टक्‍क्‍यांपर्यंतच गाठता आले. पुणे जिल्ह्यातून 2007-08 या आर्थिक वर्षात दारूवरील शुल्क व बेकायदा दारूविक्रीच्या दंडापोटी 596 कोटी रुपये जमा झाले आहेत.

पुण्यात सर्वाधिक विक्री बिअरची होते. त्यानंतर देशी दारू व विदेशी दारूचा क्रमांक लागतो. वाइन विक्रीला राज्य सरकारकडून प्रोत्साहन मिळत आहे. गेल्या वर्षात त्यात 52 टक्‍क्‍यांनी म्हणजे एक लाख 20 हजार लिटरने वाढ झाली. हातभट्ट्या बंद करण्यात यश येत असल्याने देशी दारूच्या विक्रीत चार टक्के, म्हणजे सहा लाख लिटरने वाढ झाली आहे. वडारवाडी, येरवडा व पिंपरीतील हातभट्ट्यांवर नियंत्रण आणण्यात विभागाला यश आले आहे. सध्या सर्वाधिक हातभट्ट्या लोणी काळभोर हद्दीत आहेत. अवैध दारूधंदे प्रकरणी तीन हजार 319 गुन्हे दाखल करून दोन कोटी 65 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला. दारूची चोरटी वाहतूक प्रकरणी 54 वाहने जप्त करण्यात आली आहेत.

शिक्षणाच्या किंवा नोकरीच्या निमित्ताने विदेशी तसेच परप्रांतीय तरुणांचे पुण्याकडे येणारे लोंढे. त्यांची स्वैराचारी वृत्ती हे घटकही मद्यविक्रीच्या वाढीस कारणीभूत असू शकतात. किंबहुना विदेशी मद्याची वाढती मागणी हेच तर सूचवत नसेल? आपल्याला काय वाटते याविषयी. मद्यविक्रीस आणखी कोणते घटक कारणीभूत असू शकतात.

9 comments:

  1. Anonymous said...
     

    Chaan. Nice Record for Sale of Madhira. Congress(I) government has made its people in Maharashtra drink and become liquor-addict. It is said "Thembe Thembe Paani Sudhaa Dagadaamadhye Bhook Kaarte".

    Similarly drinking liquor will create holes in Humans brain.

    Ohhh Yaaa.. I completely forgot, sorry, "We are following the role model of AMERICA". Well America and Americans are facing the effects of Beer and Rum and Wine just after 20 years of its continuous usage.

    Same will happen in Maharashtra, and Government will be out of picture then. It will be people of Maharashtra who will face brain-diseases, heart diseases and many others.

  2. Anonymous said...
     

    Liquor Stores in Nasik, Kolhapur, Pune and Mumbai are mostly owned by outsiders and have setteled in these town since 20-30 years.

    A time will come when all the local Women and families sorrounding these liqor stores will force-close these liqor shops and run them out of business.

  3. Anonymous said...
     

    दर बजेटमध्ये वाढवलेले दारूवरील करांचे प्रमाण व जनतेला आणखी प्यायचे रस्त्यांवरील व TV वरील जाहिरातींद्वारा आवाहन यामुळे सरकारच्या तिजोरीत पडणारी प्रचंड कररूपी भर,राज्यातील पोलिसांची [ढेर]पोटे व दारूच्या दुकानात होणारी प्रचंड गर्दी हे पाहूनच आपण कुठल्या दिशेकडे झटपट प्रवास करत आहोत हे स्पष्ट दिसते.
    माननीय कृषीमंत्र्यांनी वाईन प्या असे आवाहन केल्यापासून बाजारातील फ़ळरूपी द्राक्षांचे प्रमाण घटले व द्राक्षापासूनच्या निरनिराळ्या सुंदर वाईन बाटल्या बाजारात आल्या.
    अर्थात त्यांचे उत्पादक पैसे मिळाले तरी त्यापासूनच्या "झिंग"वर समाधानी नव्हते म्हणून ते विदेशी दारूकडे वळले!
    कुठे ते दारूबंदीचा नारा देणारे कै.महात्मा गांधी व कुठे ते आजचे कोंग्रेस सरकारचे सर्वकांही फ़क्त पैशातच मोजणारे त्याच नांवाचे सरकार चालविणारे कुटुंब!
    जास्तीतजास्त दारू विकून कर रूपी उत्पनाचेसुद्धा सरकारने उद्दिष्ट ठेवले आहे हे ऐकून करमणुक झाली[खरे तर पारा चढला!].
    आता निवडणुकांच्या काळात तर फ़ुकट दारू वाटायचीच आहे मते मिळवण्यासाठी!
    लाथा घालायला पाहिजेत अशा सरकारला मतदानाच्यावेळी!
    पण दारूड्यांच्या या देशात बेवड्यांनाच सर्वात जास्त किंमत आहे!मद्यपी झिंदाबाद!
    हल्लीच्या सुगीच्या दिवसात दृतगती मार्गावरच्या बारमध्ये पिउन बेफ़ाम गाड्या चालविणा-यांमुळे अपघात होणारच!
    एखाद दूस-या खेड्यापाड्यात महिला मात्र हे प्रकार थांबवू शकल्या आहेत,पण शहरांत उच्चभृंपासून झोपडपट्ट्यातले बरेचसे लोक दिवसभराचा शीण,महागाईमुळे उभी राहिलेल्या समस्या यांना विसरण्याकरता कांही पेग रिचवितात व घरातल्या असहाय्य अबलांच्या प्रतिकाराला जुमानत नाहीत हेपण खरे!
    कां उगाच सर्व बाबतीत अमेरिकेला नांवे ठेवता? तेथे कोणीहि तर्र झालेला दिसत नाहीं व पिणे कमीच आहे!तेथल्या पोलिसांनी पकडले तर लायसेन्स गेलाच!
    आपल्याइथे मात्र कहर झालेला आहे जो सरकारच्या पथ्यावर पडत आहे!

  4. Anonymous said...
     

    "America-a living truth"

    Coming and learning in America (Dreaming of US$$$, quick money, richiness, cars, glamor) is a dream for every person outside America.

    Every coin has two sides. One Head (wanted or good one) and one Tail (unwanted or bad one). When youth of India, especially Maharashtra, once here, feel alone as they dont see same kind of culture, socialism, job environment, and Americans dont encourage you every now and then as you are a addition to thier problem.

    If you have to make friends, get along with them, you have to mix and behave with them. You need to do all those thing that they do.. In the process, many Indians and Marathi people do worthless and lower lever jobs, all the time you have to do "hanji hanji" inorder to keep your jobs, try to tell how India is nice to them evey though they are not interested in you.

    You get to drinking with them, and if you return to INDIA, you keep up the habit. Above all, wine is cheap in INDIA than USA, so why not drink 4 pegs instead of 2! The damage is done. And now a days, globlization has brought in many of these hibits in Maharashtra. Dance Bars, and what not are just the faint picture. There are many such illegal dealing under the rug in PUNE and Mumbai! AND all this needs WINE!

    Stop following and Maharashtra will lead! It will lead so that the west follows us! This is only possible if we drink less and be concious than unconcious after drinking!

  5. Anonymous said...
     

    englad america madhye loka socal honya saathi pub madhye jaatat, pub madhye jaaun daaru pine hey kaaran naste... pardeshtlya daaru madhye alcohol che praman faar kami aaste, beer madhye 4.5%. hech aaplya deshat beer madhye 8-10% aaste. dusrya deshana naave thevnyat kaahi aartha naahi kaaran hi aapli samasya aahe. navin pidhi madhye vyasan-mukti barya-paiki aahe... sadhyache bevde melya-nantar kaal badlel aase vaatate...

    April 17, 2008 10:32 PM che anonymous, tumahala aani tumchya blog la namaskaar. Tumhi je lihile aahe tey purna satya aahe, cheers.

  6. Anonymous said...
     

    भारतीय तत्वज्ञानात “अद्वैत” या संकल्पनेला फार महत्व आहे. अहंकारामुळे मी व तू या वृत्तीचा उगम होतो व त्यातूनच स्वार्थ व भयाची निर्मीती होते. या दोन विकारापासून मुक्त व्हायचे असेल तर स्वतच्या अस्तित्वाचा विसर पडला पाहिजे. असा विसर पडण्यासाठी मदिरासेवन हा सर्वात सोपा मार्ग आहे. शिवाय सध्या जीवनकलह फार तीव्र झाला आहे. वाहनांचे अपधात, खून, दरोडे, समाजकंटकांची गुंडगिरी यात भयानक वाढ झाली आहे. या सर्व बाबीमुळे सर्वसामान्यांचे जीवन फार असुरक्षितत झाले आहे. आतापर्यंत दारू पिण्याचे व्यसन हे केवळ शारिरिक श्रम करणार्‍या वर्गापुरते मर्यादीत होते. पण समाजात वाढत चाललेत्या अपप्रवृत्तीला आळा घालण्याकरीता आपण असमर्थ आहोत हे उमजून आल्यामुळे मध्यमवर्गीय समाज हताश व दु:खी झाला आहे. य़ा असहाय भावनेमुळे स्वत:ला विसरण्याकरीता सुरापान करण्याकडे मध्यमवर्गियांची प्रवृत्ती वाढत आहे हे निश्र्चीत.
    मोहम द्ड्डीकर
    पुणे

  7. Unknown said...
     

    आजच्याच सकाळमध्ये बातमी आली आहे की कंत्राटदार PMC चे अभियंते यांना टवेरा गाड्या,लपटोप,मोबाईल वगैरे मागणीप्रमाणे जनतेच्या पैशाने पूरविणार.
    न दर्शविलेल्या गोष्टी बहुतेक विदेशी दारूच्या बाटल्या,नोटांची पुडकी व नाचणा-या पोरी पण असणार! छान चालले आहे.
    तिकडे दूस-या बातमीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मध्यरात्रीच्या [बहुतेक झिंगून घातलेल्या] अडकाठीमुळे व गोंधळामुळे ३६ लाखाचे सिमेंट कोंक्रिट वाया गेले व महागडे यंत्र याचे अतिमोठे नुकसान झाले असे दर्शविले आहे! याचे उत्तरदायित्व त्या पक्षाचे पालकमंत्री व मेयर घेवून नुकसानभरपाई करणार कां?
    तसेच ज्यांनी असे केले त्यांना शिक्षा व दंड होणार कां?
    देइल का कोणी याचे उत्तर?

  8. Anonymous said...
     

    CMBC, IBNLIVE, NDTV, AAJTAK, DUR-DARSHAN, ETVs, MTV,s ALJAZEERA, ZEETVs should be stoped in INDIA. All these channels have an agenda in their themes - "Make the people of INDIA lathergaic and waste"

    They create ideas hurting comman mans family life, social life and political systems.

    Glamor should is unreal. Entire family waste their time watching stupid news (which no one cares), and TV Movies which have no real facts.

    Life was so nice and simple in the 1980's!

    Today its a MESS!

    Stop TV's and Radio's and DJ's. Life will be full of education, happiness and joyful! Free from forced thoughts and enjoying!

  9. Unknown said...
     

    Anonymous of April 18, 2008 11:04 PM
    I remember the 1980s & earlier years & agree with your above comments in toto.The ingress of several unscrupolous TV channels,the frequest different sponsors' fimfare award functions going on for hours beyond midnight,the 5 day,1 day,twenty 20 & now the IPL cricket matches going on throughout the year & even at night,the vulgar dances & dance competitions constantly being shown on TV,the proliferation of mobile phones being used for much more than just brief communications,are spoiling the Indians beyond imagination,making the young generation lethargic,hooking the children to video,mobile & playstation games & will ruin the Indian culture & with it,the NATION!

Post a Comment