व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

हवामान अंदाज अचूक होणार

हवामानाच्या अंदाजासाठी पुणे वेधशाळेतर्फे जगभरातील अद्ययावत यंत्रणांचा वापर सुरू असताना, या अंदाजांमध्ये अचूकता आणण्यासाठी लवकरच हवामान विभागाच्या दिल्लीतील मुख्यालयात बसवलेल्या "हाय स्पीड कॉम्प्युटिंग सिस्टिम'चा इंटरनेटद्वारे वापर करण्यात येणार आहे.या यंत्रणेच्या वापरातून देशभरातील हवामान केंद्रांकडून जमा झालेली निरीक्षणे आणि माहितीचे कमी वेळात विश्‍लेषण करून अधिक अचूक अंदाज लावणे वेधशाळेला शक्‍य होणार आहे.

देशभरातील हवामान केंद्रांकडून जमा होणारी माहिती, उपग्रहांकडून येणारी छायाचित्रे, तसेच विविध निरीक्षणांच्या विश्‍लेषणासाठी पारंपरिक पद्धतींशिवाय युरोप, जपान, इंग्लंडमधील नामवंत संस्थांकडे असणाऱ्या अत्याधुनिक सुविधांचा आधार घेण्यात येतो. देशभरातून जमा होणाऱ्या प्रचंड माहितीचे कमी वेळात विश्‍लेषण व्हावे यासाठी दिल्लीतील मुख्यालयात "हाय स्पीड कॉम्प्युटिंग सिस्टिम' बसविण्यात आली आहे.

पुणे वेधशाळेच्या "फोरकास्टिंग' विभागाला या यंत्रणेचा लवकरच लाभ होणार असून, पुण्यात बसून इंटरनेटद्वारे ही यंत्रणा वापरता येणार आहे. या यंत्रणेचा वापर सुरू झाल्यावर हवामानाचे अधिक अचूक अंदाज लावणे आम्हाला शक्‍य होणार आहे.

पुणे वेधशाळा हवामानाचा जो अंदाज वर्तविते, त्याच्या उलटा अर्थ धरायचा, असे गमतीने म्हटले जाते. किंबहुना उलटाच प्रत्यय येतो, असा पुणेकरांचा दावाही आहे. या पार्श्‍वभूमीवर वेधशाळेने हाय स्पीड कॉम्प्युटिंग सिस्टिमच्या साह्याने हवामानाचा अचूक अंदाज व्यक्त करण्यासाठी उचललेली पावले निश्‍चितच स्वागतार्ह आहे. पण, आता हा अंदात किती अचूक ठरतो, हे बदलणारे हवामानच सांगू शकेल. आपल्याला काय वाटते याविषयी? वेधशाळा अचूक अंदाज व्यक्‍त करू शकेल?

0 comments:

Post a Comment