व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

सोंगाड्याची उपेक्षा...

"शास्त्रशुद्ध पद्धतीने संशोधन करून लिहिलेले "तमाशा कला व सोंगाड्याचे पात्र' हे सोंगाड्याच्या जीवनावरील ४०० पानी पुस्तकाचे हस्तलिखित केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या लालफितीच्या कारभारात गेल्या दहा वर्षांपासून अडकले आहे। ....या संदर्भग्रंथाचे प्रकाशन अवघ्या चाळीस हजार रुपयांच्या अनुदानासाठी मागील दहा वर्षांपासून रखडले आहे। याबाबत अनेकांनी केंद्रसरकारकडे पाठपुरावा केला; परंतु त्यास यश आले नाही,'' अशी खंत पुस्तकाचे लेखक व नाटककार भि. शि. शिंदे यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.

""केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या सांस्कृतिक विभागातील आदिवासी व लोककलावंत विकास योजनेअंतर्गत सोंगाड्यावर संशोधनात्मक लेखन करण्यासाठी १९९३ मध्ये पत्रव्यवहार केला होता। त्या वेळी थिएटर ऍकॅडमीचे तत्कालीन अध्यक्ष सतीश आळेकर यांनी राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या शिफारशीने तसा प्रस्तावही पाठविला होता. त्या प्रस्तावास केंद्राने मंजुरी देऊन दोन लाख रुपये मंजूर केले होते,'' असे श्री. शिंदे यांनी सांगितले.

"त्यातील सुमारे साठ हजार रुपये राज्यभरातील तमाशांच्या फडावर जाऊन सर्व माहिती गोळा करण्यासाठी खर्च झाले, तर एक लाख रुपये साहित्य व छायाचित्रांसाठी मिळाले आहेत। माहिती गोळा करण्यासाठी राज्यभर प्रवास करून सोंगाड्याच्या भूमिका करणाऱ्या अनेक वयोवृद्धांशी चर्चा, तसेच तमाशामालकांच्या मुलाखती घेतल्या आहेत,' असे सांगून शिंदे म्हणाले, ""तमाशा ही महाराष्ट्रातील पारंपरिक समृद्ध कला आहे. त्यातील प्रयोगशील व महत्त्वाचे विनोदी पात्र म्हणून सोंगाड्याची ओळख आहे. हा सोंगाड्या अशिक्षित असून लोकरंजनाबरोबरच लोकप्रबोधन करतो.'' "१९७८ मध्ये कोल्हापूरचे विधान परिषदेचे माजी आमदार नामदेव व्हटकर यांनी एक पुस्तक लिहिले आहे. त्यात त्यांनी, "संस्कृत नाटकातील विदूषकातून सोंगाड्याचा उगम झाला असल्याचे म्हटले आहे.' त्या पुस्तकात अपूर्णपणा वाटला. विनोदी अंगाने उपहास, उपरोध, निसर्गतः मिस्कील स्वभाव यांच्या जोडीला मनोरंजन व प्रबोधन अशा एकत्र कसब असणाऱ्या पात्रावर लिखाण करावे वाटले, म्हणून मी हा विषय निवडला होता,'' असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.

अनेक नेत्यांनी पाठपुरावा केला. काही महिन्यांपूर्वी खासदार शिवाजीराव आढळराव- पाटील यांनीही पाठपुरावा केला होता. त्यावर संबंधित मंत्रालयाने हा विभाग बंद केला असल्याचे कळविले होते. आता "पद्मगंधा' प्रकाशनानेच पुस्तक बाजारात आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सध्या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे काम सुरू आहे. लवकरच ते बाजारात येईल. पुस्तक प्रकाशनाच्या वेळी या विषयावर चर्चा व्हावी; अशी साहित्यातील अनेक तज्ज्ञांनी आपल्याकडे अपेक्षा व्यक्त केल्याचे शिंदे म्हणाले. मात्र, राज्याच्या सांस्कृतिक विभागाने पुस्तक प्रकाशनासाठी सहकार्य केल्यास राज्यातील सोंगाड्यांचा संदर्भग्रंथ खऱ्या अर्थाने समाजासमोर येईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

4 comments:

 1. Anonymous said...
   

  Nitinkumar says
  BHIVA SHIVA SHINDE'S SONADYA WORK IS VERY INTRESTIG STORY. SONGADYACHE LEKHAN SONGADYAPRAMANE UPEKSHIT RAHILE. KENDRA SHASHAN (UPA ALLIENCE) IS NOT BACK IN POORMAN THIS STORY SAYS.
  ALL TAMASHA RASIK GIVE SHINDE ONE RUPEES SONGADYA'S PRINTOUT.

 2. Celular said...
   

  Hello. This post is likeable, and your blog is very interesting, congratulations :-). I will add in my blogroll =). If possible gives a last there on my blog, it is about the Celular, I hope you enjoy. The address is http://telefone-celular-brasil.blogspot.com. A hug.

 3. Ashish said...
   

  Congress chya rajyat keval musalmanachech laad hou shaktatt
  yanchya mule kay matech thodi padnaar aahet?

  http://maharashtramajha.blogspot.com

 4. Neo said...
   

  North Indian Rapes and Kills Girl:

  Time has come to beat North Indians again.

  कोथरूडमध्ये अल्पवयीन मुलीचा बलात्कारानंतर खून

  पुणे, ता. २३ - सहकाऱ्याला उसने दिलेले हजार रुपये परत न मिळाल्याने त्याच्या नऊ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार झाल्यावर तिचा खून करण्याची धक्कादायक घटना काल सायंकाळी कोथरूडमध्ये उघडकीस आली. या प्रकरणी एका युवकाला अटक झाली आहे. .......
  सुरेश प्रेमसिंह विश्‍वकर्मा (वय ३०, रा. वडगाव शेरी) असे अटक झालेल्याचे नाव आहे. त्याने विजयसिंह करणसिंह विश्‍वकर्मा (वय ३१, रा. संजय कंधारे चाळ, कोथरूड) यांची मुलगी खिनाव हिचा खून केला आहे. विजयसिंह व सुरेश हे मूळचे नेपाळचे असून, कोथरूडमध्ये सध्या एका पेस्ट कंट्रोल कंपनीमध्ये कामाला आहेत. तेथे त्यांची ओळख झाली होती. सुरेशने महिनाभरापूर्वी विजयसिंहला एक हजार रुपये उसने दिले होते; मात्र विजयसिंहने ते परत केले नाहीत. त्यावरून त्यांच्यात नुकतेच भांडण झाले होते. शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सुरेश विजयसिंहच्या घरी आला. तेथे त्याने त्याच्या भाच्याबरोबर मद्यपान केले. त्यानंतर "भूक लागली आहे, खायला घेऊन येतो', असे म्हणून तो घराबाहेर पडला. जाताना त्याने खिनावला अंडी आणण्यासाठी बरोबर नेले. दरम्यान, खिनाव रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने विजयसिंहने शोध सुरू केला. त्यात ती सुरेशबरोबर गेल्याचे त्याला समजले. त्याने काल पोलिसांशी संपर्क साधला. तपास केल्यावर सुरेश त्याच्या घरी सापडला. सुरवातीला त्याने खिनाव कोठे आहे हे, सांगण्यास नकार दिला; परंतु पोलिसांच्या चौकशीत त्याने तिचा खून केल्याचे कबूल केले. म्हातोबानगरजवळील डोंगरमाथ्यावर दुर्गम ठिकाणी नेऊन त्याने खिनाववर बलात्कार केला होता. त्यानंतर गळा दाबून खून करून तेथेच तिचा मृतदेह टाकला होता. पोलिसांनी त्याला तेथे नेल्यावर त्याने ठिकाण दाखविले. तेथेच मृतदेहही सापडला. कोथरूड पोलिस ठाण्याचे निरीक्षक गौतम देशमुख पुढील तपास करीत आहे.

  विजयसिंहला चार मुली आहेत. त्यांतील खिनाव ही चौथ्या क्रमांकाची मुलगी होय. सुरेशला २७ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. एन. फटांगरे यांनी दिला.

Post a Comment