व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

कोट्यवधींच्या हस्तिदंतांची चोरी

नगर येथील लष्करी अधिकाऱ्यांच्या मेसमधील कोट्यवधी रुपयांचे दोन हस्तिदंत चोरल्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी दोन लष्करी जवानांसह चौघांना नुकतीच अटक केली. हे हस्तिदंत ते तीन कोटी रुपयांना विकणार असल्याची माहिती या आरोपींनी पोलिस तपासात दिली.

यातील दोघे लष्करी जवान असून, ते या मेसमध्ये रखवालदार म्हणून काम पाहतात."मॅकेनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंट कोअर' (एम. आय. आर. सी.) येथील अधिकाऱ्यांच्या मेसमधील शोकेसची काच बाजूला करून हस्तीदंताची जोडी काढण्यात आली. त्या जागी "प्लॅस्टर ऑफ पॅरिस'चे हुबेहूब नकली हस्तिदंत ठेवण्यात आले होते. "प्लॅस्टर ऑफ पॅरिस'चे नकली हस्तिदंत अमरावती येथील ढोरे याने तयार केल्याचे पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी सांगितले.

या हस्तिदंताचे मोबाईलवरून फोटो काढण्यात आले होते. त्या फोटोंवरून ढोरे याने नकली हस्तिदंत तयार केले.

........
चौकट
शंभर वर्षांपूर्वीचे हस्तिदंत""चोरण्यात आलेली हस्तिदंताची जोडी शंभर वर्षांपूर्वीची असल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यांची लांबी प्रत्येकी 52 इंच असून, एकत्रित वजन 16 किलो 370 ग्रॅम आहे. या हस्तिदंताची अंदाजे किंमत 16 लाख रुपये आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या हस्तिदंताची किंमत दोन कोटी रुपये आहे,''

........
दोन दिवसांपूर्वीच वाघाच्या कातडीसह दोन आरोपींना पकडण्यात आले होते. त्या पार्श्‍वभूमीवर ही चोरीदेखील गंभीर स्वरूपाची आहे. वन्य प्राण्यांची शिकार करणे, त्यांच्या विविध अवयवांची तस्करी करणे हा गंभीर गुन्हा असतानाही, अशा प्रकारची कृत्य सर्रासपणे होतात. यावर आळा घालण्यासाठी सापडतील त्यांना कठोर शिक्षा दिली गेली पाहिजे.

1 comments:

  1. Unknown said...
     

    लष्करी अधिका-यांच्या मेसमधील १०० वर्षे सुखरूप असलेली हस्तिदंताची जोडी आजच्या काळातल्या पैशाच्या प्रलोभनामुळे लष्कराच्याच दोन जवानांनी चोरली हे वाचून वाईट वाटले व त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे.
    निदान यांनी हस्तिदंताकरता इतरांसारखे जिवंत हत्ती मारून हस्तिदंत चोरलेले नाहीत म्हणून त्यांचा गुन्हा इतका गंभीर नाही!
    हल्लीच्या भ्रष्टाचारामुळे,अतिशय खालावत चाललेल्या राजकारणामुळे व दहशतवाद्यांना शिक्षा देण्यात होणा-या अक्षम्य दिरंगाईमुळे लष्करात राहून देशाची सेवा करणा-या कांही जवानांची द्विधा मनस्थिती होत चालली आहे त्याचेच हेहि प्रतिक आहे!

Post a Comment