व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

ज्योती कायमचीच पुण्यात विलीन झाली...

"उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न घेऊन ज्योतिकुमारी पुण्यात आली होती. यशोशिखर गाठण्यासाठी पुण्यातील खुल्या, मुक्त आणि मैत्रीपूर्ण वातावरणात भरारी घेण्याचा प्रयत्न ती करत होती. पण तिचे हे स्वप्न साकार होऊ शकले नाही. आता ती कायमचीच पुण्यात विलीन झाली आहे. आयुष्यात कधीही कमी न होणारे दु:ख आमच्या वाट्याला आले आहे. दु:खाचा हा डोंगर पुन्हा कोणावरही कोसळणार नाही, एवढा बोध या घटनेतून सर्व यंत्रणांनी घ्यावा......त्यांचे डोळे उघडावेत, एवढीच अपेक्षा आणि विनंती...''

विप्रो कंपनीत असोसिएट म्हणून काम करणारी ज्योतिकुमारी चौधरी हिच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेऊन आज या भावना व्यक्त केल्या. तिचे आई-वडील पत्रकार परिषदेत आपल्या भावनांना मोकळी वाट करून देणार होते. मात्र भावना दाटून आल्याने ते पत्रकार परिषदेस उपस्थित राहू शकले नाहीत. ज्योतिकुमारीचा भाऊ सुमन, मेहुणा गौर सुंदर व त्यांचा भाऊ शिशिर पुंडलिक यांनी कुटुंबीयांच्या वतीने या भावना व्यक्त केल्या. ""स्वत:चे व कुटुंबाचे उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न साकारण्यासाठी ज्योती २००२ मध्ये पुण्यात आली होती. स. प. महाविद्यालयातून तिने पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर २००६ मध्ये ती विप्रो कंपनीच्या बीपीओ सेवेत असोसिएट म्हणून नोकरी करू लागली. पुणे तिचे "सेकंड होम' होते. यशाची भरारी तिला येथेच घ्यायची होती. मात्र हे स्वप्न भंगले. या घटनेनंतर सर्व पुणेकर, तसेच अनेक सामाजिक संघटना आमच्या पाठीशी उभ्या राहिल्या. त्यांचे आम्ही आभारी आहोत. ज्योतीच्या आत्म्याला शांती लाभावी, यासाठी सर्व पुणेकरांनी प्रार्थना करावी,'' अशा भावनाही त्यांनी या वेळी व्यक्त केल्या.

"विप्रो' कंपनीकडूनच सुरक्षाव्यवस्थेत ढिलाई
विप्रो बीपीओ कंपनीवर सुरक्षिततेत ढिलाई दाखविल्या प्रकरणी कायदेशीर कारवाई करणार काय, या प्रश्नाचे उत्तर देण्याचे ज्योतिकुमारीच्या कुटुंबीयांनी टाळले। ""या प्रकरणाचा तपास सुरू आहे। त्यामुळे आताच याबाबत काही बोलणे योग्य नाही। मात्र, कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची, विशेषत: महिलांच्या सुरक्षिततेची पुरेशी काळजी घेण्यात येत नसल्याचे उघड झाले आहे. सुरक्षाव्यवस्था अपूर्ण असून, त्यात खूप त्रुटी आहेत, हे यातून स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी कॉलसेंटरच्या गाड्यांच्या केलेल्या तपासणीतही अनेक चालकांकडे वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचे, तसेच अन्य गंभीर बाबी पुढे आल्या आहेत,'' असे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले.



कंपनीत जाताना ज्योती एकटीच गाडीत बसली, हे म्हणणे त्यांनी खोडून काढले। या गाडीत मागे आधीच एक जण कर्मचारीच बसला आहे, असा समज होईल, अशा पद्धतीने बसविण्यात आला होता असे त्यांनी सांगितले. गाडीत पुरुष कर्मचारी असल्याशिवाय महिला कर्मचाऱ्यांनी बसू नये, हा नियम अशा घटना रोखण्यासाठी पुरेसा नाही. अशा घटना होऊ नयेत, यासाठी गुन्हेगारांच्या मनात भीती निर्माण होईल, अशा यंत्रणेची सध्या गरज आहे, असे तिच्या कुटुंबीयांनी नमूद केले.

2 comments:

  1. Anonymous said...
     

    याच आधीच्या विषयावर जनतेकडून तब्बल ७२ कोमेंट करण्यात आले,पण त्यातल्या काहीत म्हणल्याप्रमाणे पुण्याच्या खासदार वा पालकमंत्र्याकडून कुठलीहि प्रतिक्रीया व्यक्त करण्यात आली नाही!दिल्लीत रहातो म्हणून माहिती नाही असे खासदार सहाजिकच म्हणणार पण हेच महाभाग सतत आपल्या पक्षकार्यकर्त्यांशी निवडणूकीच्या काळात संपर्क ठेवून होते,फ़क्त यावेळी त्यानी सोयीस्करपणे त्या सर्वाना ताकीद दिली असणार की कुठलिही प्रतिक्रिया वादळ शमेपर्यंत व्यक्त करायची नाही!
    तसेच पालकमंत्र्याच्या बाबतीत झाले.एरवी कायम बडबड करणारे हे महाभागपण अवाक झाले व त्यांच्या तोंडून 'ब्र'हि निघाला नाही!
    सर्वानी यांना सोडून आपला रोख व राग 'विप्रो' कंपनीवरच काढला व यांना मोकळे सोडले कारण 'public memory is short'!!!
    पण हे लोक निर्लज्ज व नालायकच आहेत व रहाणार!यांना लाथा बसायला पाहिजेत!

  2. Anonymous said...
     

    very true. hya maad...T politicians cha burkha saamna aani sinhaasan nae kaadhich faadlay. taech ajun chaalu aahe ajun kaai.

Post a Comment