व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

लवकरच पुण्यातील 15 रस्त्यांवर "पे अँड पार्क'

कंत्राटदारांचा प्रतिसाद न मिळाल्याने रखडलेल्या पुण्यातील 15 रस्त्यांवरील चारचाकीसाठीच्या "पे अँड पार्क' योजनेला तुर्तास तरी हिरवा कंदील मिळाल्याचे दिसते आहे। कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळाल्याने ही योजना सुरू होण्याच्या मार्गातील अडथळे दूर झाले आहेत.

येत्या मंगळवारी होणाऱ्या समितीच्या बैठकीत त्यावर चर्चा होणार असून, दिवाळीच्या सुमारास सुरू होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे। पुण्यातील अनेक रस्ते कायमच गर्दीने गजबजलेले असल्याने वाहनतळ ही तेथील गरज बनली आहे। वाहनतळ उपलब्ध करून न देता "नो पार्किंग'चे मोठमोठाले "बोर्ड' लावायचे, आणि कोठेही वाहन लावल्याच्या सबबीवरून वाहनचालकांवर कारवाई करायची॥,अशाप्रकारे वाहतूक व्यवस्थेचे काम सुरू आहे.

या व्यवस्थेला कंटाळलेल्या वाहनधारकांनी भाडे भरून वाहन "पार्क करण्याची तयारी दर्शविली आहे. अशा अवस्थेत दिवाळीत ही योजना प्रत्यक्षात आल्यास, पुणेकरांना "पे अँड पार्क'च्या रुपाने फराळाचा खरा आस्वाद घेता येईल...तुम्हाला काय वाटते या विषयी? प्रतितास पाच रुपये भाडे परवडणारे आहे का?? आपल्या प्रतिक्रिया जरुर नोंदवा..

1 comments:

 1. captsubh said...
   

  अपरिहार्य परिस्थितीमुळे 'पे अँड पार्क' योजना राबविण्याची काळाची गरज जर खाली लिहिलेल्या अटी मान्य असतील तरच जनतेला मान्य असतील.
  १]दर ताशी ५ रुपये मोजायला लावणे पूर्णपणे अयोग्य व अमान्य आहे.
  दर ३ तासांना ५ रुपये ठीक वाटतात कारण कुठल्याहि खरेदी वा इतर कामासाठी गेलेली व्यक्ती १ तासात घाईघाईने वाहनापर्यंत येउ शकणार नाहीं किंवा तसे करायला शरीर व मनाची कसरत करावी लागेल.
  येवढे करूनहि ३-४ मिनिटांनी १ तास उलटून गेला की आणखी ५ रुपये मोजायला लागणार व त्यावरून हमखास निष्कारण वादविवाद होणार.
  २]'पे अँड पार्क' योजना राबवल्यावर ती सरकारी,पोलिस व मंत्र्यांच्या लाल दिव्याच्या गाड्यांनापण सक्तीची करावी!
  यांच्या लाल फ़ितीच्या दुर्लक्षी कारभारामुळेच आजची परिस्थिती निर्माण झाली आहे व आजहि यांच्या गाड्या निर्लज्यपणे no parking च्या लक्ष्मी व इतर रस्त्यांवर मनमानीपणे उभ्या दिसतात!
  ३]ही योजना राबविल्यावर कमी वाहने पार्क होतील ही अपेक्षा आहे पण तसे १ वर्षाच्या ठराविक काळात न झाल्यास ती रद्द करावी.
  ४]तसेच या काळात गोळा केलेले पैसे त्या त्या परिसरातील रस्ते,पदपथ,दुभाजक,सुरक्षा कठडे यांच्या सुधारणेसाठीच कारणी लावावे कारण सरकारी/म्युनिसिपालिटीच्या अजस्त्र अजगरांना फ़क्त पैसे गिळायची व कोणी जाब विचारल्यास विनम्रपणे उत्तर देणे सोडाच तर फ़क्त गरळ ओकायची संवय लागली आहे!
  ५]जमा झालेल्या सर्व पैशांचा व त्यांचा कसा विनीयोग केला याचा हिशोब प्रत्येक भागात दर तीन महिन्यानी लिहावा तसेच वर्तमानपत्रात छापावा!
  सुभाष भाटे

Post a Comment