व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

गणेश मंडळे खड्ड्यांसाठी पैसे देणार नाहीत...

महापालिकेने मंडपासाठी रस्ते खोदणाऱ्या मंडळांकडून प्रत्येक खड्ड्यामागे दोनशे रुपये घेण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाला सगळ्या मंडळांनी विरोध केला आहे. आमच्याऐवजी नगरसेवकांनी त्यांच्या वॉर्डस्तरीय निधीतून पैसे द्यावेत, असं मंडळांचं म्हणणं आहे. नगरसेवकांनी न दिल्यास आम्ही "भीक मागून' पैसे देऊ, असंही मंडळांनी म्हटलंय.

या निमित्तानं मंडप आणि खड्डे हा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. गल्लोगल्ली असलेले मंडप, एकाच गल्लीत दोन-तीन मंडळे, त्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी या प्रश्‍नांवरही या निमित्तानं चर्चा व्हायला हवी. गणेशोत्सव हवाच; पण आपल्या आनंदात इतर कोणाची गैरसोय होणार नाही, याचं भान ठेवायलाच हवं. या साऱ्याविषयीचं विचारमंथन ही आजची गरज आहे. या विचार मंथनातून निघणारे निष्कर्ष किमान पुढच्या वर्षी तरी उपयोगात आणता येतील. तुम्हाला काय वाटतं?

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्‍लिक करा.

9 comments:

  1. Anonymous said...
     

    he asa honar hotach...tyat navin kahihi nahi. karan mulat PMC la satat ani pratekveli ushirach jaag aleli ahe....jaudet. Punya madhe eka galli madhe 3 aashi barich ganapati mandala ahet...pan he ganapati mandala kadhihi public cha vichar karat nahit...aardhya peksha jasta rastyavar mandav asato...mazya mate ya madhe charcha karanya sarakha kahihi nahi...etake varsha hech chalat ale ahe...pan konihi pudhakar ghet nahi...atta SAKAL vale ajun thode diwasanni ejun ek mahatvacha prashna kartil...VISARJAN MIRAVANUK...apan apala vichar mandaicha ani satat vichar mandat rahaicha dusara kahihi karu shakat nahi...

  2. Unknown said...
     

    हल्ली महापालिका या ना त्या मार्गाने सर्वसामान्य लोकांकडून पैसे उकळ्ण्याचे मार्ग शोधत असते. कोणत्या बाबींसाठी जनतेकडे पैसे मागावे आणि किती मागावे यासाठी काही निकष आहेत की नाही?
    प्रश्न कोणताही असो, त्याचा मुळापासून विचार करून बरोबर उत्तरे शोधण्याऐवजी दंड करणे हाच अधिकाऱ्य़ांचा आवडता मार्ग बनला आहे. त्यामुळे त्यांचा दुहेरी फ़ायदा होतो. चरायला आयते कुरण तर मिळतेच पण आपण काहीतरी हालचाल करित आहोत हेसुद्धा जनतेला दाखवता येते. पाण्याचा अतिरिक्त वापर केल्यास जबरी दंड आकारण्याचा निर्णय आपल्याला माहित आहेच. मनात येईल तेवढा दंड आकारण्याची परवानगी यांना कायद्याने दिली आहे का?
    आता या ठिकाणीसुद्धा २०० रु./खड्डा दंड करुन हा प्रश्न सुटणार आहे का? हजारो रुपये वर्गणी गोळा करणाऱ्या मोठ्या मंडळांना हा दंड जास्त वाटणार आहे का? छोटी मंडळेही 'भीक मागून' दंड भरतीलच. मुळात पालिकेचा हा निर्णयच चुकीचा आहे. या निर्णयाचा सरळ सरळ अर्थ असा आहे की दंड भरलात की तुम्हाला पालिकेकडून हवे तेवढे खड्डे करण्याची परवानगी आहे.
    माझ्या मते खालील गोष्टी उपायोगी ठरु शकतील.
    १) आपल्या मंडळाची पालिकेकडे नोंदणी करणे सक्तीचे करणे.
    २) पालिकेने गल्लोगल्ली मंडपाच्या आकारावर आणि संख्येवर उपलब्ध जागेनुसार बंधने टाकणे.
    ३) प्रत्येक मंडळाने गणेशोत्सवाच्या किमान ३ आठवडे आधी आपल्या मंडपाचा आराखडा पालिकेला सादर करुन त्याची परवानगी घेणे.
    ४) पालिकेने गणेशोत्सवाच्या किमान एक आठवडा आधी मंडपांची प्रत्यक्ष पाहणी करणे, बदल सुचवणे.
    ५)सर्व मंडळांनी गणेशोत्सव संपल्यानंतर लगेचच सगळ्या जागा पूर्ववत मोकळ्या करुन सर्व खड्डे बुजवणे.
    ६) पालिकेने गणेशोत्सव संपल्यानंतर एक आठवड्याच्या आत सर्व नोंदणीकृत मंडळांत जाऊन सगळे खड्डे बुजवल्याची खात्री करणे किंवा दंड आकारणे.

  3. Anonymous said...
     

    You guys are funny. Kashala ugach vel ghalavata?
    Ghan karane hich tar aapali sanskruti aahe. Khadda aso kinva rastyavar thunkane aso.

  4. Anonymous said...
     

    Chor sodun Sannysala Shiksha , asech aahe PMC che vagane.
    Khadyansaathi mandalanna dand kartat, Pan je vyapari rastya-madhe lokhandi Jali taktat, tyanna abhay dile jaate. Khare mhanje PMC ne pratham hya jali taknarya loknavr karvahi karun dakhvavi.

    Mr. Pardeshi he kharya arthane "Foreigner" aahet. Tyanche Punyacha Maatishi kaahich naate nahi. Tyanche doke fakt , PMC chya tijorit Paise gola karanyasathich chalate. Dusre tyanna kaahi suchat nahi.

    Bahutek PMC che Adhikari Maha-Chor Aahet. Te Fakt samanya garib lokanna pilun paise vasul kartat.
    Aaj (14sep-2007) Ruby Hall chi Baatmi vacha. Ruby hall pahije tevdhe niyam modate, pan tyanche kahich bighadat naahi. Ruby ne 2.74 crore rupaye danda bharnya evaji fakt 6 Lakhs dand bharala. Mahanje PMC cha ghata jhala 2.68 crores. Itke mothe PMC che nuksaan jhale , tyala Jabbadar aahet PMC che Maha-Chor Adhikari. Dandachi rakkam itki kami karnyasaathi Ya choranni Kiti Rakkam ghetali he tyanche tyannach thauk.

  5. Anonymous said...
     

    I don't know what the other 4 people above me have written about, but it seems wrong.

    If PMC is making any rules against digging the roads, it's their effort for doing something good.
    In this case, they are trying there should be less digging of roads.
    And because this festival is sentimental issue in public, they have to handle it carefully.

    Finally, if there is rule, every Ganesh Mandal MUST FOLLOW IT. IF they are not doing that, there should be a FINE of Rs. 1000 / Digging.

  6. Anonymous said...
     

    pan tyapeksha ek ward ek ganpati ase ka nahi karat..
    ugach hi mandale lokana "vargani" magun tras det astat..

  7. Anonymous said...
     

    I am the anonymous, who wrote the
    comment on.
    "September 14, 2007 12:02 PM"

    I request the moderator to delete
    these comments.

    I request all the stakeholders in this comment to forgive me for writing this comment. I express my sincere apologies.

    Actually I was upset over some other matter and I have taken out my frustration by writing on this blog.

    Now I have realized that, I was wrong. What I wrote was un-intetional. I do not want to raise any allegations against any one.
    ( From PMC or the readers site)


    I have no intention to hurt any-one directly or indirectly.

    Once Again request all the stakeholders to forgive me.

    Thank you,

    Anonymous

  8. Anonymous said...
     

    Hi Abhijit Thite ,

    Please delete / remove my comments which I have posted on

    "September 14, 2007 12:02 PM"

    I am the anonymous, who wrote the
    comment on.

    I once request the moderator to delete these comments, of

    "September 14, 2007 12:02 PM"

    Thanks

  9. Anonymous said...
     

    today (19.9.07 pmc announce rs 500/- fine for erecting welcome banners without permission. banners will be there for more than 12-15 days. on same road if we park our two wheeler for few minutes or say hr. RTO collect more than rs 100/- in the name of festival PMC is cheating us, there is no declared record about how much fine collected and there names. a media sting operation is very much reuired

Post a Comment