व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

सावधान!

रविवारी पहाटे सिंहगड रोडवर एका काष्ठशिल्पकाराला (राहुल लोंढे) काही जणांनी लुबाडले. पहाटे चार वाजता रिक्षाची वाट पाहात असताना त्यांना काही जणांनी जीपमध्ये लिफ्ट दिली. नंतर त्यांचे हातपाय बांधून, डोळ्यावर पट्टी बांधून मारहाण केली, आणि जवळचे पैसे लुबाडले.

आजकाल असे गुन्हे वारंवार घडत आहेत. पूर्वी रात्री उशिरा किंवा पहाटे एकट्याने हिंडले, तरी काहीही होत नाही, अशी आपल्या पुण्याची ख्याती होती. ती हळूहळू संपत चालली आहे. काहीवेळा दिवसाढवळ्याही लुबाडल्याच्या घटना घडतात. एकट्याने फिरताना काळजी घ्यायलाच हवी. आता लोंढे यांनी जीपमध्ये बसायलाच नको होते, असा सूर येईल; पण ते जीपमध्ये बसले नसते तरी लुबाडणाऱ्यांनी लुबाडले असतेच ना?

या घटनेतून आपण काही शिकायला हवे. अपरात्री किंवा पहाटे पहाटे बाहेर जाणे गरजेचे असेल, तर काळजी घ्यायला हवी. आपल्यावरही असा प्रसंग आला, तर त्याचा सामना करायचा तरी कसा? यावर काही उपाय आहे का? अशावेळी आपण हळहळण्याशिवाय काहीच करायचे नाही का? यावर काही उपाय किंवा एकटे फिरताना घ्यायच्या काळजीसंबंधी काही टिप्स आहेत का?

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्‍लिक करा.

4 comments:

  1. Anonymous said...
     

    It is not easy to avoid such instances. However one should be careful to avoid taking and giving lifts from / to unknown persons. If travelling at odd hours it is better to use public transport.

  2. Anonymous said...
     

    mazya mate pratekani kalaji ghyayala pahije. Ani jar ka pahate kinva ratri ushira kuthe jayache asel tar ekhadi taxi book karavi. Pan shakyato unolkhi manasa kadun lift ghevu naye.

  3. Anonymous said...
     

    आजकाल सगळीकडे चोरांचा सुळसुळाट झालेला दिसतोय. अर्थव्यवस्थेच्या वाढत्या वेगाशी बरोबरी करण्यास बाकी क्षेत्रे असमर्थ ठरत आहेत. पोलिस यंत्रणा कमी पडत आहे हे खरे. पण बहुतेक वेळा पोलिसच चोरीच्या तक्रारीची गहाळ झाले म्हणून नोंद करायचा ’सल्ला’ देतात. अशाने चोरांना मोकाट रान मिळते. हल्ली चोर फारच धीट झाले आहेत कारण चोरीचा गुन्हा ना पोलिस गंभीरपणे घेत ना प्रसारमाध्यमे त्यांचा पाठपुरावा करीत. अर्थव्यवस्था खेळती रहावी यासाठी अर्थ मंत्रालयाने गृह मंत्रालयाला आदेश तर दिले नसावेत ना अशी शंका यावी अशीच परिस्तिथी आहे. अशा परिस्तिथीत आपल्या सुरक्षेची काळजी आपल्यालाच करावी लागणार आहे.

  4. maazisena said...
     

    २१ व्या शतकात जर बिळात हात घातला तर चावणारना!!!! हि आहे आजची परिस्थिती !!!!
    पुर्वि आपण ओळ्खायचो कि हे बिळ कुणाचे आहे ते बिळ कोणाचे आहे. आपल्याला शाळेतच कळायचे कि हे बिळ आहे सापाचे, हे आहे मुंगिचे, हे आहे खेकड्याचे, हे आहे पाखरांचे, हे आहे उंदराचे इ. हे सगळे पशु आहेत आपल्याला घाबरणारे.त्यामुळे सहसा त्यांचा धोका जास्त नव्हता. पण आज काय परिस्थिती आहे, काहि सांगता येत नाहि कि कोण कोणाच्या बिळात लपुन बसलयं.त्या मुळे बिळात हात घालणे म्हणजे जिवाला धोक्यात घालण्यासारखे आहे.
    त्याचप्रमाणे आज या भुतलावर इतकी बिळे पडली आहेत कि कोणत्या बिळातुन काय निघेल आणि आपल्या जिवावर येइल.त्यामुळे पुन्हा ज्या गोष्टी आपल्याला लहानपणी आइ-वडीलांनी सांगितलेल्या असतात की, अनोळखी माणसांनी दिलेल काही घेउ नये, फ़ुकट काही घेऊ नये. इत्यादी. गोष्टी करु नयेत. पण आपण मोठे झालो तरी त्या गोष्टी करतो आणी त्याचे परिणाम भोगतो. म्हणुन लहान सहान गोष्टी विसरु नयेत.
    दुसरे हे ध्यानात घ्यावे कि सतत पोलिसांना किती त्रास द्यायचा.ते आपले रक्षक आहेत त्यामुळे लहान गोष्टी जर आपण काळ्जीपुर्वक केल्या तर असे खुप अपघात/लुटमार टाळु शकतो.(पहिल्यांदा कोर्टाची पायरी चढायला आपण घाबरायचो आणि आजहि घाबरतो, पण आज पोलिसांची पायरी चढायला नकोशी वाटायला लागली आहे.)
    ह्या हजारो बिळांनी पोखरलेल्या भुमिला केवळ आपणच वाचवु शकतो.त्यासाठी आपल्यालाच लढायला लागणार आहे.६० वर्षाच्या स्वातंत्र्यानंतरही माणुस सुरक्षित नाही, हि खरचं खेदजनक बाब आहे.केंद्र आणि राज्य शासन केवळ विकासाच्या मागे लागले आहेत. त्यांना "COMMON MAN" ची काळजी नाही.त्यामुळे त्यांना जागे करायलाच पाहिजे.
    !! मुक्त स्वराज्य हिच आमची इच्छा !!

Post a Comment