व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

उड्डाणपूल झाला, आता पुढे काय?

होईल, होईल म्हणता म्हणता गणेशखिंड रस्त्यावरचा शेवटचाही उड्डाणपूल तयार झाला. गेले दीड वर्षे शिव्या देत देत या रस्त्या(?)वरून जाणाऱ्यांनी अखेर हुश्‍श केलं. आता या रस्त्यावर किमान गर्दी तरी होत नाही. पण जे रोज या (उड्डाणपुलाच्या खालच्या) रस्त्याचा वापर करत आहेत, त्यांच्या समस्या मात्र संपलेल्या नाहीत.


अगदी कृषी महाविद्यालय चौकापासूनच सुरूवात करू. या टप्प्यात कृषी महाविद्यालयाच्या बाजूला जो रस्ता सोडला आहे, तो अतिशय अरुंद आहे. ई-स्क्वेअरपासून पुढे मोठ्या रस्त्याने येणाऱ्या वाहनचालकांना पुढे अचानक चिंचोळ्या खिंडीतून गेल्याचा भास होतो. हीच अवस्था उर्वरित दोन टप्प्यांमध्येही कमी अधिक प्रमाणात आहे. विद्यापीठ चौकात जाणाऱ्या उड्डाणपुलावरून दोन्ही बाजूंना पाहिले, की रस्त्यांच्या रुंदीतला हा फरक चटकन लक्षात येतो. (इमारतींच्या भिंती उड्डाणपुलाला टेकल्यासारख्या वाटतात काही ठिकाणी!)
या टप्प्यात औंधकडे जाणाऱ्या रस्त्याचा टप्पा अरुंद तर आहेच, शिवाय त्या टप्प्यात खालच्या रस्त्याची अनेक कामेही अद्याप केली गेलेली नाही. रस्त्याच्या कडेला राडारोडा तसाच आहे. इथे असलेला बस थांबा आणि रस्ता यांच्यामध्ये चक्क खणून ठेवलेले आहे. बहुधा एखादी सर्व्हिस लाइन टाकण्याचे काम शिल्लक असावे. त्यामुळे बससाठी प्रवाशांना रस्त्यावरच उभे राहावे लागते. शासकीय तंत्रनिकेतनच्या बाहेरील टप्पा तर कमालीचा अरुंद असल्याचे दिसते.
याउलट समोरचा म्हणजे विद्यापीठाकडून शिवाजीनगरकडे येणाऱ्या रस्त्याचा टप्पा कितीतरी रुंद आहे. पुढे तो ई-स्वेअरच्या टप्प्यात पुन्हा अरुंद होतो. या टप्प्यातली आणखी एक समस्या आहेच. रेंज हिल्सकडून ज्यांना मॉडेल कॉलनीत जायचे आहे, त्यांनी वास्तविक पाहता डावीकडे वळून ई-स्क्वेअरच्या पुढच्या चौकातून उजवीकडे वळणे अपेक्षित आहे. पण पळापळीच्या या जीवनात एवढा वेळ कुणाकडे आहे? त्यामुळे हे वाहनचालक सरळ रस्ता ओलांडून समोरच्या बाजूला येतात आणि मग चक्क उलट्या दिशेने जाऊन पुढे ई-स्क्वेअर समोरच्या गल्लीत वळतात. त्यामुळे समोरच्या बाजूने येणाऱ्या वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडते. ई-स्क्वेअरच्या समोर असलेल्या पेट्रोल पंपाच्या समोर रस्ता काहीसा रुंद असला तरीही तो अरुंदच असल्याचे भासते. याला कारण ई-स्क्वेअरमध्ये येणारे प्रवासी मिळविण्यासाठी तेथे उभ्या राहणाऱ्या रिक्षा व अन्य वाहनेही तिथे असतात.
पुणेकरांकडून होणारी ओरड पाहून उड्डाणपुलाचे काम जलद गतीने (?) संपविण्यात आले. त्यामुळे साहजिकच पुलाच्या खाली करायची कामे अद्याप झालेली नाहीत. त्या कामांसाठी येणारे ट्रक, जेसीबी यांची वर्दळ या रस्त्यावर अजूनही काही काळ सुरूच राहणार आहे. त्यामुळे उड्डाणपुलाचा वापर करणाऱ्यांना इथला प्रवास सुखाचा वाटला तरीही खालच्या रस्त्याचा वापर करणाऱ्यांसाठी ती परिस्थिती नाही, हे लक्षात घ्यायला हवे.

5 comments:

  1. abhinav said...
     

    उड्डाण पुल, गगनचुंबी इमारती, मल्टीप्लेक्स , मॉल्स यांनी ापले जीवन व्यापण्यास सुरूवात केलेली आहे. फक्त आपल्याला अद्याप या नव्या संस्कृतीशी जमवून घेता आलेले नाही. उड्डाण पूल ही सुविधा आहे. वाहतूक व्यवस्थित राहण्यासाठी सुविधांबरोबरच शिस्तीची जोड लागते. ती जर नसेल तर सवर् काही उपलब्ध होइल आणि ऑपरेशन सस्केसफुल बट पेशंट डेड अशीच अवस्था राहील. उड्डाणपूलाच्या कामाची पूतर्ता म्हणजे सवर् जोड रस्ते उत्तम होणे, पुलाखालील जागेचा नेमका वापर काय करायचा याचा निणर्य होउन त्याची अंमलबजावणी होणे.पुण्यातील हा पहीला मोठा उड्डाणपूल आहे. त्याचा वापर आपण जेवढ्या सूज्ञपणाने करू , तोच पायंडा पडणार आहे. वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांनी या संदभार्त केलेल्या सूचना भावी काळासाठी उपयुक्त ठरू शकतात.

  2. Vishal Khapre said...
     

    Abhijit,
    I read you blog very often. Amazing though, there are very few people who write these things, most of the bloggers write about Kavita, Katha and etc.

    So keep it up!! you are good at it!!

  3. Anonymous said...
     

    pach minutachya antarala jar ardha tas lagnar asel tar aamhi vahtukiche niyam ka palavet? sandhi milali tar jarur signal todavet.

  4. Anonymous said...
     

    karan ki changlya kaamachi suruvat swataha pasun karawi... jar saglech asa mhanale tar vahatuk police hi kahi karu shaknar naahit aaani lokanna beshista vahtukiche parinaam nahak bhogatach rahawe lagel...

  5. Anonymous said...
     

    Anonymous of July 29, 2007 7:17 PM,

    Just remember this: You get what you deserve. So if you are getting the muddy and narrow roads, it is because, SHIT, you deserve them.

Post a Comment