व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

वैश्‍विक तापमानवाढ आणि पुणे पोलीस !

वैश्‍विक तापमानवाढ रोखण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांत पुणे शहर पोलिसही आता सहभागी होत आहेत. यंदाचा पावसाळा संपण्यापूर्वी शहरात २५ हजार झाडे लावण्याचा संकल्प पोलिसांनी केलाय. त्यासाठी शहरातल्या सगळ्या पोलिस ठाण्यांना सध्या रोपांचं वाटप करण्यात येत आहे.

या मोहिमेनुसार शहरातल्या सर्व पोलिस ठाण्यांत, तसेच पोलिसांच्या ताब्यात असलेले भूखंड, कार्यालये यांच्या आवारात वृक्षारोपण होईल. त्यात आंबा, पिंपळ, वड, नारळ, चिकू, लिंबू याबरोबरच मोहगुणी, सिल्व्हर ओक, जाक्रंड, गुलमोहर, शिलू आदी झाडे लावण्यात येतील. सध्या प्रत्येक पोलिस ठाण्याला प्रत्येकी १५०-२०० रोपं देण्यात येत आहेत. ती त्यांनी त्यांच्या आवारात किंवा परिसरात लावणं अपेक्षित आहेत, त्यासाठी पाठपुरावाही होणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त जयंत उमराणीकर यांनी दिलीय.

पुणे पोलिसांचा हा उपक्रम नक्कीच अभिनंदनीय आहे. पण, त्याहीपेक्षा पुण्यातली वाहतूक धडपणे धावण्यानं, रस्त्यांची धुराडी बनण्यापासून थांबवण्यानंही वैश्‍विक तापमानवाढ रोखण्यात मदत होणार नाही का...?

9 comments:

 1. Neo said...
   

  I think we all know what such Tamasha tactics mean. Those trees will be planted, yes, but later there will not be any care. In all probability, they will die out. If they grow, the migrants to this city will chop it off for fuel. Who cares about Global Warming anyway? Most probably there is some fund released for purchasing the plants and there must be corruption in it. Do you think the people who are there to "eat" would get involved in some useful activity? I have seen the world for enough number of years to know that this is one more stunt by the useless department.

 2. Sulabha Bhide said...
   

  zade lavayala harakat nahee ( tyanchee kalajee ghetalee janar asel tar ..) pan petrol madhe rokel ghaloon prachand dhoor sodat dhavanarya riksha ,karkashsha aavaj karat janare trucks aanee PMT buses ( noise polution ) yana police nee aala ghalava .Ase tyanchya peshala dharoon kelele pradooshan rokhanyache prayatna karavet

 3. Neo said...
   

  A suggestion. Police can plant the trees and then give the responsibility of watering and taking care of them to the nearby housing societies.
  Another point. Why were all the trees on major pune roads chopped down if the authorities realize that trees are so important? All major roads in city now look because many big trees were chopped down either to expand the road or to lay down pipes or telephone lines or electricity lines etc. It is a myth that the solution for handling large traffic is road-widening. (Such widening in fact makes it difficult for people to cross road. See the road to pimpri-chinchwad for example. Apart from that, Indians especially puneiites and moreover, pimpri-chinchwadkars, obviously do not have habit/culture/ethics of walking on a road in a right direction. Lot of these creatures use wrong direction and face an oncoming traffic to save petrol).

 4. sadhana said...
   

  Ekdam chan upakram ahe !Tasech apali vahane share karnaryana badhava dila pahije ani public transport fast zhala pahije mhanje road varcha dhur jaratari kami hoil.

 5. captsubh said...
   

  पुण्याच्या नवीन पोलिस आयुक्तांनी फ़र्माविलेला पोलिसांनी झाडे लावण्याचा उपक्रम स्तुत्य आहे व त्याचे आपण/जनतेने स्वागत केलेच पाहिजे!फ़ुल नाही तर फ़ुलाची पाकळी एवढा फ़ायदा जरूर होइल त्या रोपांची झाडे झाल्यावर!
  पण त्याचवेळी आपल्या देशांत पेट्रोलमध्ये डिझेल व डिझेलमध्ये केरोसिन मिसळलेले भेसळीचे इंधन सर्रास विकले जात आहे असे पोलिसांसकट सर्वांना माहित असूनहि अशा बेकायदेशीर व अतिहानीकारक प्रवृत्तीना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कायदेशीर कारवाई होतांना दिसत नाही!बहुतेक ट्रकस व बसेस प्रचंड धूर सोडत जाताना दिसतात,लहान वाहनांतील धूर/काजळी एवढी दिसत नसली तरी ती आपण घराच्या बाहेर पावूल ठेवली की अनुभवत आहोतच.भर वस्त्यांतल्या कुठल्याहि इमारतींच्या छतांकडे लक्ष गेल्यास काजळीचा मोठा थर दिसतो व याला नव्या रंगविलेल्या इमारतीपण अपवाद नसतात.
  मधून मधून कांही व्यक्तींना असे भेसळीचे धंदे करतांना red handed पकडल्याच्या बातम्या/फ़ोटो प्रसिद्ध होतात, पण पुढे काहीच होत नाही कारण मोठ्या तेल कंपन्यांचे अधिकारीपण अशा भेसळीत सहभागी असतात व हा धंदा कित्येक हजारो कोटींचा असतो.
  एकीकडे नवीन गाड्यांना EURO II or III pollution control norms लागू केले जातात,कोप-याकोप-यावर गाड्यांचे pollution तपासणारी यंत्रे असलेली वाहने उभी असतात,बहुतेक लोक दंडाच्या भितीने वेळोवेळी ते तपासून घेतात, पण इंधनातील भेसळीमुळे मोठ्या प्रमाणावर हवेचे प्रदुषण सतत चालू असते.
  माझी नव्या आयुक्तांना अशी विनंती आहे की त्यांनी या बाबीतही ताबडतोब व कायमचे लक्ष घालावे कारण वैश्‍विक तापमानवाढ रोखण्यात यामुळेच खुप जास्त प्रमाणात यश मिळेल व फ़ुले हाती लागून नुसत्या पाकळ्यांवर समाधान मानावे लागणार नाही.
  सुभाष भाटे

 6. sadhana said...
   

  Jar Prithvi vachli tarach apan vachnar ahot ! mhanun manashi 1 zhd lavayla have karan tichi prdushan sahan karnyachi shakti ata fakta 10 vareshech ahe ,nantar sarva paristhiti atokya baher jail he eka vaidnyanikache mhanane ahe,reserch karun.He fakta polisanche kam nahi tar pratyek vyaktiche ahe.

 7. Yogeshwar said...
   

  mudda ha ahe ki jagaat konihi kaahitari chaangla karat asel tar tyana samarthan dya.. ugaach polisaanchya bakichya dhandyaan-kade bote naka daakhvu. nahitar je thodephar changle honar hote, tehi koni karnaar nahi. kadhi samajnaar tumha punekaraannaa, konich na jaane.

 8. Amit Golwalkar said...
   

  पुणे पोलिसांचा उपक्रम स्तुत्य आहे. त्याचे स्वागतच केलं पाहिजे. पोलिस कामे का करीत नाहीत, हे समजून घेण्यासाठी प्रत्येक सुज्ञ नागरिकाने मुंबई पोलिस कायदा वाचावा (बाबा आदमच्या जमान्यातला). म्हणजे समजेल. पोलिसांच्या सामाजिक जाणीवा जाग्या करण्यासाठी वृक्षारोपणासारखे उपक्रम जरूर राबवले जावेत.

 9. Anonymous said...
   

  Policani jar dar mahinyatil fakta 1 diwas paise na khanyacha upakram hati ghetala tar jaasta bare hoil, kase aahe zade bide lavane he policani karoo naye, tya sathi paryavar vadi aahet, policani aaple aaple kaam nit karave.

  Tyani jar mahinyat 1 diwas na khata (paise ho) aani aasach 1 diwas gunda aani politicians che seva na karnyache jar vrat ghetale tar to ek anokha upakram mhanoon prasidhi milvel. 3 kalmi upakram...(Pratidnya)
  Mi Mahinyatoon 1 diwas
  1. Paise Khanaar nahi
  2. Gundachi Madat Karnaar Nahi
  3. 1 diwasachi varkamai denagi dein zade kharedi karnya sathi

  Maag bagha zade lavayala jamin kami padate ki nahi te.

Post a Comment