व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

शिक्षकांचंही जरा कौतुक करा...!

शिक्षक नीट शिकवत नाहीत...शिक्षकांवर इतर कामांचं ओझं फार वाढलंय...या आणि अशा चर्चा आपल्याकडं नेहमी सुरू असतात. आपली शिक्षण पद्धतीच मुळी चुकीची, या निष्कर्षापर्यंत येऊन ही चर्चा बहुतेक वेळा थांबते. शिक्षक हा पेशा कधी कधी हेटाळणीचा विषयही बनतो. अशा परिस्थितीत पुण्याच्या राधा योगेश केतकर यांचं लख्ख यश प्रयोगशील शिक्षकांना हुरूप देणारं आहे...

केतकर यांनी अमेरिकेतील अवकाश संशोधन केंद्राच्या (नासा) "यूएस स्पेस ऍन्ड रॉकेट सेंटर' या शिक्षण शाखेतील सहा दिवसांचे प्रशिक्षण नुकतंच पूर्ण केलं. या प्रशिक्षणासाठी वर्षातून दोन तुकड्यांमध्ये जगभरातून शिक्षकांची निवड केली जाते. "हनिवेल कार्पोरेशन'च्या पुढाकाराने झालेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी भारतातील पाच शिक्षकांची निवड झाली होती. त्यात पुण्याच्या "डी. ई. एस. इंग्लिश मीडियम स्कूल'मधील केतकर यांचा समावेश होता.

अशा शिक्षकांचं कौतुक करण्यानंच त्यांच्यासारख्या इतर शिक्षकांना हुरूप मिळेल...त्याचा परिणाम अर्थातच एकूण शिक्षण व्यवस्था सुधारण्यावर होईल...नाही का ?

(ई सकाळवरील सविस्तर बातमी वाचण्याठी इथे क्लिक करा)

3 comments:

 1. Anonymous said...
   

  keval shikavanyachee aavad aahe mhanoon shikshak honarya Ketakaranche karave tevadhe kuotuk kameech aahe . Nahee tar Aajkaal bakee kuthe naukaree nahee milalee tar zale shikashak ase vatave .... ashya darjache shikashak jast asatat ( shikashanacha darja ghasaranyache ek karan?)Ketakaranche abhinanadan!
  Sulabha Bhide

 2. rajabhau said...
   

  congratulations. this is really a remarkable achievment. This will give lot of encouragement to other teachers.

 3. captsubh said...
   

  पुण्याच्या राधा केतकरांचे कौतुक करावे तेवढे कमीच कारण शिक्षकाच्या अवघड पेशातून त्यांनी हे साकार केले.हा पेशा पुर्वीपासून अत्यंत noble profession म्हणून ओळखला जातो व त्यामानाने त्यात वेतन फ़ार कमीच असते[प्रायव्हेट क्लासेसचे शिक्षकांचा अपवाद सोडून!!!]
  पण केतकरांसारखेच गुणवान आणखी असंख्य पण उपेक्षित शिक्षक शाळांत वावरताहेत याची जाणिव सर्वांना हवी व त्यांना पण प्रोत्साहन जरूर द्यावे असे माझे मत आहे.
  सरकार जर शिक्षणसंस्थेत ढवळाढवळ कमी करेल व त्यांना योग्य वेतन देइल तर त्याचे समाजाला व विद्यार्थ्यांना खूप फ़ायदे होतील.
  राजकीय शिक्षणसम्राट आपल्या प्रायव्हेट संस्था अफ़ाट फ़ायद्यात चालवितात पण त्यांचे इतर संस्थांकडे बिल्कूल लक्ष नसते हि खेदाची पण सत्य गोष्ट आहे!
  जनतेची खरी सेवा करणा-या शिक्षकांना अत्यंत मानसन्मानानेच वागवावे असे मला मनापासून वाटते!
  सुभाष भाटे

Post a Comment