व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

स्वयंशिस्त म्हणजे काय रे भाऊ?

आपण पुणेकर गाड्या चालवताना एखाद्या योध्याच्या आवेशात असतो. कुठल्याही सिग्नलला किंवा चौकात पाहा "पळा पळा कोण पुढे पळे तो' अशी शर्यत सुरू असते. काही सेकंद जागेवर थांबलो तर इतर वाहनांना जागा मिळेल, रस्ता मोकळा होईल, असे आपल्याला बहुधा कधीच वाटत नाही. आपण काही सेकंद न थांबल्यामुळे इतरांना आणि कधीकधी स्वत:लाही बराच वेळ थांबावं लागतं. पेट्रोल आणि वेळेचा अपव्यय होतोच, पण त्यापेक्षा महत्त्वाचा असलेला आपला जीव धोक्‍यात येण्याची शक्‍यता असते...

5 comments:

  1. Anonymous said...
     

    In India if we stared following lane practice it may solve our so many problem. If Trafic police has provided their full/partial support then people has to follow lane practice. If little bit curreption is reduced in that part then ppl will started worryng about trafic police and at last no other choise will remain except following the rules.

  2. Unknown said...
     

    It is very true. In Pune, there is no diciplin on roads.
    I wrote one poem on this issue..
    "Sadaiyva Punekara ghusat rahayache
    na signalshi tula kadhi thambayache.
    Sada tuzya pudhe ubhi ase ghaaee, galli bolatun tu susaat to jaai.
    Chari bajuni ghusat rahayache, chauka chaukan madhe gondhal ghalayache."
    Its very high time now... Police should made heavy punishments towards this.....
    I request all PUNEKARS to obey traffic rules.
    Regards....
    Dr mayuresh Joshi

  3. Unknown said...
     

    Dr.Mayuresh Joshi has described nicely in his apt poem the state of affairs obtaining on Pune roads today & deserves compliments!However,his request to all PUNEKARS is bound to fall on deaf ears.This is because Pune is being inhabited by hundreds of outsiders from other states,most of whom are here for either education or employment & they,along with few uncaring new generation locals have literally taken the law into their hands,thanks to the either absent or inefficient traffic police.
    Those few,who follow rules & lane discipline get swamped by several indisciplined vehicle drivers.The police is installing a new system to note numbers of defaulting vehicles & fine them.We can only hope that this will yield some +ve results.Time alone will tell!!!

  4. Unknown said...
      This comment has been removed by the author.
  5. Unknown said...
     

    Today's traffic situation in PUNE!
    बरेचसे लोक हल्ली वाहतूकीत अत्यंत बेशिस्तपणे वर्तन करत व बेजबाबदारीने सर्व नियम धाब्यावर बसवून सर्रास गाड्या चालवत असल्यामूळेच आजची लाजिरवाणी परिस्थिती उद्भवलेली आहे.यांत सर्व स्तरांवरचे लोक कळत नकळत भाग घेत असतात.
    १)कित्येकदा नियम पाळून लाल सिग्नलला थांबल्यावर मागच्या वाहनांचे कर्णकर्कष्य होर्न व शिवीगाळ किंवा कधीकधी धक्केपण सहन करावे लागतात.
    २)चूकीच्या दिशेने येणारी वाहने टाळण्यासाठी कसरत करावी लागते व रस्ता पायी ओलांडणा-या पादचा-यांना आपल्या डोक्याच्या मागेपण डोळे असते तर बरे व सोपे झाले असते अस वाटू लागते.
    ३)नुसते फ़टके देउनसुध्धा किंवा दंड करूनपण या नियमभंग करणा-या महाभागांना अक्कल येइल असे वाटत नाही.यांचे licences जप्त करून त्यांच्या रेको्र्डमध्ये नोंद केली तर थोडाफ़ार फ़रक होउ शकेल.रस्त्यांच्या कडेला उभे असलेल्या पोलिसांशी हुज्जत घालत किंवा दयायाचना करून चिरीमिरी देणा-या व ती हळूच घेणा-या पोलिसांना पण जबर शिक्षा झाली पाहिजे.
    ४) बंगळूरचे पोलिस कसे उत्तम वाहतूक नियंत्रण करतात ते पहावे.त्या सर्वांकडे walkie talkie असतो व कोणी नियम मोडून पळालाच तर पुढच्या चौकांत त्याला धरले जाते.
    ५)अमेरिका व इतर पा्श्चात्य देशांत सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते.मध्यरात्री सिग्नलला दूसरी कुठलीहि गाडी नसली तरी तो तोडला जात नाही हे कित्येकांनी पाहिले असेलच.
    6)'Every cloud has a silver lining!पुणे शहरात गाडी चालवण्याचा "अनुभव" असलेला तावून सुलाखून निघालेल्याला जगाच्या कुठल्याहि कोप-यांत वाहन चालवायला अतिशय सोपे जाते.पूर्वी मला कलकत्त्याबद्दल असे वाटायचे,पण कै.गोपाळकृष्ण गोखल्यांनी 'What Bengal thinks today,rest of India thinks tomorrow!म्हणल्याप्रमाणे तेथील बेशिस्त वाहने चालविण्याचे आपण पुण्यांत नुसते अनुकरणच केले नाही,तर बाजी मारली! तेथे मात्र आता खूपच सुधारणा झाली!
    ७)लेन शिस्त हा प्रकार 'आपल्या' प्रिय पुण्यांत नाही कारण पुण्यनगरी 'आपलीच' आहे!बिनधास्त बेफ़िकिर वाहने चालविण्याचे सुख फ़क्त इथेच आहे.
    ८)No entry रस्त्यांवरून उलट्या दिशेने वाहन चालविणा-यांच्या चेह-यावर एक आसूरी आनंद दिसतो!त्यांना अडवायचे धाडस केले तर आपलाच जीव धोक्यात पडतो आणि अर्वाच्च शिवीगाळ पण कधीकधी ऐकण्याचे "भाग्य" लाभू शकते!
    ९)कोणीहि कुठल्याहि लेनमध्ये वाहने हाकावीत,हिरवा दिवा लागल्यावर बरेचदा सर्वात डावीकडच्या लेनमधले वाहन सर्व पुढे जाणा-या वाहनांना ओलांडून उजवीकडे वळून जाते हे आपण नेहमीच पाहतो!गणवेश घातलेल्या 'मामा'ला हे दृश्य रोजच दिसत असल्यामूळे तो शिट्टी वाजवून जाब विचारत नाही व वाजवलीच कधी तर त्याच्या आधी तो लेन breaker पसार झालेला असतो!यामूळे येथे कायम alert रहावे लागते!त्यामूळे आपण येथे तावून सुलाखून निघतो!
    १०)जास्त म्हाता-या मंडळीची मात्र येथे फ़ारच पंचाईत व कुचंबणा होते कारण ते पायी रस्ते ओलांडत असले तर बहुतांशी वाहने वेग कमी करून त्यांना सुखरूप जाउ देण्याऐवजी त्यांच्यावर जोराने "आक्रमण" करतात!३ वर्षापूर्वी एक म्हातारीला उडवून मृत्यूमुखी पोचविणा-या वाहनचालकाने पळून जाताना शिवी तर दिलीच, पण शिवाय उद्गार काढले की "एक म्हातारी कमी झाली तर काय फ़रक पडतो?"
    त्यामूळे आजकाळ बरेचसे वृद्ध लोक एके काळच्या "पेन्शनरां"च्या पुण्यांत रस्त्यांवर यायचे "धाडस" करत नाहीत व लोपलेल्या जून्या काळाच्या रम्य आठवणीत रमून आपापल्या खिडक्यांमधून बाहेरच्या धावत्या व गतीमान युगाच्या "गतीशील" व स्वैर चाललेल्या वाहनांचे अचंब्याने अवलोकन करतात!
    सुभाष भाटे

Post a Comment