व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

कुमठेकर रस्त्याचे काम संपणार तरी कधी?

साधारणपणे गेल्या तीन वर्षांपासून कुमठेकर रस्त्याचे काम संपण्याची वाट येथील नागरिक पाहात आहेत. आधी रस्त्याचे काम, मग बाजूच्या गटारांचे काम, अशी वेगवेगळी कामे संपतच नाहीत. ही कामे, त्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी, पादचाऱ्यांचे हाल संपणार कधी याची वाट नागरिक पाहात आहेत. पावसाळ्याच्या आत काम संपेल, असे आश्वासन तीन पावसाळे मिळत आले आहे. आता या पावसाळ्यात काय होणार, असा प्रश्न पुढे उभा आहे.


1 comments:

  1. HAREKRISHNAJI said...
     

    मला वाटते की माहीतीचा अधिकार ह्या कायद्याखाली आपण हा सवाल मनपाला विचारायला हवा. मी उद्द्या चार दिवसासाठी पुण्यात येणार आहे. आपल्याला भेटायला आवडेल. कळवा. harekrishnaji@gmail.com

Post a Comment