मृतदेह अदलाबदलीच्या चौकशीसाठी समिती
ससून रुग्णालयात मरणोत्तर तपासणीनंतर मृतदेहांची अदलाबदल झालेल्या घटनेची चौकशी करण्यासाठी चार सदस्यांची समिती ससून रुग्णालयाने सोमवारी नियुक्त केली.
ससून रुग्णालयात मरणोत्तर तपासणीनंतर रविवारी संजय आबनावे व सुरेश वजीरसिंग घागडे यांचे मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देताना अदलाबदल झाली होती. त्यामुळे त्यांच्या नातेवाइकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ससून रुग्णालयाने डॉ. अलका पवार, डॉ. एम. व्ही. जाधव, डॉ. दीपाली बिथारिया व कार्यालयीन अधीक्षक रमेश जगताप यांची चौकशी समिती नियुक्त केली आहे. झालेल्या घटनेच्या चौकशीचा अहवाल ही समिती सादर करणार आहे, असे रुग्णालय सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, मरणोत्तर तपासणी विभागातील एका कर्मचाऱ्याची (टेक्निशियन) प्रशासनाने सोमवारी दुसऱ्या विभागात बदली केली. आबनावे यांचा मृतदेह समजून घागडे यांचा मृतदेह ताब्यात घेणाऱ्या त्यांच्या नातेवाइकांकडेही या प्रकरणी चौकशी करण्यात येणार असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले.
आधीच जवळचा व्यक्ती गेल्यानं व्याकूळ झालेल्या नातेवाईकांना प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे मनस्ताप सहन करावा लागणं, हे केवळ निंदनीय आहे. असा ढिसाळ कारभार करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, असे वाटते का? मग आम्हाला नक्की लिहा...