पोलिसांना नागरिकांच्या सहभागाची गरज
जयंत उमराणीकर : जलदगतीने खटले निकाली निघावेत
""गुन्ह्याचा तपास आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी बळाचा वापर करणे, या दोन कामाशिवाय इतर कार्यात पोलिस नागरिकांचा सहभाग घेऊ शकतात,'' असे प्रतिपादन पुण्याचे पोलिस आयुक्त जयंत उमराणीकर यांनी नुकतेच व्यक्त केले.
लोकसंख्येच्या तुलनेत पोलिस पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने स्वयंसेवक नियुक्ती, अर्धवेळ अधिकारी नेमणे, कॉन्ट्रक्ट पद्धती सुरू करणे या मार्गाचा अवलंब करता येऊ शकतो याकडे उमराणीकर लक्ष वेधले. परदेशात या पद्धतीने काम करीत असल्याने पोलिसांवरील कामाचा ताण कमी झाला असल्याने याचा विचार केला पाहिजे.
कायदा आणि न्यायव्यवस्थे विषयी ते म्हणाले, ""जलदगतीने खटले निकाली निघत नसल्याने कायद्याचा धाक गुन्हेगारांवर राहिला नाही. तसेच पोलिसांनी केलेल्या तपासावर अविश्वास दाखविणारी तरतूद कायद्यात आहे. त्यामुळे यात बदल होणे गरजेचे आहे.'' गुन्हे टाळणेसाठी नागरिकांनी प्रलोभनापासून दूर राहावे, असे आवाहन उमराणीकर यांनी केले.
गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी स्वतः होऊन सहकार्य केले पाहिजे अन्यथा कोणतीही संघटना आणि पोलिस काहीच करू शकणार नाही, असे ही त्यांनी नमूद केले.

श्री. उमराणीकरांची नागरिकांकडून असलेली अपेक्षा योग्यच. पण, प्रथम त्यांनी हे पाहिले पाहिजे, की त्यांच्या खात्यातील म्हणजेच पोलिस सर्वसामान्य नागरिकांना सहकार्य करतात का. पोलिसांना मदत न करण्याची वृत्त नागरिकांमध्ये केवळ पोलिसांच्या वर्तनामुळेच निर्माण झाली आहे.