वरवरची मलमपट्टी नको, शाश्वत विकास हवा...?
राष्ट्रकुल स्पर्धा अगदी तोंडावर आल्या आहेत. या स्पर्धेसाठी देशोदेशीतून येणाऱ्या खेळाडूंच्या स्वागतासाठी पुण्यनगरी सज्ज होत आहे. वातावरण निर्मितीला चांगलाच जोर चढलाय. भित्तिचित्रे रंगविण्याबरोबरच, सुशोभीकरण, डांबरीकरण आणि इतर विकासकामांना वेग आला आहे. किंबहुना शहरातील कोणत्याही भागात गेल्यास विविध कामं सुरू असल्याचे चित्र दिसते.
आतापर्यंत खड्ड्यात शोधावा लागणारा रस्ता खड्डेविरहित झाला आहे. तर त्या रस्त्यांवर दुभाजकांचा पत्ता नव्हता तेथे दुभाजक उभारण्यात आले आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेचे चित्र रंगविण्यासाठी शहरातली एकही भिंत सोडलेली नाही. विकास आणि निसर्ग शहरात हातात हात घालून चालतात, असा भास निर्माण करण्यासाठी दुभाजकांवर शोभिवंत झाडे लावली जात आहेत. स्वच्छ आणि सुंदर पुणे या संज्ञेखाली रस्त्यांची सफाईही रोजची बाब झाली आहे. ठिकठिकाणी होर्डिंग उभारले जात आहे. "पीएमपीएलएम'ने ही कंबर कसली असून, सीवायजी या नवीन बस आपल्या ताफ्यात रुजू केल्या आहेत. अशाप्रकारे राष्ट्रकुल स्पर्धेसाठी सर्व यंत्रणा अंग झटकून कामाला लागल्या आहेत.
शहराचे चित्र पालटताना पाहून मनोमनी आनंद दाटून येतो. चला...राष्ट्रकुलच्या निमित्ताने का होईना, शहराचा विकास होतो आहे, हे काय कमी आहे? असेही वाटून जाते. पण, जरा निरीक्षण केल्यावर असे लक्षात येतेय, की ही काम उरका पाडल्याप्रमाण सुरू आहे. केवळ राष्ट्रकुल पुरता असेच सर्व कामांचे स्वरूप दिसतेय. रस्त्यावर केवळ डांबराचा थर चढवला जातोय. तर, रेडिमेड प्रकारातली झाडं आणून लावली जाताहेत. हे सगळं पाहिल्यावर असं वाटतं, केवळ राष्ट्रकुल पार पडेपर्यंतच शहरविकासाची मलमपट्टी केली जातेय. त्यामध्ये शाश्वत विचार अजिबात झालेला नाहीये.

पण, अशाप्रकारची वरवरची मलमपट्टी काय कामाची. शहराचा विकास दूरदृष्टी ठेवून झाला पाहिजे. 2010 साली तर पुन्हा राष्ट्रकुल होणार असेल, तर हा विकास त्या स्पर्धेपर्यंत टिकायला हवा. नाही का?