व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

जलवाहतुकीचा पुणे पालिकेकडे प्रस्ताव

मुळा-मुठा नदीत वॉटर टॅक्‍सी, वॉटर बसेस यांसह आलिशान बोट अशा जलवाहतूक व्यवस्थेसह पाण्यावर तरंगणारे हॉटेल, व्यापारी संकुल; तसेच वॉटर पार्क, विविध जलक्रीडा स्पर्धांचे प्रशिक्षणाची आणि स्कूबा डायव्हिंगची सोय, असा प्रस्ताव नाईक एन्व्हायरमेंटल रिसर्च इन्स्टिट्यूटने पुणे महापालिकेला सादर केला आहे.

हे सर्व करताना नदी परिसरात 1962 पूर्वी पर्यावरण व जैवविविधता होती, तशी निर्माण करण्यात येणार असल्याचे या प्रस्तावात म्हटले आहे. शहरातील वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी जलवाहतूक सुरू करण्याची चर्चा सुरू आहे. याचा प्रस्ताव या संस्थेने तयार केला आहे. येथे जलवाहतूक करण्यासाठी मुठा नदीतील मध्यवर्ती चॅनेलचे पात्र आणखी खोल करावे लागणार आहे. त्यासाठी पात्रात खोदाई व नदीपात्रात पाणी राहावे, यासाठी मुळा-मुठा नदीवर लोणी काळभोर येथे बंधारा बांधावा लागणार आहे, तसेच खडकवासला येथेही पाण्याचे नियमन करण्यासाठी अशा पद्धतीने बंधारे बांधावे लागणार असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे.

जलवाहतूक योजना वर्षभर सुरू राहावी, यासाठी पूरनियंत्रण यंत्रणा व पावसाचा अंदाज व प्रत्यक्ष पावसाची माहिती घेऊन पूर येऊ शकतो की नाही, अशी माहिती देणारी यंत्रणा विकसित करण्यात येणार आहे. खास प्रवाशांसाठी दुचाकी वाहने नेण्याची सोय असलेली "रो-रो', तसेच सामानाची वाहतूक करण्याची "लो-लो' बोटींचा वापर करण्याचीही योजना आहे.

प्रस्ताव चांगला आणि शहराच्या दृष्टीने हितावह असला, तरी त्याची अंमलबजावणी कशाप्रकारे होते, हेही महत्त्वाचे आहे. तसं पाहिलं, तर पीएमटी- पीसीएमटीची योजना सुरवातील योग्यच वाटत होती. पण, आज तिची स्थिती आपण सारे पाहातोच आहोत.

हा धोका नाही का...?

पेट्रोल पंपावर मोबाईल वापरू नका, ही सूचना तुम्हा-आम्हाला प्रत्येक पंपावर कर्मचारी नेमाने एेकवतात...! गुरुप्रसाद आगवणे यांनी पुण्यात राजगुरूनगर येथे पेट्रोल पंपावर हे छायाचित्र घेतले, तेव्हा चक्क कर्मचारी निवांत गप्पा मारत काम करत होता...हा धोका नाही का...?

हवामान अंदाज अचूक होणार

हवामानाच्या अंदाजासाठी पुणे वेधशाळेतर्फे जगभरातील अद्ययावत यंत्रणांचा वापर सुरू असताना, या अंदाजांमध्ये अचूकता आणण्यासाठी लवकरच हवामान विभागाच्या दिल्लीतील मुख्यालयात बसवलेल्या "हाय स्पीड कॉम्प्युटिंग सिस्टिम'चा इंटरनेटद्वारे वापर करण्यात येणार आहे.या यंत्रणेच्या वापरातून देशभरातील हवामान केंद्रांकडून जमा झालेली निरीक्षणे आणि माहितीचे कमी वेळात विश्‍लेषण करून अधिक अचूक अंदाज लावणे वेधशाळेला शक्‍य होणार आहे.

देशभरातील हवामान केंद्रांकडून जमा होणारी माहिती, उपग्रहांकडून येणारी छायाचित्रे, तसेच विविध निरीक्षणांच्या विश्‍लेषणासाठी पारंपरिक पद्धतींशिवाय युरोप, जपान, इंग्लंडमधील नामवंत संस्थांकडे असणाऱ्या अत्याधुनिक सुविधांचा आधार घेण्यात येतो. देशभरातून जमा होणाऱ्या प्रचंड माहितीचे कमी वेळात विश्‍लेषण व्हावे यासाठी दिल्लीतील मुख्यालयात "हाय स्पीड कॉम्प्युटिंग सिस्टिम' बसविण्यात आली आहे.

पुणे वेधशाळेच्या "फोरकास्टिंग' विभागाला या यंत्रणेचा लवकरच लाभ होणार असून, पुण्यात बसून इंटरनेटद्वारे ही यंत्रणा वापरता येणार आहे. या यंत्रणेचा वापर सुरू झाल्यावर हवामानाचे अधिक अचूक अंदाज लावणे आम्हाला शक्‍य होणार आहे.

पुणे वेधशाळा हवामानाचा जो अंदाज वर्तविते, त्याच्या उलटा अर्थ धरायचा, असे गमतीने म्हटले जाते. किंबहुना उलटाच प्रत्यय येतो, असा पुणेकरांचा दावाही आहे. या पार्श्‍वभूमीवर वेधशाळेने हाय स्पीड कॉम्प्युटिंग सिस्टिमच्या साह्याने हवामानाचा अचूक अंदाज व्यक्त करण्यासाठी उचललेली पावले निश्‍चितच स्वागतार्ह आहे. पण, आता हा अंदात किती अचूक ठरतो, हे बदलणारे हवामानच सांगू शकेल. आपल्याला काय वाटते याविषयी? वेधशाळा अचूक अंदाज व्यक्‍त करू शकेल?

सोंगाड्याची उपेक्षा...

"शास्त्रशुद्ध पद्धतीने संशोधन करून लिहिलेले "तमाशा कला व सोंगाड्याचे पात्र' हे सोंगाड्याच्या जीवनावरील ४०० पानी पुस्तकाचे हस्तलिखित केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या लालफितीच्या कारभारात गेल्या दहा वर्षांपासून अडकले आहे। ....या संदर्भग्रंथाचे प्रकाशन अवघ्या चाळीस हजार रुपयांच्या अनुदानासाठी मागील दहा वर्षांपासून रखडले आहे। याबाबत अनेकांनी केंद्रसरकारकडे पाठपुरावा केला; परंतु त्यास यश आले नाही,'' अशी खंत पुस्तकाचे लेखक व नाटककार भि. शि. शिंदे यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.

""केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या सांस्कृतिक विभागातील आदिवासी व लोककलावंत विकास योजनेअंतर्गत सोंगाड्यावर संशोधनात्मक लेखन करण्यासाठी १९९३ मध्ये पत्रव्यवहार केला होता। त्या वेळी थिएटर ऍकॅडमीचे तत्कालीन अध्यक्ष सतीश आळेकर यांनी राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या शिफारशीने तसा प्रस्तावही पाठविला होता. त्या प्रस्तावास केंद्राने मंजुरी देऊन दोन लाख रुपये मंजूर केले होते,'' असे श्री. शिंदे यांनी सांगितले.

"त्यातील सुमारे साठ हजार रुपये राज्यभरातील तमाशांच्या फडावर जाऊन सर्व माहिती गोळा करण्यासाठी खर्च झाले, तर एक लाख रुपये साहित्य व छायाचित्रांसाठी मिळाले आहेत। माहिती गोळा करण्यासाठी राज्यभर प्रवास करून सोंगाड्याच्या भूमिका करणाऱ्या अनेक वयोवृद्धांशी चर्चा, तसेच तमाशामालकांच्या मुलाखती घेतल्या आहेत,' असे सांगून शिंदे म्हणाले, ""तमाशा ही महाराष्ट्रातील पारंपरिक समृद्ध कला आहे. त्यातील प्रयोगशील व महत्त्वाचे विनोदी पात्र म्हणून सोंगाड्याची ओळख आहे. हा सोंगाड्या अशिक्षित असून लोकरंजनाबरोबरच लोकप्रबोधन करतो.'' "१९७८ मध्ये कोल्हापूरचे विधान परिषदेचे माजी आमदार नामदेव व्हटकर यांनी एक पुस्तक लिहिले आहे. त्यात त्यांनी, "संस्कृत नाटकातील विदूषकातून सोंगाड्याचा उगम झाला असल्याचे म्हटले आहे.' त्या पुस्तकात अपूर्णपणा वाटला. विनोदी अंगाने उपहास, उपरोध, निसर्गतः मिस्कील स्वभाव यांच्या जोडीला मनोरंजन व प्रबोधन अशा एकत्र कसब असणाऱ्या पात्रावर लिखाण करावे वाटले, म्हणून मी हा विषय निवडला होता,'' असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.

अनेक नेत्यांनी पाठपुरावा केला. काही महिन्यांपूर्वी खासदार शिवाजीराव आढळराव- पाटील यांनीही पाठपुरावा केला होता. त्यावर संबंधित मंत्रालयाने हा विभाग बंद केला असल्याचे कळविले होते. आता "पद्मगंधा' प्रकाशनानेच पुस्तक बाजारात आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सध्या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे काम सुरू आहे. लवकरच ते बाजारात येईल. पुस्तक प्रकाशनाच्या वेळी या विषयावर चर्चा व्हावी; अशी साहित्यातील अनेक तज्ज्ञांनी आपल्याकडे अपेक्षा व्यक्त केल्याचे शिंदे म्हणाले. मात्र, राज्याच्या सांस्कृतिक विभागाने पुस्तक प्रकाशनासाठी सहकार्य केल्यास राज्यातील सोंगाड्यांचा संदर्भग्रंथ खऱ्या अर्थाने समाजासमोर येईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मार्चमध्येच एप्रिल फुल...!

पुण्यात कर्वे रस्त्यावर दशभुजा गणपतीनजिकच्या फ्लाय ओव्हर ब्रीजवर स्पीड ब्रेकर असल्याच्या पाट्या लावल्या आहेत। प्रत्यक्षात स्पीड ब्रेकर अजून बनवायचाच आहे...!!
(छायाचित्र - हेमंत पारखी, पुणे)