व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

dear ciizens made corporaters more accountable

I am worried. new corporaters are becomes six month old. Not a single corporater did the exercise to meet the citizens from the wards, & let them know about what is mention in corporation`s budget. from my point of view corporaters should take small meetings in societies & localities & explain the budget provisions so citizens will aware about what exactly will happen in coming year.corporations are created for participation of more no of peoples, to create this culture corporaters should take initiative. My sincere request is also to the social organisation, instead of opposition party, this social organisation & informed citizens could make better role. if the culture of monitoring budget is developed this will be a big leap in strengthening democracy. if you are a responsible citizen are you aware which way your money will spent for civic amenities? what kind of development proposals are in budget? are provisions are according to your priorities ? i think we all should more proactive, then only corporaters will respond timely, otherwise they will publish their report cards according to their conveyance and after five years no meaning to ask any question. i would like to know how we will get better citizens & made corporaters more accountable.

सिंहगड रस्त्यावर बीआरटीचे पडघम...



(पर्याय नवा; पण सावधपणा हवा)

सातारा रस्त्यावरील "बीआरटी' आता सिंहगड रस्त्याच्या तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यावर बाजूने आणि विरोधी अशा दोन्ही प्रतिक्रिया उमटत आहेत; मात्र वाहतुकीच्या प्रश्‍नातून तोडगा हा काढलाच पाहिजे, यावर दोन्ही बाजूंचे एकमत आहे. हाच विधायक दृष्टिकोन ठेवून "बीआरटी'च्या प्रश्‍नावर सर्वंकष चर्चा होणे आणि त्यात नागरिकांनीही सहभागी होणे, ही काळाची गरज आहे. सातारा रस्त्यावर हा प्रकल्प राबविताना काय उणिवा राहिल्या आणि त्यातून काय बोध घेणार, हासुद्धा महत्त्वाचा विषय आहे.

शहरातील रस्ते कितीही वाढले, रुंद झाले, तरी वाढत्या खासगी वाहनांमुळे ते अंतिमत: अपुरेच ठरतात. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक बळकट करणे, हाच त्यावरील पर्याय आहे, यावर अनेक तज्ज्ञांचे एकमत झाले आहे. स्वस्त आणि वेगवान सार्वजनिक वाहतूक उपलब्ध असेल, तर स्वत: वाहन घेऊन त्या कोंडीत जाण्याचा विचार नागरिक आपोआपच सोडून देतील, हा विचार मान्य झाल्याने त्यावर विविध प्रयोग सुरू आहेत. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीस (पुण्याचा विचार करता पीएमटी) विनाअडथळा मार्ग उपलब्ध करून देणे, हे "बीआरटी'चे मुख्य सूत्र आहे. यासाठी केंद्र सरकारने सुमारे पाचशे कोटींचे अनुदानही मंजूर केले आहे.
सिंहगड रस्त्याचा प्राधान्याने विचार
सिंहगड रस्ता अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. शहराच्या आसपास वेगाने विकसित होत असलेल्या भागांपैकी हा प्रभाग आहे. सर्वच भागात घरांच्या किमती आकाशाला भिडलेल्या असताना सिंहगड रस्ता परिसरात किंचित का होईना त्या तुलनेत आवाक्‍यात असल्यामुळे हा भाग आपलासा वाटत आला आहे. त्यामुळे या भागात साहजिकच संमिश्र वस्ती आहे. स्वत:च्या मोटारी आणि दुचाकी वाहनांबरोबरच सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणाऱ्या नागरिकांचे प्रमाण या भागात मोठे आहे. भरून वाहणाऱ्या पीएमटी बसबरोबरच पूर्वी सहा आसनी रिक्षा आणि आता "पिऍजिओ' (पॅगो) यासुद्धा नागरिकांसाठी अपुऱ्या ठरत आहेत. या मार्गावर पीएमटीची संख्या भरपूर आहे, तशीच प्रवाशांचीही. त्यामुळे पीएमटीने ज्या 60 मार्गांचे खासगीकरण करण्याचे ठरविले आहे, त्यामध्ये सिंहगड रस्त्याचाही समावेश होतो.
"बीआरटी'साठी आवश्‍यक त्या पायाभूत सुविधासुद्धा या रस्त्यावर उपलब्ध असल्याचे प्रशासनाचे निरीक्षण सांगते. एक तर सलग काही किलोमीटर अंतराचा सरळ रस्ता ही यासाठी मोठी उपलब्धी आहे; तसेच दांडेकर पुलापासून वडगावपर्यंत या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण झालेले आहे आणि पुरेसे रुंदीकरणसुद्धा; मात्र पर्यायी रस्ता नसल्याने आणि सक्षम सार्वजनिक वाहतूक नसल्याने काही ठराविक वेळात हजारो खासगी वाहने रस्त्यावर येतात आणि वाहतुकीच्या कोंडीचा अनुभव नित्याचा बनला आहे. त्यामुळेच येथे "बीआरटी'ची व्यवस्था नागरिकांना उपयुक्त ठरू शकते, असा विश्‍वास प्रशासनाला आहे.
सावधपणा आवश्‍यक
ंमात्र, ही वैशिष्ट्ये असली, तरी सातारा रस्त्यावर "बीआरटी' राबविताना जे अनुभव आले, त्यामधून काही शिकणे आवश्‍यक ठरणार आहे. सातारा रस्त्यावर बीआरटी राबविताना त्यात काही उणिवा राहिल्याचे सांगण्यात येते. त्यामध्ये सर्वांत मोठी उणीव म्हणजे तो राबविताची चुकलेली वेळ. निवडणुकीच्या तोंडावर बीआरटी लागू करण्याची घाई करण्यात आल्याचे अनेक जण आता उघडपणे सांगत आहेत. त्यामुळेच रस्त्याचे पुरेसे रुंदीकरण आणि अन्य पायाभूत कसोट्या पूर्ण न करताच ती लागू केल्याने प्रारंभी फटका बसला. दुसरी आणि सर्वांत महत्त्वाची उणीव ठरली, ती म्हणजे लोकशिक्षणाकडे झालेले दुर्लक्ष. या परिसरातील लोकप्रतिनिधी आणि अन्य विरोधी पक्षांचे नेते, प्रशासन यांनी नागरिकांना पूर्वी विश्‍वासात घेऊन बीआरटी मार्गावर जाण्यास प्रतिबंध करण्याबाबत किंवा एकूणच वाहतुकीच्या शिस्तपालनाबाबत प्रशिक्षण देण्याची गरज होती; परंतु ते पुरेशा प्रमाणात झाले नाही, असे लक्षात येत आहे.
सद्यस्थती काय?
जुन्या चुका होऊ नयेत, म्हणून स्वारगेट ते सिंहगड रस्ता या नियोजित बीआरटी मार्गाचा तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) करण्याचे काम सध्या सुरू आहे; मात्र यासाठी या परिसरातील लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांना विश्‍वासात घेण्याची गरज निर्माण झाली आहे. या परिसरात सुशिक्षित नागरिकांचे प्रमाण मोठे आहे; तसेच नागरिक कृती मंच, विविध सहकारी गृहरचना संस्था अशा व्यासपीठांवरून या प्रश्‍नाची सांगोपांग चर्चा होणे आवश्‍यक आहे. या प्रश्‍नाला पक्षीय स्वरूप न देता सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या अडचणी प्रशासनापुढे मांडाव्यात आणि प्रशासनानेही त्याकडे दुर्लक्ष न करता त्यातून तोडगा काढण्यासाठी पावले उचलावीत, हेच शहाणपणाचे ठरणार आहे. काही झाले, तरी वाहतुकीच्या प्रश्‍नातून कायमस्वरूपी मार्ग काढणे, हे आव्हान प्रशासन, सत्ताधारी, विरोधक आणि नागरिकांनाही पेलावे लागणार आहे. सुरक्षित, सुलभ आणि विश्‍वासार्ह अशी वाहतूक व्यवस्था असलेले शहर आपल्याच घरातील पुढच्या पिढीच्या हाती सोपविण्याची जबाबदारी शेवटी आपलीच नाही का?

जितेंद्र अष्टेकर

झोपडपट्टी पुनर्वसन आणि प्रश्‍नांची मालिका

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्याबाबतीत काही प्रश्‍न उभे राहात आहेत. झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन करायला हवे, याबाबत कोणाचाही आक्षेप नाही. आक्षेप आहे, तो त्या पद्धतीला, बिल्डर्सना देण्यात येणाऱ्या टी.डी.आर.ला. आणि वाढीव टी.डी.आर.मुळे शहरावर येणाऱ्या प्रचंड ताणाला. दहा कोटी चौरस फुट बांधकाम म्हणजे दुसरे शहरच! दोन शहरांचा भार एका शहरावर देणे योग्य आहे का? आणि मुळात पहिल्या शहराला तो ताण करणे शक्‍य होणार आहे का?


या योजनेमुळे शहरावर नक्की काय परिणाम होणार आहे, झोपडवासीयांना दाखविण्यात येणारी स्वप्ने खरोखरच पूर्ण होणार आहेत का? तुमचे काय मत आहे? शहरावर ताण न देता पुनर्वसन झाल्याची उदाहरणे तुम्हाला माहीत आहेत का?

सविस्तर बातम्या वाचण्यासाठी खालील लिंकवर क्‍लिक करा

फायदा भलत्यांचा, पुणेकर मात्र वेठीला
पाहिजेत किमान 2500 कोटी रुपये, पाणी आणि जागाही...

" ध्वनिप्रदूषण म्हणजे रे काय भाऊ ? "

वर्ष - 1995
स्थळ - पुण्यातील वाहता रस्ता

दिनांक - 25 सप्टेंबर
घट-स्थापनेचा दिवस - नवरात्र सुरू!

या सुमारास 'फ्लू'ची मोठी साथ आलीय. घरात मी, माझा मुलगा आणि माझ्या वृद्ध सासूबाई असे तिघेजणं जबरदस्त आजारी - प्रत्येकाला सुमारे 3 - 4 ताप - अंग आणि डोके प्रचंड दुखतेय.
संध्याकाळी कुठे तरी गाण्यांच्या रेकॉर्ड्स लागल्यात, त्यांचा असह्य - अगदी डोक्यात घाव पडावेत एवढा मोठा आवाज! सर्व दारे - खिडक्या बंद केल्यात - तरी आवाजाची मात्रा तेवढीच! घराच्या भिंतीसुद्धा कंप पावतायात! "आवाज जरा कमी करा" म्हणून सांगायलाही घरात कोणी नाही - कारण नवरा अपंग -दुसर्याच्या मदतशिवाय बाहेर पडू ना शकणारा ! आमचे हाल त्याला बघवत नाहीयेत -त्याची त्यामुळे प्रचंड उलघाल!
घाण आवाजातल्या घोषणा चालू - या भागातल्या नगरसेविका आणि त्यांचे पतिराजन्च्या उदार आश्रायाचा वारंवार होणारा पुनरुच्चार!
झोपेची गोळी घेतल्याशिवाय झोप येऊ न शकणार्या सासूबाई रात्रभर ताप आणि असह्य आवाज यामुळे तळमळताहेत.
- हे थांबत नाहीए, रात्री 11.30 वाजता नाईलाजाने पोलिसांना फोन - अत्यंत तत्परतेने आमचे नांव, पत्ता, फोन नंबर लिहून घेतला गेलाय...

आवाज कमी होत नाहीए, वाट पाहून ज्या नगर-सेविकाबाईंचा उद-घोष होत होता त्यांना रात्री 12 वाजता फोन -त्यांच्या सल्ल्यानुसार पुन्हा लगेच पोलिस-चौकीत फोन - पुन्हा एकदा त्यांनी त्याच तत्परतेने आमचे नांव, पत्ता, फोन लिहून घेतलाय...
रात्री 12.30 वाजता कार्यक्रम संपल्याची कंठाळी घोषणा ...
लगेचच 1.00 वाजता पोलिसांचा आनंदी आवाजात फोन - "काय? झाला की नाही आवाज बंद?"
हाताशपणे झोपण्याच्या प्रयत्नात आम्ही सर्वजण! डोक्याटले आवाज थांबत नाहीयेत...

दिनांक - 26 सप्टेंबर
स्वतः नगर-सेविकाबाईंचा फोन - मंडळाच्या कार्यकर्त्यांना आवाजाबाबत सूचना दिल्याचे सांगतात...
मंडळाचे कार्यकर्ते घरी येऊन भेटतात... माफीसुद्धा मागतात... हुश्श!
मात्र रात्री पुन्हा ' त्याच तिकिटावर तोच खेळ ' चालू! आमचेहि पोलिसाना फोन...
तशीच हुज्जत, तेच वाद, तीच उत्तरे.....ह्तताश!
असाहय वृद्ध सासूबाई अंथरुणावर तळमळताहेत - सगळ्यांनी कानात कापसाचे बोळे घालून वर रुमाल बांधलेत...

दिनांक - 27 सप्टेंबर
शेवटचा उपाय म्हणून नवर्याने नगरसेविकाबाईना द्यायला निवेदन तयार केलेय...
अंगात ताप असतानाच कोलनीतील लोकांच्या सह्या गोळा केल्या,
एकूण 70 सह्या मिळाल्या..... एकूणएक माणूस वैतागलेला,
संध्याकाळी आवाज सुरू झालेत, मांडवाच्या जागेवर कोलनीतल्या स्त्रिया-पुरूष एकत्र येऊन कार्यकर्त्याना समजावायचा प्र्यत्न करताहेत - पण कार्यकर्त्यांचे चेहेरे बधिर... आवाज हिंस्त्र-पने चालूच...
रात्री सासूबाईचा ताप उतरला, पण या आवाजामुळे झोपू शकट नसल्याने खोलिभर वेड्या सारख्या भिंतीना धडकत चकरा मारताहेत...

दिनांक - 28 सप्टेंबर
सकाळी-सकाळी सासूबाईंना "ब्रेन-स्ट्रोक"! सगळ्यांचीच प्रचंड धावपळ...
संध्याकाळी स्वता: नगर-सेविकाबाई येतात, अत्यंत सहानुभूतिने चौकशी करतात, निवेदन घेऊन जातात...
जाताजाता मांडवाशी गाडी थांबवून स्वता:
कार्यकर्त्याना समजवायचा प्र्यत्न करतात...
रात्री पाउसच मदतीला धावला... बदाबद कोसलतोय... आज तरी आवाज बंद!

दिनांक - 29 सप्टेंबर
कहाणी मागील पानावरून पुढे चालूच... सासूबाई आणि सगळ्यानाच आता शांत झोप हवीय... फक्ता शांत झोप ...!
पण कोणीच काहीच
करू शकत नसल्याने आख्खे घर प्रचंड ताणाखाली...

दिनांक - 30 सप्टेंबर
अखेर आम्ही सगळे हरलो, थक्लो ! सासूबाईंना जोशी हॉस्पिटलमधे दाखल केले... (घराजवळ मराठे हॉस्पिटल असूनही -आवाज टळू शकत नसल्याने लांबचे हॉस्पिटल निवडावे लागलेय)

दिनांक - 1 ओक्टॉबर
रात्री 2.30 पर्यंत घानेर्दया चिराक्या आवाजात आरडाओरडा...
दाणादाण ओर्केष्टराच्या संगतीने डिस्को दांडियाचा धुदगुस चालू...
पुन्हा एकदा पोलिसाना फोन, अर्ज, विनंती...
पोलिसाचा प्रेमळ सल्ला..."जाऊ द्या हो ! देवाचं चाललाय ! संपातोच आहे उत्सव 2 दिवसात...!"

यावर आम्ही काढलेले हाताश् निष्कर्ष...
1. मंडळाचे कार्यकर्ते ' देवाच कार्य ' करताहेत. आम्ही पापी त्याना अडवतोय.
2. "ध्वनी-प्रदूषण"....? ... म्हणजे रे काय भाऊ?
3. कोलनीतल्या लोकानना तर पोलिसाना फोनसुद्धा करायची भीती वाटतेय
का?...तर तक्रार करणारे म्हणून आपली नावे पोलिसानि या तथाकथित कार्यकर्त्याना सांगितली आणि उद्या यानी आपल्या पोटा ला चाकू लावला तर? आपल्या पोरिबालींना त्रास दिला तर?
4. अशा वेळेला पोलिस (विश्वास बसणार नाही एवढ्या) प्रेमाने आपल्याशी बोलून आपलीच मस्त समजूत घालतात.
5. अशा उत्सावातून कर्ने लावल्याशिवाय स्वर्गातल्या देवना आरत्या-बिरात्या ऐकू येत नाहीत.
आणि कार्यकर्त्यांची भक्तीही थन्थन आवाजात लागणार्या रेकॉर्ड्स-शिवाय लोकाणा कल्त नाही... बिच्चारे लोक!

या कहाणीचा समारोप ...
दिनांक - 2 ओक्टॉबर

अंधारात वाट न सापडलेल्या... चुकलेल्या... फडफडणार्या पाखरसारख्या माझ्या वृद्ध सासूबाई 'कोमात' गेल्या... असीम शांततेच्या शोधात, अद्न्यताच्या प्रदेशात प्रवेश करट्या झाल्या...

दिनांक - 11 ओक्टॉबर
सासूबाई स्वर्गवासी झाल्या.........

थन्थन आवाजाने खडबडून जाग्या झालेल्या स्वर्गातल्या ईश्वराने आता तरी त्याना शांती दिली असेल, अशी आमची वेडी-भाबडी समजूत आहे....
आम्ही आता फारच समजूतदार झालोत्त...

ओम ! शांती: शांती: शांती: !

उत्सवाच्या काळात आवाज मोठा होणार, होतच असतो. ते वातावरणच असं असतं, कार्यकर्त्यांचा जोषच एवढा असतो, की कोणी काही बोलत नाही. उत्सवाच्या आनंदाविषयी कोणाची काहीही तक्रार नाही; परंतु आपल्या आनंदामुळे एखाद्याचा जीव जात असेल तर....
"सुलभा' (नाव बदलले आहे.) आणि तिच्या कुटुंबियांचा हा अनुभव. इतरांचा आनंद त्यांच्या सासूबाईंचा जीव घेऊन गेला...

गणेश मंडळे खड्ड्यांसाठी पैसे देणार नाहीत...

महापालिकेने मंडपासाठी रस्ते खोदणाऱ्या मंडळांकडून प्रत्येक खड्ड्यामागे दोनशे रुपये घेण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाला सगळ्या मंडळांनी विरोध केला आहे. आमच्याऐवजी नगरसेवकांनी त्यांच्या वॉर्डस्तरीय निधीतून पैसे द्यावेत, असं मंडळांचं म्हणणं आहे. नगरसेवकांनी न दिल्यास आम्ही "भीक मागून' पैसे देऊ, असंही मंडळांनी म्हटलंय.

या निमित्तानं मंडप आणि खड्डे हा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. गल्लोगल्ली असलेले मंडप, एकाच गल्लीत दोन-तीन मंडळे, त्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी या प्रश्‍नांवरही या निमित्तानं चर्चा व्हायला हवी. गणेशोत्सव हवाच; पण आपल्या आनंदात इतर कोणाची गैरसोय होणार नाही, याचं भान ठेवायलाच हवं. या साऱ्याविषयीचं विचारमंथन ही आजची गरज आहे. या विचार मंथनातून निघणारे निष्कर्ष किमान पुढच्या वर्षी तरी उपयोगात आणता येतील. तुम्हाला काय वाटतं?

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्‍लिक करा.

महापालिकेने नेमके काय साधले?

गणेशोत्सवाच्या मांडवासाठी खड्डे खणू नयेत, अशी नोटीस गेल्या शुक्रवारी पुणे महापालिकेने गणेशमंडळांना दिल्यावर "बैल गेला आणि झोपा केला' अशीच प्रतिक्रिया उमटली होती. आता, सोमवारी "ही पत्रे म्हणजे नोटीसा नव्हेत, फक्त सूचना आहेत,' असे सांगत महापालिकेने माघारीचा सूर लावला. महापालिकेने योग्य भूमिका, मात्र अवेळी घेतल्याने मंडळांमध्ये तीव्र भावना होत्या.

आता या नोटीसा नव्हेत..., असे सांगून महापालिकेने काय साधले?

मांडवांसाठी खड्डे केल्याने होणारा रस्ता दुरुस्तीचा खर्च मंडळांकडून वसूल करण्यात येणार असला, तरी फक्त पैसे वसूल करून रस्ते दुरुस्त होतील का?

ई सकाळवरील बातमीसाठी इथे क्‍लिक करा
पुणे प्रतिबिंबवरील यापूर्वीच्या पोस्टसाठी इथे क्‍लिक करा

सावधान!

रविवारी पहाटे सिंहगड रोडवर एका काष्ठशिल्पकाराला (राहुल लोंढे) काही जणांनी लुबाडले. पहाटे चार वाजता रिक्षाची वाट पाहात असताना त्यांना काही जणांनी जीपमध्ये लिफ्ट दिली. नंतर त्यांचे हातपाय बांधून, डोळ्यावर पट्टी बांधून मारहाण केली, आणि जवळचे पैसे लुबाडले.

आजकाल असे गुन्हे वारंवार घडत आहेत. पूर्वी रात्री उशिरा किंवा पहाटे एकट्याने हिंडले, तरी काहीही होत नाही, अशी आपल्या पुण्याची ख्याती होती. ती हळूहळू संपत चालली आहे. काहीवेळा दिवसाढवळ्याही लुबाडल्याच्या घटना घडतात. एकट्याने फिरताना काळजी घ्यायलाच हवी. आता लोंढे यांनी जीपमध्ये बसायलाच नको होते, असा सूर येईल; पण ते जीपमध्ये बसले नसते तरी लुबाडणाऱ्यांनी लुबाडले असतेच ना?

या घटनेतून आपण काही शिकायला हवे. अपरात्री किंवा पहाटे पहाटे बाहेर जाणे गरजेचे असेल, तर काळजी घ्यायला हवी. आपल्यावरही असा प्रसंग आला, तर त्याचा सामना करायचा तरी कसा? यावर काही उपाय आहे का? अशावेळी आपण हळहळण्याशिवाय काहीच करायचे नाही का? यावर काही उपाय किंवा एकटे फिरताना घ्यायच्या काळजीसंबंधी काही टिप्स आहेत का?

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्‍लिक करा.

बैल गेला आणि झोपा केला

पुणे महापालिकेने गणपतीच्या मांडवांसाठी खड्डे खणू नये, असा आदेश काल जारी केला. मांडवांची कामे पूर्ण होत असताना हा आदेश जारी केल्यामुळे त्याचा उपयोग झालेला नाही आणि आदेशानंतर सुरू असलेल्या कामावरही फरक पडला नाही. नागरिकांच्या दबावामुळे थोडेफार बरे झालेले रस्ते, पुन्हा एकदा खोदायला सुरवात झाली आहे. मराठीत एक म्हण आहे, बैल गेला आणि झोपा केला! या आदेशाबाबतीत ती लागू होते.

"गल्ली डॉन'पासून वाचवा कोणीतरी...

रस्त्यावरून वाहनचालक आपल्या विचारांमध्ये गाडी चालवत जात असतो, त्याला काही समजायच्या आत कुत्री अचानक त्याच्या गाडीच्या दिशेने धावत येतात. चालक दचकतो, कित्येकदा त्याचा तोल जातो, अपघातही होतो. कुत्री मात्र त्याच्या मागे लागतात!



सकाळी सात ते दहाची वेळ... कचरापेटीजवळ एक गृहिणी कचरा घेऊन येते... जवळच बसलेली चार, पाच कुत्री त्यांच्यावर धावून जातात, त्या घाबरतात... कचऱ्याची पिशवी रस्त्यावरच टाकतात आणि पळत सुटतात... कुत्री पिशवी उचलून ती उचकायला लागतात!
सायंकाळी चार ते सहाची वेळ... त्याच रस्त्यावरून काही ज्येष्ठ नागरिक, लहान मुले फिरायला, भाजी आणायला चाललेली असतात, तीच कुत्री पुन्हा जाणाऱ्या-येणाऱ्यांवर कारण नसताना जोरजोरात भुंकायला लागतात. त्यामुळे काही जण घाबरतात, माघारी फिरून दुसऱ्या रस्त्याने जातात. तर लहान मुले जवळपासचा दगड उचलतात आणि कुत्र्यांच्या दिशेने भिरकावतात. चिडलेले कुत्रे मुलांचा पाठलाग करते!
सायंकाळी सात ते रात्री अगदी उशिरापर्यंतची वेळ... तोच रस्ता तीच कुत्री... आता "टार्गेट' वाहनचालक. रस्त्यावरून वाहनचालक आपल्या विचारांमध्ये गाडी चालवत जात असतो, त्याला काही समजायच्या आत कुत्री अचानक त्याच्या गाडीच्या दिशेने धावत येतात. चालक दचकतो, कित्येकदा त्याचा तोल जातो, अपघातही होतो. कुत्री मात्र भुंकत त्याच्या मागे लागतात!
हे प्रसंग काल्पनिक प्रसंग नाहीत, हा दिनक्रम आहे कोथरूड, कर्वेनगर परिसरात राहणाऱ्या "गल्ली डॉन' कुत्र्यांचा!
"महापालिकेचे कर्मचारी मोकाट कुत्र्यांना पकडायला येत नसल्यामुळे ती निर्ढावली आहेत. या कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा,' अशी मागणी येथील नागरिकांनी महापालिकेकडे केली आहे.
रस्त्याच्या कडेला असलेल्या कचरा पेट्या, बाकडी अथवा हॉटेलच्या आजूबाजूला, इमारतींचे वाहनतळ, असे या कुत्र्यांच्या अड्डे ठरलेले आहेत. कचरापेटीच्या आजूबाजूला पडलेला कचरा उचकायचा, शक्‍य झाल्यास पेटीतच उडी मारायची आणि काही खायला मिळते का ते बघायचे. पोटोबा झाला की मग उनाडक्‍या करायच्या. वाहनतळाजवळ, एखाद्या बाकड्याजवळ, चारचाकी गाडीखाली सावलीची जागा मिळाली की झोपायचे, पुढे सायंकाळी नागरिकांना त्रास द्यायचा, असा या टोळ्यांचा दिनक्रम असतो. यातील अनेक कुत्री आक्रमक असतात, ती नागरिकांना त्रास देतात. यातील पिसाळलेली कुत्री तर कोणालाही चावतात.

काय म्हणतात नागरिक?

रवी नातू (पौड रस्ता) : मला दररोज रात्रपाळी करावी लागते. या काळात अत्यंत कमी रहदारी असल्याने भटकी कुत्री रस्त्यामध्ये येऊन बसलेली असतात. कोणतीही गाडी आली, की लगेच भुंकायला लागतात आणि मागे लागतात. घरी जाताना माझ्याबरोबर कोणी नसेल तर लांबच्या रस्त्याने घरी जावे लागते.
शुभांगी ताटके (श्रीमान सोसायटी) : मला पाळलेल्या किंवा रस्त्यावरच्या सर्वच कुत्र्यांची भीती वाटते. आमच्या गल्लीतही खूप कुत्री फिरत असतात. रात्री विचित्र आवाज काढून ओरडतात. आम्ही खूपदा तक्रारी केल्या आहेत; पण गाडी आली, की त्या वेळी ही कुत्री गायब होतात. कित्येकदा गाडीने कुत्री पकडून नेली तरी पुढच्या आठवड्यात नवीन कुत्री दाखल होतात.
मीना देशपांडे (कर्वेनगर) : आमचे घर तळमजल्यावर आहे. घराला लागून असलेल्या बागेच्या एका बाजूला कचऱ्याचा डबा ठेवलेला असतो; पण कचरा गोळा करणारा माणूस येण्याच्या आधीच परिसरातील कुत्री डबा उचकतात आणि कचरा सांडतात. कित्येकदा डब्यातली पिशवी तोंडात पकडून रस्त्यावर नेऊन टाकतात.
प्रकाश दुनाखे (शिक्षकनगर) : सकाळी फिरायला जाताना आणि रात्री दोन्ही वेळेस कुत्री त्रास देतात, केवळ रस्त्यावरची नव्हे तर पाळलेली कुत्रीही रस्ता घाण करतात. त्यांच्या रात्रीच्या विचित्र ओरडण्यामुळे झोपमोड होते. त्यांना कितीही हाकलले तरी ती पुन्हा येऊन ओरडतात.

कुत्र्यांना वैतागलात, मग तक्रार करा!
पालिकेचा आरोग्य विभाग आणि गाडीखाना येथे कुत्र्यांबद्दलची तक्रार लेखी अथवा दूरध्वनीवरूनही नोंदवता येते. कुत्र्यांना वैतागलेल्या नागरिकांनी गाडीखाना - 24431476 या क्रमांकावर अथवा महापालिका आरोग्य विभाग - 25501233 या क्रमांकावर संपर्क साधावा.